व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हिरव्या रंगाच्या बॉटलमध्ये कोळी जिंवत आढळून आला आहे. हल्लीच कर्नाटकमधील पाणीपुरी मध्ये वापरल्या जाणाऱ्या चटपटीत हिरव्या पाण्यात केमिकल आढळून आले आहे. पाणीपुऱ्यांच्या २६० सॅम्पल गोळा करण्यात आले होते त्यापैकी ४१ पाणीपुरीच्या हिरव्या तिखट पाण्यात केमिकलयुक्त पदार्थ आणि कॅन्सरयुक्त पदार्थ आढळून आले आहेत. याआधीच कर्नाटक सरकारने कॉटन कॅडी आणि कोबी मॅच्यूरिनमध्ये रंग वापरण्यास राज्यात मनाई केली आहे .
आता पॅकेजिंग फूडमध्ये अशा प्रकारचे कीटक सापडणे ही काय पहिली वेळ म्हणता येणार नाही याआधी सुद्धा अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील आणखी एका ग्राहकाने ऑनलाइन फूड ऑर्डर केले होते ज्यामध्ये एक मेलेला उंदीर आढळून आला. गुजरातमधील जामनगर इथल्या ग्राहकाने चिप्सचे पाकीट खरेदी केले होते त्यामध्ये ग्राहकाला मेलेला बेडूक आढळला होता. अहमदाबादमध्ये एका हॉटेलात साभांरात एका व्यक्तीला मेलेला उंदीर सापडला होता. सांगलीतील पलूसमध्ये अंगणवाडीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप घटना निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली.