‘कल्की 2898 एडी’ सिनेमाने पहिल्या रविवारी म्हणजेच रिलीजच्या चौथ्या दिवशी देशभरात एकूण ८८.२० कोटी रुपयांची कमाई केली होती. हिंदीमध्ये या सिनेमाने ४० कोटी, तामिळमध्ये ५.५ कोटी, तेलगूमध्ये ३८.८ कोटी, कन्नडमध्ये ०.७ कोटी आणि मल्याळममध्ये ३.२ कोटी रुपये कमावले. पण पहिल्या सोमवारी म्हणजेच पाचव्या दिवशी त्यात ६०.७७ % ची घसरण कमाईत दिसून आली.
पाचव्या दिवशी कल्किची कमाई
Sacnik दिलेल्या माहितीनुसार, कल्की 2898 AD ने पाचव्या दिवशी देशात एकूण ३४.६ कोटी रुपये कमावले. त्यात तेलुगूमध्ये १४.५ कोटी, तामिळमध्ये २ कोटी, हिंदीमध्ये १६.५ कोटी, कन्नडमध्ये ०.३ कोटी आणि मल्याळममध्ये १.३ कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले आहे. तुलनेत पाचव्या दिवशीची कमाई चौथ्या दिवसापेक्षा खूपच कमी झालीय. कदाचित हे वीक डेज असल्यामुळे होऊ शकते. त्यामुळे येत्या वीकेंडकडून सिनेमाला खूप अपेक्षा आहेत.
जगभरातही सारखीच परिस्थिती
प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण यांच्या या सिनेमाने चौथ्या दिवशी भारतात ३०९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले तर जगभरात ५१९ कोटींची कमाई झाली. पाचव्या दिवशी भारतात एकूण ३४३ कोटी रुपये कमावले तर जगभरात ५५५ कोटी रुपयांवर हा आकडा पोहचला. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा ८५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.