Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
बेबी जॉन - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sun, 05 Jan 2025 06:24:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg बेबी जॉन - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण https://tejpolicetimes.com/?p=112649 https://tejpolicetimes.com/?p=112649#respond Sun, 05 Jan 2025 06:24:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112649 कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण

Pushpa 2 Vs Baby John Box Office Collection: ‘पुष्पा २’ आणि ‘बेबी जॉन’मध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. वरुण धवनच्या या सिनेमाने मात्र बॉक्स ऑफिसची सपशेल निराशा केली आहे. हायलाइट्स: ‘पुष्पा २’ची कमाई थांबता थांबेना ‘बेबी जॉन’ला मात्र दिवसाला १ कोटी कमावणंही कठीण बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुन अव्वल महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: बॉक्स […]

The post कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण

Pushpa 2 Vs Baby John Box Office Collection: ‘पुष्पा २’ आणि ‘बेबी जॉन’मध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. वरुण धवनच्या या सिनेमाने मात्र बॉक्स ऑफिसची सपशेल निराशा केली आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २’ची कमाई थांबता थांबेना
  • ‘बेबी जॉन’ला मात्र दिवसाला १ कोटी कमावणंही कठीण
  • बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुन अव्वल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा २’ नावाची वाइल्डफायर थांबायचे नाव घेत नाही आहे. रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या या सिनेमाने अलीकडेट बॉक्स ऑफिसवर एक महिना पूर्ण केला, तरीही प्रत्येक दिवशी कोट्यवधींची कमाई होते आहे. ४ जानेवारी रोजी सिनेमाचा ३१वा दिवस होता. या पाचव्या शनिवारी ‘पुष्पा २’ ने भारतात ५.५ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी ही कमाई ३.७५ कोटी होती, म्हणजेच अजूनही वीकेंडला ‘पुष्पा २’च्या कमाईत वाढ होतेय.Sacnilk ने दिलेल्या आकडेवारीनुसार ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनने सर्वाधिक ४.३५ कोटींची कमाई केली, तर तेलुगू आवृत्तीने १ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने ११९९ कोटी रुपयांची कमाई केली असून, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम आवृत्तीने अनुक्रमे ७८५ कोटी, ३३३.५१ कोटी, ५७.९८ कोटी, ७.७१ कोटी आणि १४.१५ कोटी अशी कमाई केली आहे. या कमाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय.

Pushpa 2 रीलिज होऊन ३१ दिवस झाले, तरी अवघ्या काहीच दिवसांपूर्वी रीलिज झालेल्या ‘बेबी जॉन’ला या सिनेमाने धूळ चारली आहे. वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ गेल्यावर्षी ख्रिसमसला प्रदर्शित झाला. ‘थेरी’ या दाक्षिणात्य सिनेमाचा रीमेक असणारा ‘बेबी जॉन’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात सपशेल नापास ठरला आहे. एकीकडे पाचव्या शनिवारी ‘पुष्पा २’ने ५.५ कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसरीकडे रीलिजनंतरच्या दुसऱ्या शनिवारी ‘बेबी जॉन’ने १ कोटी रुपयेदेखील कमावले नाहीत. त्यामुळे हा मल्टिस्टारर सिनेमा ४० कोटींचा आकडा गाठेल की नाही, अशी शंका आहे.

लग्नाआधी बायकोला डेट करताना घाबरलेले गोविंदा; सुनीता यांचे वय अवघे १५ आणि अभिनेत्याचे…
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या शनिवारी ‘बेबी जॉन’ने केवळ ८० लाख रुपयांची कमाई केली आहे. ओपनिंग डेला या चित्रपटाने ११.२५ कोटी कमावले होते, तेव्हा या चित्रपटाडून अपेक्षा होत्या. मात्र आता व्यवसाय वाढेल याची शक्यता कमीच आहे. एकूण ११ दिवसात या चित्रपटाने केवळ ३७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पुष्पा २’च्या कमाईसमोर हे आकडे जवळपासही नाहीत, असे चित्र आहे.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

The post कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112649 0
Baby John ची करो या मरो अवस्था! वरुण धवनच्या सिनेमाला ‘ख्रिसमस शाप’? ‘मुसाफा’पेक्षाही निम्मी कमाई https://tejpolicetimes.com/?p=112296 https://tejpolicetimes.com/?p=112296#respond Sat, 28 Dec 2024 06:25:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112296 Baby John ची करो या मरो अवस्था! वरुण धवनच्या सिनेमाला ‘ख्रिसमस शाप’? ‘मुसाफा’पेक्षाही निम्मी कमाई

Baby John Box Office Collection: वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या ‘बेबी जॉन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केलेली नाही. हायलाइट्स: ‘बेबी जॉन’ची कमाई घसरली ‘मुफासा’ची कमाईही जास्त बॉलिवूडला लागलेला ‘ख्रिसमस शाप’ पुन्हा चर्चेत महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: अभिनेता वरुण धवनला त्याच्या ‘बेबी जॉन’ सिनेमाकडून विशेष अपेक्षा होती, मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर […]

The post Baby John ची करो या मरो अवस्था! वरुण धवनच्या सिनेमाला ‘ख्रिसमस शाप’? ‘मुसाफा’पेक्षाही निम्मी कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Baby John ची करो या मरो अवस्था! वरुण धवनच्या सिनेमाला ‘ख्रिसमस शाप’? ‘मुसाफा’पेक्षाही निम्मी कमाई

Baby John Box Office Collection: वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या ‘बेबी जॉन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केलेली नाही.

हायलाइट्स:

  • ‘बेबी जॉन’ची कमाई घसरली
  • ‘मुफासा’ची कमाईही जास्त
  • बॉलिवूडला लागलेला ‘ख्रिसमस शाप’ पुन्हा चर्चेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: अभिनेता वरुण धवनला त्याच्या ‘बेबी जॉन’ सिनेमाकडून विशेष अपेक्षा होती, मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. ख्रिसमसला रीलिज झालेल्या या सिनमाने रिलीजनंतर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी ‘मुफासा: द लायन किंग’पेक्षाही कमी कमाई केली. ‘मुफासा’चा बॉक्स ऑफिसवर आठवा दिवस होता. पहिल्या दिवशी सुट्टी असूनही ‘बेबी जॉन’ची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. हा मास ॲक्शन चित्रपट असल्याने अपेक्षा होत्या, मात्र दुसऱ्या दिवसानंतर, तिसऱ्या दिवशी कमाई पुन्हा कमी झाले. चित्रपटाची सध्याची परिस्थिती पाहता, गेल्या ६ वर्षांपासून बॉलिवूडवर असलेला ख्रिसमसचा ‘शाप’ यावेळीही संपलेला नाही.

नाताळ रीलिजचा शाप ‘बेबी जॉन’लाही लागला?

गेल्या सहा वर्षांपासून बॉलिवूडसाठी नाताळचा सण चांगला गेला नाही. कॅलिस दिग्दर्शित ‘बेबी जॉन’मुळे परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा होती. पण असे झाले नाही. या शापाची सुरुवात २०१८ साली आलेल्या शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटापासून झाली. हा चित्रपट फ्लॉप ठरला, त्यानंतर ख्रिसमसला रिलीज झालेले ‘दबंग ३’, ‘८३’, ‘सर्कस’ आणि ‘डंकी’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. या यादीत ‘बेबी जॉन’ही बसणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

sacnilk च्या रिपोर्टनुसार, १८५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘बेबी जॉन’ने शुक्रवारी तिसऱ्या दिवशी केवळ ३.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनमाने ४.७५ कोटी रुपये कमावले होते, तर पहिल्या दिवशी ११.२५ कोटी रुपयांची कमाई झाली. अशा प्रकारे तीन दिवसांत या चित्रपटाने देशात केवळ १९.६५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दुसरीकडे, वॉल्ट डिस्नेच्या हॉलिवूड ॲनिमेशन ‘मुफासा: द लायन किंग’ने रिलीजच्या ८व्या दिवशी भारतात ६.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने ‘पुष्पा २’ च्या वादळातही मजबूत पकड निर्माण केली आहे. ‘मुसाफा: द लायन किंग’ने आतापर्यंत भारतात ८०.८५ कोटी कमावले आहेत.

Pushpa 2 ने पहिल्यांदाच केली सर्वात कमी कमाई; तरीही बॉक्स ऑफिसवर रचना अनोखा रेकॉर्ड
ख्रिसमसनंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येचा प्रभाव आता चित्रपटगृहांमध्ये दिसून येत आहे. दिल्ली-एनसीआरमधील बदलत्या हवामानाचा परिणाम चित्रपटांच्या कमाईवरही झाला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ने शुक्रवारी पहिल्यांदाच १० कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली आहे. रिलीजच्या २३व्या दिवशी, ‘पुष्पा २: द रुल’ ने देशात ८.७५ कोटी रुपये नेट कलेक्शन केले आहे. या सिनमाचे एकूण कलेक्शन ११२८.८५ कोटी रुपये झाले आहे.

‘बेबी जॉन’ची ही अवस्था या सिनेमाचा निर्माता अॅटलीसाठी मोठा धक्का आहे. निर्माता म्हणून हा त्याचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असून त्याची गणना सर्वात यशस्वी आणि फायदेशीर चित्रपट निर्मात्यांमध्ये केली जाते. पण ‘ख्रिसमसच्या शापा’ने त्यालाही सोडले नाही. सध्याची स्थिती पाहता, ‘बेबी जॉन’ ८०-८५ कोटी कमावेल असेही वाटत नाही.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

The post Baby John ची करो या मरो अवस्था! वरुण धवनच्या सिनेमाला ‘ख्रिसमस शाप’? ‘मुसाफा’पेक्षाही निम्मी कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112296 0
साऊथ Vs बॉलिवूड! अल्लू अर्जुन की वरुण धवन… बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? ‘बेबी जॉन’ची सुरुवात दणक्यात https://tejpolicetimes.com/?p=112204 https://tejpolicetimes.com/?p=112204#respond Thu, 26 Dec 2024 08:50:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112204 साऊथ Vs बॉलिवूड! अल्लू अर्जुन की वरुण धवन… बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? ‘बेबी जॉन’ची सुरुवात दणक्यात

Pushpa 2 Vs Baby John Box Office Collection: ‘पुष्पा २’ या सिनेमाची २१व्या दिवशीही दणक्यात कमाई झाली, तर ‘बेबी जॉन’साठी कसा होता पहिला दिवस? हायलाइट्स: ‘बेबी जॉन’ची किती झाली कमाई? ‘पुष्पा २’ने गाजवला ख्रिसमसचा दिवस वरुण धवनचा धमाकेदार सिनेमा महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: वरुण धवनचा धमाकेदार ॲक्शन एंटरटेनर ‘बेबी जॉन’ हा सिनेमा २०२४ या वर्षातील शेवटचा […]

The post साऊथ Vs बॉलिवूड! अल्लू अर्जुन की वरुण धवन… बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? ‘बेबी जॉन’ची सुरुवात दणक्यात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
साऊथ Vs बॉलिवूड! अल्लू अर्जुन की वरुण धवन… बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? ‘बेबी जॉन’ची सुरुवात दणक्यात

Pushpa 2 Vs Baby John Box Office Collection: ‘पुष्पा २’ या सिनेमाची २१व्या दिवशीही दणक्यात कमाई झाली, तर ‘बेबी जॉन’साठी कसा होता पहिला दिवस?

हायलाइट्स:

  • ‘बेबी जॉन’ची किती झाली कमाई?
  • ‘पुष्पा २’ने गाजवला ख्रिसमसचा दिवस
  • वरुण धवनचा धमाकेदार सिनेमा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: वरुण धवनचा धमाकेदार ॲक्शन एंटरटेनर ‘बेबी जॉन’ हा सिनेमा २०२४ या वर्षातील शेवटचा मोठा बॉलिवूड रिलीज आहे. या चित्रपटाची चांगली आगाऊ बुकिंग झाली. स्पॉट बुकिंगवर खूप भर होता आणि सुरुवातीच्या दिवशी जे अपेक्षित होते ते केले. कालिस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात केली आहे. असे असले तरी ब्लॉकबस्टर ‘पुष्पा २’ने बुधवारी २१व्या दिवशीही चांगली कमाई केली. याचा फटका ‘बेबी जॉन’ला बसला आहे. ख्रिसमसचा दिवस बॉक्स ऑफिससाठी खास ठरला. ‘पुष्पा २’, ‘मुफासा: द लायन किंग’ आणि ‘बेबी जॉन’, हे तिन्ही चित्रपट पाहण्यासाठी २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. यामध्ये अल्लू अर्जुनच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा कल सर्वाधिक होता. नवीन रिलीज असणाऱ्या ‘बेबी जॉन’च्या कमाईत आधीच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २’ आणि ‘मुफासा’मुळे घट झाली.

‘बेबी जॉन’ची किती झाली कमाई?

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘बेबी जॉन’ने पहिल्या दिवशी देशभरात १२.५० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. रिलीजपूर्वी, आगाऊ बुकिंगमधून सिनेमाने ३.५२ कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर स्पॉट बुकिंगमधून मिळणाऱ्या कमाईतही वाढ झाली. ही कमाई वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आगाऊ बुकिंगसाठी ‘बेबी जॉन’ला तीन दिवसांचा अवधी मिळाला होता.

एक मास मूव्ही, ॲक्शन फिल्म आणि हॉलिडे रिलीज असल्याने ‘बेबी जॉन’ने पहिल्या दिवशी आणखी जास्त कमाई केली असती, पण असे झाले नाही. याचे कारण म्हणजे सकाळच्या आणि दिवसभराच्या शोजनंतर सायंकाळच्या आणि रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. ‘बेबी जॉन’चे बजेट १८५ कोटी रुपये आहे, सध्या ज्या बजेटचे चित्रपट बनतात त्या दृष्टीने हे फार नाही. त्यामुळे या चित्रपटाला अजूनही संधी आहे. रीलिजनंतर पहिलाच वीकेंड पाच दिवसांचा मिळाला आहे, त्यामुळे या कमाईत वाढ होऊ शकते. या वर्षातील आणखी एक हिट चित्रपट होण्याकडे ‘बेबी जॉन’ वाटचाल करू शकतो.

पुष्पा २ला अजूनही प्रेक्षकांची पसंती

२५ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ – द रुल’ पुन्हा हिंदी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पहिली पसंती राहिला. रिलीजच्या २१व्या दिवशी सिनेमाच्या हिंदी आवृत्तीमधून १५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तर पाचही भाषांचा समावेश केला असता, या सिनेमाने बुधवारी १९.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पुढचे काही दिवस या कमाईत घट होईल असे चिन्ह नाही. आतापर्यंत या सिनेमाने हिंदीमध्ये ११०९.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी व्हर्जनने आतापर्यंत ७१६.६५ कोटी, तर तेलुगू आवृत्तीने ३१६.३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

The post साऊथ Vs बॉलिवूड! अल्लू अर्जुन की वरुण धवन… बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? ‘बेबी जॉन’ची सुरुवात दणक्यात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112204 0