अहवालात काय म्हंटलंय ?
‘त्रयस्थ’ या सर्वे करणाऱ्या संस्थेने विविध राज्यातील 399 परीक्षा केंद्रांना भेट दिली. ४६ टक्के म्हणजेच १८६ केंद्रे अशी होती जिथे दोन सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. केंद्रांवर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन सीसीटीव्ही असणे बंधनकारक होते. या कॅमेऱ्यांचे लाईव्ह फीड नवी दिल्लीतील एनटी मुख्यालयातील केंद्रीय नियंत्रण कक्षाला पाठवले जाणार होते. परंतु तसे झाले नाही असं अहवालात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर 399 पैकी 68 केंद्रांवर म्हणजे सुमारे 16% स्ट्राँग रूमसाठी गार्ड तैनात नव्हते.
सर्वेक्षणाचा उद्देश काय होता ?
परीक्षेच्या दिवशी केंद्रांवर विहित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी सुमारे 4 हजार परीक्षा केंद्रांपैकी १९९ परीक्षा केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी, पर्यवेक्षकांकडे तपशीलवार चेकलिस्ट असते. उदाहरणार्थ, परीक्षा केंद्रांवर शारीरिक नियंत्रणांची संपूर्ण तपासणी, जॅमर कार्यरत आहेत की नाही, सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे केली गेली आहे की नाही, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे किती सोपे आहे, इ. परीक्षेदरम्यान केंद्रांवर आसनव्यवस्था, निरीक्षकांची संख्या, सीसीटीव्ही हाताळण्यासाठी कर्मचारी आहेत की नाही, या सर्व बाबी तपासण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नीट परीक्षेचा गोंधळ सुरू असतानाच युजी नेट ही परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.