अखंड दगडी किंवा एखाद्या धातूच्या वस्तूस मोनोलिथ म्हणतात. आरशासारखा प्रकाश परावर्तित करणारी, ७७ इंच उंच आणि १३ इंच रुंद, त्रिकोणी आकाराची वस्तू अचानक रविवारी, २३ जून रोजी दिसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली. नेवाडाच्या डेझर्ट नॅशनल रिफ्युजमध्ये ते स्थापित केल्यानंतर लोकांची चिंता वाढली, जे सिन सिटीच्या जवळपास एक तासाच्या अंतरावर असलेले हायकिंग स्पॉट आहे.
सोशल मीडियावर पोलिसांनी याचे छायाचित्र प्रसारित केले त्यात हा मोठा स्लॅब खडबडीत भागात असल्याचे दिसत आहे. लास वेगासच्या मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘ तुमच्यापैकी अनेकांनी आम्हाला लॉस वेगसच्या उत्तरेला नुकत्याच दिसलेल्या रहस्यमय मोनोलिथ बाबत विचारले. काल दुपारी आम्ही सार्वजनिक सुरक्षा आणि पर्यावरणाचा विचार करून ही वस्तू येथून काढली आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की, ही वस्तू परावर्तित शीट धातुपासून तयार केली आहे. ज्याला त्रिकोणी आकार दिला आहे आणि रीबार आणि काँक्रीटने भक्कम केले आहे.
पथकाने म्हटले की, ‘ बेकायदेशीरपणे ही वस्तू या भूमीवर ठेवण्यात आली आहे. ही भूमी बिगहॉर्न मेंढ्यांच्या रक्षणासाठी स्थापित केले गेली होती तसेच हे दुर्मिळ वनस्पती आणि वाळवंटातील कासवांचे घर आहे. आता जो पर्यंत अधिकार्यांना यांचे करायचे काय हे समजत नाही तो पर्यंत हे अज्ञात स्थळी ठेवण्यात येईल. ही वस्तू येथे कशी आली याचे गूढ अद्याप समजलेले नाही. याच्या साठी कोण जबाबदार आहे? हे ही समजू शकले नाही.’
अशी घटना चार वर्षानंतर घडली आहे. बेल्जियम, रोमानिया आणि आइल ऑफ वाइट या ठिकाणी अशाच प्रकारच्या वस्तू सापडल्या होत्या. नोव्हेंबर २०२० मध्ये, युटोच्या लाल डोंगरातील वाळवंटात मंगळ सारख्या लँडस्केपमध्ये एक समान धातुचा मोनोलिथ सापडला होता.