नेमकं काय घडलं?
पंतप्रधान लोकसभेला संबोधित करण्यासाठी सुमारे ४.१५ वाजता उभे राहिले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पक्षांनी अचानक गदारोळ सुरू केला. विरोधक घोषणाबाजी करताना दिसत असताना पंतप्रधानांनी आपले म्हणणे मांडण्यास सुरुवातही केली नव्हती. सभापती ओम बिर्ला यांनी सर्वप्रथम विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रेमाने समजावण्यास सुरुवात केली. मात्र विरोधकांनी त्यांचं ऐकले नाही. त्यामुळे ओम बिर्ला चिडले. नरेंद्र मोदी जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मणिपूर को न्याय दो… अशी घोषणाबाजी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होती.
यावर ओम बिर्ला म्हणाले, आदरणीय सदस्यांनो, आता पंतप्रधान बोलतील. मी मणिपूरमधील एका सदस्याला बोलण्याची संधी दिली आहे. ही पद्धत योग्य नाही… एक मिनिट बसा… कृपया एक मिनिट बसा, असं म्हणत त्यांनी विरोधकांना खाली बसण्यास सांगितलं. त्यानंतर ओम बिर्ला यांना राहुल गांधींचाही समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, हा तुमचा चुकीचा मार्ग आहे. हे सभागृहात चालणार नाही. अशा संसदेत तुमची प्रतिष्ठा राखली पाहिजे. तुम्हाला प्रतिष्ठा नष्ट करायची आहे. तुम्ही कसले विरोधी पक्षनेते आहात? हा तुमचा अत्यंत चुकीचा दृष्टिकोन आहे. या प्रकरणावर ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.