PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर, पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजी? नेमकं काय आहे कारण?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील 22 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले होते. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर असून ते दोन दिवस मॉस्कोमध्ये राहणार आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.
पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजी पसरली असल्याचे क्रेमलिन (रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालय) यांनी हा दावा केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणारे रशिया- युक्रेन हे युद्ध संपवण्याचे आवाहन भारताने केले आहे. PM मोदी आणि पुतिन दोन वर्षांनी भेटणार आहेत. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन या दोन्ही नेत्यांनी सप्टेंबर 2022 मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत द्विपक्षीय चर्चा केली होती.

Kathua Terrorist Attack : कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर ‘दहशतवादी’ हल्ला, दोन जवान जखमी

मोदींच्या रशिया दौऱ्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजी का ?

1950-1960 पासूनच भारत-रशिया मैत्री संबंधांवर पाश्चात्य देशांमध्ये ईर्ष्या आहे. मात्र, तरी सुद्धा भारत सातत्याने पाश्चिमात्य देशांचा दबाव धुडकावून लावत आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण घेऊन पुढे जात आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली तेव्हा दोन्ही नेत्यांनी ‘रशिया आणि भारताची मैत्री अतूट आहे,’ असे म्हटले होते. भारत आणि रशियाच्या वाढत्या मैत्रीसंबंधांमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते.

रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका काय ?

रशिया-युक्रेनमधील युद्ध 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झाले. सर्वप्रथम रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामागे जमिनीचे दावे, राजकीय आणि लष्करी रणनीती या कारणांचा समावेश होता. परंतु रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका संतुलित राहिली आहे. युक्रेनसोबतच्या युद्धासाठी भारताने अद्यापही रशियाला जबाबदार धरलेले असून भारताने तटस्थता राखली आहे. तर दोन्ही देशांनी संवादातून तोडगा काढावा असा सल्ला भारताने दिलेला आहे.

Source link

india russia newsindia russia relationsNarendra Modi TOPICpm modi russia visitPM Modi Russia Visit newsrussiaनरेंद्र मोदी यांचा रशिया दौरापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौराभारत रशिया मैत्रीभारत रशिया संबंध
Comments (0)
Add Comment