पीडित तरुणाचे नाव समीर असून पोलिस मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील अन्य सीसीटिव्ही देखील तपासत आहेत.
व्हायरल झालेल्या बर्ड-आय व्हिडिओमध्ये दिसून येतंय की, हल्लेखोर तरुणाचा पाठलाग करतायत, त्यांनंतर त्याला घेरत त्याच्या धडावर चाकूने हल्ला केला, ज्यातून झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता. इतक्यात एका हल्लेखोराने पीडित तरुणाला मागे खेचले आणि तो जमिनीवर कोसळला. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच क्लिपमध्ये, आरोपींपैकी एकाने पीडित समीरला पकडले आणि जबर मारहाण केली. हे पाहून देखील आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी न करता आपला रस्ता पकडला, असे देखील निदर्शनास आले.
पोलिस म्हणाले की, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात केली असून पुढील तपास करत आहोत. तर समीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया शवागारात हलवण्यात आला आहे. हत्येमागील नेमका हेतू अद्याप अस्पष्ट आहे. पीडित आणि मारेकरी एकमेकांना ओळखत होते? की त्यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाला हिंसक वळण लागले, याचा तपास करण्याचा प्रयत्न करत पोलिस करत आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी तेलंगणातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल राज्यातील काँग्रेस सरकारला घेरले आहे. ते एक्सवर पोस्ट करत म्हणाले, ‘मुहम्मद समीरला हैदराबादमध्ये माफियांनी संपूर्ण सार्वजनिक जागेत क्रूरपणे मारले आणि ठार केले. काँग्रेसने सत्ता हाती घेतल्यापासून तेलंगणातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. कल्पना करा की, समीरला भाजपशासित राज्यात असेच मारले गेले असते तर अनेकांनी UN गाठले असते. पण तेलंगणात धर्मनिरपेक्ष अंधत्वामुळे कथा कोणाच्याही नजरेला पडत नाही.’