Box Office Collection : ‘मुंज्या’ चं भूत घालतंय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; जाणून घ्या सिनेमाची तीन दिवसीय कमाई

मुंबई- सध्या बॉक्स ऑफिसवर आदित्य सरपोदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हॉरर कॉमेडी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ‘स्त्री’, ‘भेडिया’ यांसारख्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘मुंज्या’ हा सिनेमा आणला. ‘मुंज्या’ हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय त्यामुळे या चित्रपटाने सिनेमागृह गाजवलंय. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा ‘मुंज्या’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘मुंज्या’ या चित्रपटाची तीन दिवसीय कमाई ऐकून थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया.
Sacknilkच्या रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ४ कोटींची कमाई केली. त्यानंतर शुक्रवारच्या तुलनेत, शनिवारी ८१.२५ टक्क्यांपेक्षा अधिक कमाई केली. शुक्रवारी या चित्रपटाने ७ कोटी २५ लाखांची कमाई केली होती.
या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाची कमाईसुद्धा समोर आली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने रात्री १०:३० वाजेपर्यंत ७ कोटी ७५ लाख रुपये कमावले. आतापर्यंत ‘मुंज्या’ या चित्रपटाची कमाई एकूण १९ कोटी रुपये इतकी झाली आहे.
‘मुंज्या’ या चित्रपटाचं बजेट जवळपास ३० कोटी रुपये इतकं आहे. चित्रपटाची विकेंडची कमाई पाहता असं वाटतंय की, हा चित्रपट बजेट क्रॉस करेल.हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा एक भाग आहे. यापूर्वी त्यांनी ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘रुही’ या चित्रपटांची निर्मिती केली होती.
Sonakshi Sinha wedding: सोनाक्षी सिन्हाचं ठरलंय, बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत या तारखेला बांधणार लग्नगाठ‘मुंज्या’ हा चित्रपट मराठी लोककथेवर आधारित असून यामध्ये एका पौराणिक प्राण्याबद्दल सांगितलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा भारतातील पहिला असा चित्रपट आहे ज्यामध्ये मुख्य पात्र पूर्णपणे CGI च्या मदतीने तयार केलं गेलं आहे.
Marathi Actors in Bollywood:अख्ख मार्केट आपलंय! हिंदी चित्रपटांमध्ये गाजतायत हे मराठमोळे कलाकार

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाचं कथानक हे १९५२ सालापासून सुरु होतं, जेव्हा एका मुलाचं आणि मुन्नीचं लग्न होत नाही. मुलाचं मुंडन केलं जातं आणि मुन्नीचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न लावलं जातं. मुलगा जादूटोणा करतो आणि त्यात त्याचा जीव जातो. त्यानंतर त्या मुलाचं भूत बनतं आणि ते भूत मुन्नीचा शोध घेऊ लागतं.

Source link

box office collectionbox office collection munjya moviemaddock filmsmunjya movieMunjya Movie Castmunjya movie songsmunjya movie storyआदित्य सरपोतदारमुंज्या चित्रपट
Comments (0)
Add Comment