फिचच्या आकड्यांनुसार पुढील वर्षी भारताचा जीडीपी वाढीचा अंद ७ टक्क्यावरून ७.५ पर्यंत वाढेल, पण २०२५ मध्ये जागतिक विकास दर २.४ टक्क्यापर्यंत घसरेल आणि असे फिचने अहवालात नमूद केलंय. जागतिक स्तरावरील आर्थिक घट होण्यासाठी चीन आणि अमेरिका कारणीभूत असतील यासह स्थानिक श्रीमंतांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे. फिच रिपोर्टमध्ये दावा केलाय यंदा १५ हजार २०० श्रीमंत देश सोडतील तर मागील वर्षी १३ हजार ८०० श्रीमंतांनी चीनला टाटा बाय बाय केले होते.
अब्जाधीशांचा मायदेशाला रामराम शत्रू देशांत केला मुक्काम
चीनमधील बहुसंख्याक श्रीमंतांनी चीनला सोडत अमेरिका, सिंगापुर आणि जपान या देशांना पसंती दिली त्यामागे कारणे अशी की जपान आणि अमेरिका दोन्ही देश तंत्रज्ञानाने किंवा आर्थिक दृष्टीने चीनइतकेच प्रगत आहेत. जपानमधील जीवनशैली अतिशय जगभरात नावाजलेली आहे त्यामुळे जपानला चिनी नागरिकांनी पसंती दिली. सिंगापुरमधील संस्कृती चीनसोबत मिळती जुळती असल्याने तेथे सुद्धा चिनी नागरिकांनी जाण्यास पहिली पंसती दर्शवली आहे.
चीनमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे तणाव
चीनची अर्थव्यवस्था गेल्या काही काळापासून अस्थिरता दिसून येते अमेरिकेपाठोपाठ आता युरोपीय देशांसोबतही आर्थिक तणावाचा सामना चीनला करावा लागत आहे. सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही रिअल इस्टेट क्षेत्रात मरगळ दिसते. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेत मोठी पडझड होण्याची शक्यता वर्तवली जाते. देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा ३० टक्के आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात बँका कोलमडण्याचा धोका आहे.