54 लाख लोकांच्या गेल्या नोकऱ्या
अहवालानुसार जुलै, 2015 ते जून, 2016 आणि ऑक्टोबर, 2022 ते सप्टेंबर, 2023 या कालावधीत भारतात 18 लाख कारखाने बंद पडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 54 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत .बिझनेस स्टँडर्डच्या अहवालात या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार जुलै 2015 ते जून 2016 दरम्यान उत्पादन क्षेत्रात सुमारे 197 लाख असंघटित कारखाने सुरू होते. परंतु ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान ही संख्या 178.2 लाख इतकी कमी झाली आहे.
कारखाने कसले होते?
यामध्ये लहान असंघटित उद्योगांचा समावेश होता. भारतातील असंघटित क्षेत्रात एकूण 10.96 कोटी लोक काम करत आहेत. पण हा आकडा कोरोना महामारीच्या तुलनेत कमी असल्याचं सांगण्यात आले आहे.
छोटे आणि मध्यम कारखाने रोजगाराचे साधन
सांख्यिकी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रणव सेन यांनी आपले मत व्यक्त केले आहे ते म्हणाले की,अलीकडच्या काही धोरणात्मक निर्णयांमुळे आणि लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसला आहे यात शंका नाही. बहुतेक लोकांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील सुमारे 54 लाख नोकऱ्या गेल्या आहेत. छोटे आणि मध्यम कारखाने हे रोजगाराचे सर्वात मोठे साधन असल्याचे कामगार अर्थतज्ज्ञ सांगत असतात मात्र हे असंच सुरू राहिले तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल”.