घटना आहे कच्छमधील मुंद्रा बीचवरील. दोन तरुण आपल्या थार कार घेऊन समुद्राच्या खोल पाण्यात उतरले. यादरम्यान भरतीच्या लाटांनी दोन्ही वाहनांना अक्षरश: घेरले आणि दोन्ही गाड्या त्या प्रवाहात अडकल्या. सध्या दोन्ही कार स्थानिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवरुन कच्छ पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्येच असा देखील दावा केला जात आहे की, एका जीपचे इंजिन निकामी झाले होते त्यामुळे ही घटना घडली आहे.
तरुणींचा रील्स साठी स्टंट करतानाचे व्हिडिओ व्हायरल
पुण्यातील एका तरुणीने उंच इमारतीच्या गच्चीवरुन स्वत:ला हवेत झोकून रील बनवण्याचा स्टंट केला होता. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे ही तरुणी इमारतीच्या गच्चीवर लटकली होती. मित्रांनी तिचा हात धरला होता तर दुसरा मित्र त्यांचा व्हिडिओ काढच होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर संभाजीनगरमधून सुद्धा कार चालवत असताना तरुणीचा रील बनवतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामध्ये तरुणीने आपली उलट्या दिशेने फिरवली आणि कार थेट दरीत कोसळली. यामध्ये तिचा दुर्दैवी अंत झाला आहे.