मल्लिकार्जून खरगे नेमकं काय म्हणाले?
या घटनेनंतर मल्लिकार्जून खरगे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये खरगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या NDA सरकारचा शपथविधी होत असताना आणि अनेक देशांचे प्रमुख देशात असताना, यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान १० भारतीयांचा मृत्यू झाला आहे. आमच्या लोकांवर झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आणि आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आम्ही निर्विवादपणे निषेध करतो. पीडितांच्या कुटूंबियांप्रती आमची मनःपूर्वक संवेदना आहे आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. सरकारने आणि अधिकाऱ्यांनी पीडितांना तातडीने मदत आणि भरपाई द्यावी. फक्त तीन आठवड्यांपूर्वी, पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार झाला होता आणि जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना अव्याहतपणे सुरू आहेत. मोदी (आताच्या एनडीए) सरकारचा शांतता आणि सामान्यता प्रस्थापित करण्याचा सर्व छातीठोक प्रचार पोकळ ठरतो. भारत दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे, असं ते म्हणाले आहेत.
राहुल गांधींनीही दिली प्रतिक्रिया
या घटनेवर राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरातून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद आहे. ही लाजिरवाणी घटना म्हणजे जम्मू-काश्मीरमधील चिंताजनक सुरक्षा परिस्थितीचे खरे चित्र आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे.