Smallest 5G Phone Unihertz Jelly Max: हा मोबाइल फोन मीडियाटेकच्या Dimensity 7300 चिपसेटसह बाजारात आला आहे. याच्या डिस्प्लेचा आकार 5.05 इंच आहे. इतका छोटा असून देखील यात 100MP चा मेन कॅमेरा आणि 12GB रॅम देण्यात आला आहे.
युनिहर्ट्झ जेली मॅक्सचे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 5.05 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात 720 x 1520 पिक्सलचा रिजॉल्यूशन देण्यात आलं आहे. हा एक LCD पॅनल आहे ज्यात पंच होल कटआउट डिजाइन देण्यात आली आहे. डिवाइस MediaTek Dimensity 7300 चिपसेटसह आला आहे. त्याचबरोबर 12 जीबी LPDDR5 रॅम आहे आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.
युनिहर्ट्झ जेली मॅक्स मधील सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील 100 मेगापिक्सलचा कॅमेरा. हा फोनचा प्रायमरी सेन्सर आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा पंचहोल कटआउटमध्ये फिट करण्यात आला आहे.
बॅटरी कपॅसिटी पाहता, या डिव्हाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. एक छोट्या स्मार्टफोनसाठी ही मोठी बॅटरी म्हणता येईल. त्याचबरोबर 66W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे हा फोन 90 टक्क्यांपर्यंत फक्त 20 मिनिटांत चार्ज होतो.
फोन Android 14 वर चालतो. कनेक्टिविटीसाठी यात 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC आणि इंफ्रारेड पोर्टचा सपोर्ट मिळतो. ज्यामुळे काही होम अप्लायन्सेज कंट्रोल करता येतात. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनचे डायमेन्शन 128.7 x 62.7 x 16.3mm आहेत आणि वजन 180 ग्राम आहे.