चीनसाठी मोहीम महत्वाची का आहे?
दरम्यान, या आधी रशिया अमेरिका आणि खुद्द चीन चंद्रावरील मोहीमा राबवल्या आहेत. चंद्राचे अनेक अवशेष पृथ्वीवर आणण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, यंदा चीनने चंद्राच्या सर्वात दुर्मिळ म्हणजे जास्त काळोख असणाऱ्या भागात यानाचे लॅंडींग केले होते. त्यामुळे अशी कामगिरी करणारा चीन जगातला पहिला देश ठरला आहे.
चीनचे 2030 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे ठेवले लक्ष्य
चीनने 2030 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे मिशन देखील त्याच लक्ष्याचा एक भाग आहे. या मिशनचे यश हे चीनचे स्वप्न साकार करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर चीनला 2030 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन तळ उभारायचा आहे.
तुकड्यांवरती शास्त्रज्ञ संशोधन करणार
अहवालानुसार, चांगई 6 हे यान चंद्राच्या पृष्ठभागावरून सुमारे 2 अवशेष घेऊन पृथ्वीवर परत आले आहे. चिनी शास्त्रज्ञ आता या नमुन्यावर संशोधन करणार आहेत. त्याचबरोबर चीनचे संशोधन पूर्ण झाल्यानंतर ते इतर देशांशी शेअर केले जाणार आहेत.