पाच-पाच कॅमेरे असलेला फोन भारतात लाँच; वनप्लसला टक्कर देणारा का Xiaomi 14 Civi

Xiaomi 14 Civi भारतात सादर करण्यात आला आहे. हा कंपनीच्या 14 लाइनअपमधील हा लेटेस्ट हँडसेट आहे. फोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह आला आहे. यात Leica ब्रँडेड 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. Xiaomi 14 Civi मध्ये 3,000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. यात कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 4,700mAh ची बॅटरी आणि 67W वायर्ड फास्ट चार्जिंग आहे. या स्मार्टफोनला Samsung, Oneplus, Realme कडून चांगली टक्कर मिळेल.

Xiaomi 14 Civi ची किंमत

Xiaomi 14 Civi च्या 8GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर 12GB रॅम व 512GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. हा क्रूज ब्लू, माचा ग्रीन आणि शेडो ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये आला आहे. फोन Flipkart, Mi.com, Mi Home स्टोर, आणि Xiaomi च्या रिटेल पार्टनर कडून विकत घेता येईल. पहिला सेल 20 जूनला होईल. ICICI बँक कार्डच्या माध्यमातून फोन खरेदी केल्यास 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
भारतातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन झाला लाँच; सॅमसंगला देखील मागे टाकले, इतकी आहे किंमत

Xiaomi 14 Civi चे स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.55 इंचाचा 1.5K (1,236×2,750 पिक्सल) कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 3000 निट्स पीक ब्राइटनेस, HDR10+ आणि Dolby Vision ला सपोर्ट करतो. यावर Gorilla Glass Victus 2 ची सुरक्षा आहे.

Xiaomi 14 Civi फोनमध्ये 4nm प्रोसेसिंगवर आधारित Snapdragon 8s Gen 3 SoC आहे. सोबत 12GB LPDDR5 RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज देण्यात आली आहे. स्मार्टफोन Android 14 आधारित HyperOS वर चालतो. Xiaomi 14 Civi फोनमधील 4,700mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi 14 Civi फोनमध्ये Leica ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50 मेगापिक्सलचा Light Fusion 800 इमेज सेन्सर आहे. त्याचबरोबर 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला यात 32+32 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 6, NFC, Bluetooth 5.4, GPS, Galileo, GLONASS, Beidou, NFC, आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे. तसेच एक्सिलेरोमीटर, अँबियंट लाइट सेन्सर, ई-कम्पास, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि IR ब्लास्टर देखील आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पिकर्स Dolby Atmos सपोर्टसह देण्यात आले आहेत.

Source link

Xiaomi 14 Civixiaomi 14 civi launchxiaomi 14 civi pricexiaomi 14 civi price in indiaxiaomi 14 civi specificationsशाओमीशाओमी १४ सीव्हीशाओमी १४ स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment