पंतप्रधान मोदींनी वर्ल्डकप ट्रॉफीला हात का लावला नाही ?
असं बोललं जात की, एखाद्या व्यक्तीने किंवा संघाने ट्रॉफी किंवा पदक जिंकले असेल तर त्याच व्यक्तींनी त्याला हात लावावा. कारण त्या जेतेपदावर फक्त त्यांचाच हक्क असतो. अगदी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत देखील असं पाहायला मिळतं. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी वर्ल्डकप ट्रॉफीला हात लावला नाही.
भारतीय संघाची विक्टरी परेड उशिराने सुरू होणार
भारतीय संघाची विक्टरी परेड ही आता उशिरा सुरु होणार असल्याचे समोर आले आहे. भारतीय संघाची विक्टरी परेड ही संध्याकाळी ५.०० वाजता नरिमन पॉइंट येथून सुरु होणार होती. पण आता ही विक्टरी परडे उशिरा का सुरु होणार आहे, याचे कारण समोर आले आहे.
भारताचा संघ हा दुपारी २.०० वाजता दिल्लीहून मुंबईसाठी रवाना होणार होता. त्यानंतर भारताचा संघ मुंबईत दुपारी ४.०० वाजता दाखल होणार होता. मुंबईत दाखल झाल्यावर भारतीय संघ थेट नरिमन पॉइंट येथे पोहोचणार आणि तिथून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ते जाणार होते. पण या कार्यक्रमात आला बदल झाला आहे. भारतीय संघ जो दुपारी ४.०० वाजता मुंबईत दाखल होणार होता, तिते ते ५.२० मिनिटांनी दाखल होणार असल्याचे समोर येत आहे. भारतीय संघाला दिल्लीहून मुंबईकडे येताना जास्त वेळ लागला. त्यामुळे या विक्टरी परेडची वेळही बदलण्यात आली आहे. भारतीय संघ आता संध्याकाळी ५.३० वाजता मुंबईत दाखल होईल, असे समोर येत आहे. त्यानंतर भारताचा संघ साधारण संध्याकाळी ६.०० किंवा ६.३० वाजता नरिमन पॉइंट येथे दाखल होईल आणि त्यानंतर संध्याकाळी ७ ते ७.०३० च्या दरम्यान के वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील. त्यामुळे आता भारताच्या विक्टरी परेडमध्ये एक ते दिड तास उशिर होणार असल्याचे आता समोर आले आहे.