‘मुंज्या’चे अर्धशतक
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या सिनेमाने दुसऱ्या शनिवारी ६.७५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या रविवारी अर्थात १६ जून रोजी ८.७५ कोटींची कमाई केली. आतापर्यंतची ही सर्वाधिक कमाई आहे. यानंतर ‘मुंज्या’ची एकूण कमाई ५५.७५ कोटी झाली आहे. प्रदर्शित झाल्यापासून ‘मुंज्या’ दररोज ४ ते ५ कोटींची कमाई करतो आहे. हेच चित्र आजही पाहायला मिळाल्यास सोमवारी हा सिनेमा ६० कोटींचा टप्पा गाठू शकतो.
मराठमोळ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या सिनेमाने ६० कोटींच्या जवळपास पोहोचणारी कमाई केली आहे. यातून हे सिद्ध होते आहे की, कंटेट आवडल्यास प्रेक्षक आपोआप थिएटरकडे वळतील.
‘मुंज्या’ची प्रत्येक दिवसाची कमाई
७ जून २०२४, पहिला शुक्रवार – ४.२१ कोटी
८ जून २०२४, पहिला शनिवार, ७.४० कोटी
९ जून २०२४, पहिला रविवार- ८.४३ कोटी
१० जून २०२४, पहिला सोमवार- ४.११ कोटी
११ जून २०२४, पहिला मंगळवार- ४.२१ कोटी
१२ जून २०२४, पहिला बुधवार- ४.११ कोटी
१३ जून २०२४, पहिला गुरुवार- ३.९ कोटी
१४ जून २०२४, दुसरा शुक्रवार- ३.७५ कोटी
१५ जून २०२४, दुसरा शनिवार- ६.७५ कोटी
१६ जून २०२४, दुसरा रविरार- ८.७५ कोटी
एकूण कमाई- ५५.७५ कोटी
कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ने किती कमावले?
‘मुंज्या’ या सिनेमाला कार्तिक आर्यन स्टारर ‘चंदू चॅम्पियन’शी टक्कर द्यावी लागणार आहे. हा सिनेमा १४ जून रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाने ओपनिंग डेला ५.४० कोटी कमावले होते. दुसऱ्या दिवशी सिनेमाने ७.७० कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी रविवारी १६ जून रोजी कमाईत मोठी उसळी पाहायला मिळाली. १६ जून रोजी ‘चंदू चॅम्पियन’ची कमाई ११.०१ कोटी झाली आहे. यानंतर या सिनेमाने एकूण २४.११ कोटी कमावले. पहिल्या सोमवारच्या परिक्षेत ‘चंदू चॅम्पियन’ पास होईल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.