Bakra Eid: मुस्लिम पेहराव केला अन् १२४ बकऱ्यांची खरेदी, ईदला जैन समाजाची सर्वत्र चर्चा, प्रकरण काय?

नवी दिल्ली: देशात सोमवारी ईद-उल-अजहा साजरी करण्यात आली. मात्र, यामध्ये दिल्लीतील जैन समाजाची चर्चा होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. जामा मशीदीपासून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या चांदनी चौकातील एका मंदिरात शेकडो बकऱ्या पाहायला मिळाल्या. या साऱ्या बकऱ्या विवेक जैन नावाच्या व्यक्तीच्या आसपास फिरत होत्या. कदाचित त्यांनाही हे कळालं होतं की याच व्यक्तीने त्यांचा जीव वाचवला आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची पद्धत आहे. त्यासाठी अनेक बकऱ्या बाजारात विक्रीसाठी ठेवल्या जातात. विवेक जैन यांनी तब्बल १५ लाख रुपये जमवून १२४ बकऱ्यांना जीवनदान दिलं आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊ

शक्य तितक्या बकऱ्या वाचवण्याचा निर्णय

ईदला बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते, यावरुन विवेक जैन यांचे गुरु संजीव हे अत्यंत अस्वस्थ होते. त्यांनी विवेक यांना फोन केला आणि याबाबत काही करायची इच्छा असल्याचं सांगितलं. सगळ्या बकऱ्यांना तर वाचवू शकत नाही, पण शक्य तितक्या बकऱ्या वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्याबाबत प्लानिंग करण्यात आली आणि १५ जूनच्या सायंकाळी जैन समाजाच्या २५ जणांचं एक पथक तयार करण्यात आलं. पैसे जमवण्यासाठी व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात आले. त्यानंतर एक पथक हे बाजापात गेली. बकऱ्यांची किंमत जाणून घेतली.

१६ जूनला गुप्त पद्धतीने जुन्या दिल्लीतील जामा मशीद, मीना बाजार, मटिया महल आणि चितली कबर सारख्या बाजारात गेले. सर्वांना हे सांगण्यात आलं होतं की त्यांन मुस्लिमांसारखा पेहराव करावा. जेणेकरुन कुठलीही समस्या उद्भवू नये. आम्हाला कुठली भीती नव्हती, पण जर त्यांना माहिती झालं असतं की आम्ही मुस्लिम नाही तर त्यांनी आम्हाला जास्त दरात बकरे विकले असले, असंही विवेक जैन यांनी सांगितलं.

१० हजार रुपयांना एक बकरा

बकऱ्यांची खरेदी करताना फार मोलभाव करण्यात आला नाही, हे बकरे १० हजार रुपये प्रतिच्या हिशेबाने खरेदी करण्यात आली. यावेळी तब्बल १२४ बकऱ्यांना वाचवण्यात आलं. विवेक जैन यांनी सांगितलं की, त्यांनी गुजरात, हैदराबाद, केरळ, पंजाब आणि महाराष्ट्रातून तब्बल १५ लाख रुपये जमा केले होते. जे पैसे वाचले त्यातून बकऱ्यांसाठी चारा विकत घेण्यात आला. आता या बकऱ्यांना गाईच्या गोठ्यात किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी पाठवलं जाईल.

विवेक यांनी सांगितलं की त्यांनी कधी विचारही केला नव्हता की ते चार बकऱ्यांचीही खरेदी करु शकतील. पण, त्यांच्या अपीलमुळे लोकांनी मोठ्याप्रमाणात दान दिलं आणि ते १२४ बकऱ्यांना वाचवू शकले.

Source link

BakrideidJain Bought GoatsJain communityjain community save goatsjama masjidmuslimold delhisave goatsईदजैन समाजजैन समाजाने बकऱ्या वाचवल्याबकरी कुर्बानी
Comments (0)
Add Comment