Samsung Galaxy Watch FE हे स्मार्टवॉच सुपर एमोलेड डिस्प्लेने सुसज्ज आहे. हे Wear OS वर चालते. वेअरेबलमध्ये 247mAh बॅटरी आहे. हे IP68 रेटिंगसह येते. यात 5ATM वॉटर रेझिस्टन्स फीचर देखील आहे. सॅमसंगच्या पहिल्या FE ब्रँडेड स्मार्टवॉचच्या किंमती आणि सर्व फीचर्स बद्दल माहिती देत आहोत.
Samsung Galaxy Watch FE किंमत
Samsung Galaxy Watch FE कंपनीने Galaxy Watch 4 चे लाईट व्हर्जन म्हणून लॉन्च केले आहे. त्याची किंमत 199 डॉलर (अंदाजे16,000 रुपये ) आहे. 24 जूनपासून या स्मार्टवॉचची विक्री सुरू होणार आहे. हे ब्लॅक, पिंक, गोल्डन आणि सिल्व्हर रंगाच्या प्रकारांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
Samsung Galaxy Watch FE फीचर्स
- Samsung Galaxy Watch FE मध्ये 1.2 इंच आकारमानाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे.
- याचे रिझोल्यूशन 396 x 396 पिक्सेल आहे.
- डिस्प्लेवर सॅफायर ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
- कंपनीने हे स्मार्टवॉच एकाच 40 मिमी प्रकारात लॉन्च केले आहे.
- यात Exynos W920 चिपसेट आहे.
- त्याची रॅम 1.5GB आणि स्टोअरेज 16GB आहे.
- हे Wear OS वर चालते. ज्याच्या वर कंपनीचा One UI 5 Watch लेयर देण्यात आला आहे.
- स्मार्टवॉच टिकाऊ बनवण्यासाठी कंपनीने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी त्याला IP68 रेटिंग आहे.
- तर स्विमिंग करतेवेळी स्मार्टवॉच खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्याला 5ATM वॉटर रेझिस्टन्स देण्यात आला आहे. याशिवाय, यात MIL-STD-810H सर्टिफिकेशन देखील आहे.
Samsung Galaxy Watch FE कनेक्टिव्हिटी
- कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात ब्लूटूथ 5.3 व्हर्जन सपोर्ट आहे.
- याशिवाय यामध्ये वाय-फाय, एनएफसी आणि मल्टिपल सॅटेलाइट सिस्टीम देखील देण्यात आली आहे, ज्या अंतर्गत GPS/Glonass/Beidou/Galileo सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स समाविष्ट आहेत.
हेल्थ फीचर्सना सपोर्ट
- हे अनेक हेल्थ फीचर्सना देखील सपोर्ट देते. यामध्ये 100 हून अधिक वर्कआउट्सचा फॉलो अप घेतला जाऊ शकतो.
- स्लीप ट्रॅकिंग, स्लीप कोचिंग सारखे फीचर्सही आहेत.
- हे हार्ट रेटचे निरीक्षण करू शकते.
- याशिवाय ब्लडप्रेशर मॉनिटरिंग फीचरही स्मार्टवॉचमध्ये देण्यात आले आहे.
- यात एक्सीलरोमीटर, बॅरोमीटर, गायरो सेन्सर, जिओ मॅग्नेटिक सेन्सर यांसारख्या सर्व महत्त्वाच्या सेन्सर्सना सपोर्ट आहे.