maharashtra bandh: अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचले, म्हणाल्या…

हायलाइट्स:

  • अमृता फडणवीस यांची महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडीवर टीका.
  • मला कोणी सांगू शकेल का की आज वसुली चालू आहे की बंद?- अमृता फडणवीस.
  • अमृता फडणवीस यांना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले प्रत्युत्तर.

मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ (Maharashtra Bandh) पुकारला आहे. या बंदचे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते जोरदार समर्थन करत असून विरोधी पक्षाचे नेते मात्र या बंदला जोरदार विरोध करत जाहीर निषेध करत आहेत. हा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस असून हा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी बंदवर टीका केल्यानंतर आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही ‘महाराष्ट्र बंद’ला जोरदार टोला लगावला आहे. (amruta fadnavis criticizes maha vikas aghadi in context with maharashtra bandh)

क्लिक करा आणि वाचा- ‘महाराष्ट्र बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवादच’; फडणवीस यांचा निशाणा

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाराष्ट्र बंदवर टीका केली आहे. मला कोणी सांगू शकेल का की आज वसुली चालू आहे की बंद?, असा खोचक सवाल उपस्थित करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख वसुली करणारे सरकार असा करत पुन्हा एकदा डिवचले आहे. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र बंद नही है’ (#MaharashtraBandhNahiHai) असा हॅशटॅगही जोडला आहे. या द्वारे त्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘महाराष्ट्र बंद’; ‘जनता असाच सरकारला शासकीय इतमामात निरोप देईल’

क्लिक करा आणि वाचा- ‘कोणी म्हणेल सिंधुदुर्ग किल्लाही मीच बांधला’; मुख्यमंत्री- राणेंचे ‘असे’ रंगले वाकयुद्ध

काँग्रेस नेते नाना पटोले यांचा पलटवार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे. वसुलीमध्ये कोण पुढे आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. देशपातळीवर आणि देशातील ज्या ज्या राज्यात भाजपप्रणित सरकार आहे, त्या ठिकाणी वसुलीबाबत त्यांना (अमृता फडणवीस) माहिती आहे. म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीने टीका करणारे ट्विट केले असावे अशा शब्दात पटोले यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

Source link

amruta fadnavisDevendra Fadanavismaha vikas aaghadimaharashtra bandhअमृता फडणवीसमहाराष्ट्र बंदवसुली
Comments (0)
Add Comment