शिवसैनिकांनो, वाघांनो… संघटित व्हा; ठाकरे-शिंदेंनी एक व्हावं, महाराष्ट्र सदनाबाहेर बॅनर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चमकदार कामगिरी केली आहे. तर महायुतीच्या वाट्याला ४८ पैकी केवळ १७ म्हणजे जेमतेम एक तृतीयांश जागा आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या १५ जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना सातच जागा मिळाल्या. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिंदेंच्या शिवसेनेची केवळ एका राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावे, अशा आशयाचे बॅनर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर लागले आहेत.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने एक भावनिक होर्डिंग लावण्यात आलं आहे. हे होर्डिंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना पक्ष दोन गटांमध्ये विभागले गेल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती, अशी झाली होती. लोकसभा निवडणुकीत देखील याचे पडसाद उमटले होते. आता तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना या होर्डिंगवर उमटताना दिसतेय.
Yogesh Kadam : शिवसैनिकांना घड्याळाला मत द्यायचं नाही, दापोलीतील गितेंच्या लीडचं योगेश कदमांकडून स्पष्टीकरण
सर्व शिवसैनिक आणि नेत्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचं आवाहानच या होर्डिंगमधून करण्यात आलंय. शिवसैनिकांनो, वाघांनो… संघटित व्हा ! महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील बनवा ! आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! असं या होर्डिंगवर लिहिलं आहे.
Shiv Sena vs BJP : भाजपच्या गडातच शिवसेनेला फटका, विधानसभेच्या तोंडावर गणितं फिरली, नाशकात महायुतीत रस्सीखेचRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, शिवसेना ही भावनिक ऐक्यावर आधारित संघटना आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी पाहिलेलं महाराष्ट्राच्या ऐक्याचं स्वप्न, हेच शिवसेनेचं अंतिम ध्येय आहे. याला अनुसरुन सामान्य शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा आम्हाला आदरच आहे. त्यांच्यासाठी मातोश्री आणि शिवसेनेचे दरवाजे कायमच उघडे राहतील. मात्र ज्यांनी शिवसेना फोडण्याचं मोठं कारस्थान रचलं. त्याच वेळी शिवसेनेला आणि पर्यायाने महाराष्ट्राला संकटाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला, अशा कपट कारस्थानी लोकांना सोबत घ्यायचं की नाही, याचा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.

Source link

Eknath Shindemaharashtra sadanshiv senaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सदनशिवसेना
Comments (0)
Add Comment