reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे राहणारा निलेश नेरपकर हा एका गरीब कुटुंबात जन्माला आला. घरची परिस्थिती हलाखीची असताना जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. चार वेळा भारतीय लष्कराची परीक्षा नापास होऊन सुद्धा हार न मानता पाचव्या प्रयत्नात त्याने मैदान मारले.निलेश हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ. आई वडील यांची इच्छा नसतानाही निलेशने सैन्य […]
The post चारवेळा लष्कर भरती परीक्षा नापास, सलून चालवत रात्रभर अभ्यास, पाचव्या प्रयत्नात मैदान मारलं first appeared on TEJPOLICETIMES.
]]>निलेश हा अभ्यासात तसा मागे होता. कधी काळी अजिबात अभ्यास न करणारा निलेश आज सैन्य दलाची परीक्षा पास होऊन भरती झाला. निलेशशी संपर्क केला असता त्याने संगितले की, मला अभ्यास करायचा कंटाळा येत होता. मी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. मी भडगाव येथे बीएला प्रवेश घेतला, मी परीक्षा दिली आणि चार विषयात नापास झालो. बारावीनंतर नापास झाल्याने मी दोन वर्षांपूर्वी एक सलून व्यवसाय सुरू केला आणि आई वडिलांना हातभार लावू लागलो. दुकान सांभाळून मी रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करायचो. माझी मोठी बहीण मला म्हणायची तू शाळेत असताना कधी अभ्यास केला नाही आणि काय सैन्य दलात भरती होणार आहे.
मी बारावी पास झाल्यानंतर पुन्हा बाराखडी व पाढे आणि स्पेलिंग पाठ करायला लागलो. कारण मला काहीच येत नव्हते. भडगाव येथे तीन महिन्यासाठी क्लास लावले. त्यानंतर मी स्वतः घरीच अभ्यास करू लागलो. मला माझ्या मित्रांनी प्रोत्साहन दिले आणि मी भारतीय लष्करात भरती झालो, याचा सर्वात मोठा आनंद माझ्या आई वडिलांना झाला. ज्या दिवशी मी भरती झालो, सर्वात आधी आईला फोन करून सांगितले, तुझा मुलगा देश सेवेसाठी भरती झाला आहे. आईला त्याच क्षणी डोळ्यात पाणी आले. आमच्या भाऊबंदकीमध्ये मीच पहिल्यांदा सैन्यात भरती झालो.
आपला मित्र सैन्य दलामध्ये भरती झाल्याचा आनंद मित्रांना गगनात मावेनासा झाला होता. निलेश गावात दाखल होताच त्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचलून डीजेच्या तालावर मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
The post चारवेळा लष्कर भरती परीक्षा नापास, सलून चालवत रात्रभर अभ्यास, पाचव्या प्रयत्नात मैदान मारलं first appeared on TEJPOLICETIMES.
]]>म. टा. वृत्तसेवा, निफाडलोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करणाऱ्या एका आईच्या कष्टाची जाणीव ठेवून अपूर्वा वाकोडे पोलिस भरती उतरली आणि नुसती पासच झाली नाही, तर पुणे शहर पोलिस दलात ती मुलींमध्ये प्रथम आली. ओझर येथील मरिमाता गेट येथे राहणारी अपूर्वा हिची नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत पुणे शहर पोलिस दलात वाहनचालक पदावर निवड झाली असून, ती मुलींमध्ये […]
The post Success Story: धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक भरतीत पहिली first appeared on TEJPOLICETIMES.
]]>अपूर्वाचा ज्या दिवशी पोलिस भरतीचा लेखी पेपर होता, त्याच दिवशी तिचे वडील नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. टेलरकाम करणारे राजू वाकोडे यांना पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता. याही स्थितीत अपूर्वाने जिद्द न सोडता लेखी परीक्षा दिली. पेपर देऊन संध्याकाळी घरी पोहचताच वडिलांनी जगाचा निरोप घेतला.
अपूर्वाची आई लोकांच्या घरोघरी जाऊन धुणीभांडी करते. वेळप्रसंगी द्राक्षबागेच्या व कांद्याच्या चाळीवर कामाला जाते. अपूर्वादेखील आईला या कामात मदत करते. काम करूनच तिने बी. कॉम. पूर्ण केले. दोन लहान भावांनाही शिक्षण पूर्ण करण्यास तिने प्रोत्साहन दिले. परिस्थिती नाजूक असतानाही त्याची तमा न बाळगता मोठ्या हिमतीने यश मिळवले.
तिच्या अंगी असलेली जिद्द आणि चिकाटी प्रेरणादायी आहे. एका कंपनीच्या माध्यमातून तिने मोटार ड्रायव्हिंग क्लास पूर्ण केला होता. या प्रशिक्षणानंतर तिने पोलिस वाहनचालक पदासाठी फॉर्म भरला होता.
The post Success Story: धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक भरतीत पहिली first appeared on TEJPOLICETIMES.
]]>IAS Smita Sabharwal Story: चित्रपट आणि टीव्हीमध्येच काम करणाऱ्या व्यक्तीच प्रसिद्ध असतात असे नाही. आपल्या देशात बरीच अशी लोक देखील आहेत जे आपल्या महान कार्यासाठी ओळखले जातात. आयएएस स्मिता सभरवाल हे असेच व्यक्तीमत्व आहे. आपण त्यांच्या संघर्षाविषयी जाणून घेऊया. स्मिता आयएएसच्या प्राथमिक परीक्षेत नापास झाल्या होत्या. सन २००० मध्ये त्यांनी दुसरा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी […]
The post Success Story: २३ व्या वर्षी स्मिता कशी बनली IAS? जाणून घ्या कहाणी first appeared on TEJPOLICETIMES.
]]>आयएएस स्मिता सभरवाल यांना जनता अधिकारी म्हणूनही ओळखले जाते. आयएएस अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या देशभरातील आयएएस इच्छुकांसाठी त्या एक प्रेरणा बनल्या आहेत. २००० च्या यूपीएससी परीक्षेत चौथी रँक मिळवून त्या आयएएस टॉपर बनल्या होत्या.
स्मिता या मूळच्या दार्जिलिंगच्या आहेत. स्मिता यांनी नववीपर्यंतचे शिक्षण हैदराबादमध्ये घेतले त्यानंतर सेंट अॅन्स, मरेडपल्ली, हैदराबाद येथून बारावी पूर्ण केली. त्यानी आयसीएसई बोर्डातून बारावीमध्ये ऑल इंडिया फर्स्ट रॅंक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेज फॉर वुमनमधून बी.कॉम केले.
आयएएस स्मिता सभरवाल या सन २००० च्या बॅचच्या IAS आहेत आणि आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतात. कठोर अभ्यास करूनच आपण नागरी सेवांमध्ये यश मिळू शकते, असा विचार करणे चुकीचे आहे. निवडीच्या अंतिम फेरीसाठी तुमच्या आवडीनिवडी आणि छंदही विचारात घेतले जातात. त्यामुळे याकडेही लक्ष द्या असा सल्ला त्या तरुणांना देतात.
The post Success Story: २३ व्या वर्षी स्मिता कशी बनली IAS? जाणून घ्या कहाणी first appeared on TEJPOLICETIMES.
]]>MPSC Exam Tips: सातारातील नांदल गावातील मुलगी ज्योती हिंदुराव कांबळे ही राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मधून एनटी सी महिला प्रवर्गातून राज्यातून प्रथम आली. तिने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. सध्या ती परिविक्षाधिन नायब तहसीलदार म्हणून नागपूर येथे प्रशिक्षण घेत आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण नांदल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षणही नांदल […]
The post MPSC Exam Tips: ज्योती कांबळे एनटीसी महिला प्रवर्गातून प्रथम,परीक्षेतील ‘या’ टिप्स तुमच्याही कामाच्या first appeared on TEJPOLICETIMES.
]]>शासकीय सेवेत जाणे हे प्रत्येक युवक-युवतीचे आकर्षण असते. त्यासाठी युवकांनी स्वपरिक्षण करणे, स्वतःची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत.
प्रशासनाच्या कामाचं स्वरूप कसं असणार आहे ह्या गोष्टी अगोदर समजून घेऊन स्पर्धा परीक्षेकडे वळणे महत्वाचे आहे.
इतर क्षेत्रातही खूप संधी आहेत. त्या संधीविषयी माहिती घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.
युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वळत असताना त्यांच्याकडे प्लॅन बी सुद्धा तयार असणे गरजेचे आहे. कारण योग्य वेळी निर्णय घेणे त्यामुळे सोयीचे ठरते.
त्यापुढे म्हणाल्या, मोठ्या भावाच्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश मिळवू शकले. कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर एमपीएससीची अभ्यास करणारी मुले तिथे भेटली. त्यामुळे आणखी माहिती मला मिळत गेली आणि आपण एमपीएससी करायचं याचा श्रीगणेशा खऱ्याअर्थाने सुरू झाला.
राज्यसेवा परीक्षा देत असताना मी कोणत्याही क्लासेसमध्ये प्रवेश घेतला नाही. तर सेल्फ स्टडीवर जास्त भर दिला होता. युट्युबवर व्हिडिओ पाहणे, रेफरन्स बुक, पॉईंट्स कव्हर करणे, गुगल सर्च करून माहिती घेणे, सोशल मीडियावरील स्टडी चॅनलवर अभ्यास करणे, टेलिग्रामचा सेल्फ स्टडीसाठी फायदा करुन घेणे आणि मुलाखतीच्या तयारीसाठी दररोज वर्तमानपत्रांचे वाचन केल्याचे ती सांगते.
पहिल्यापासूनच माझा अकॅडमी चांगला असल्यामुळे, नक्की यशस्वी होईल यावर कुटुंबीयांचा विश्वास होता. घरातून कोणत्याही प्रकारचे प्रेशर नव्हतं. त्यामुळे माझ्यावर कोणताही ताणतणाव नव्हता. भाऊ, वहिनी व मोठी बहीण यांचा नेहमीच मला खंबीर पाठिंबा राहिला. आई-वडील शेतीचे काम करत असले, तरी त्यांचा या यशात मोठा वाटा राहिला आहे. मुलगी म्हणून मला त्यांनी शिक्षणाची कवाडे उघडून दिल्याने मला हे यश संपादन करता आल्याचे ती सांगते.
उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना समाजासाठी प्रशासनाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे कळायला लागले. आकर्षण निर्माण झाले, की या क्षेत्रात काम करायला भरपूर संधी आहेत आणि ग्रामीण भागाच्या समस्या प्रशासनासाठी महत्त्वाच्या रोल आहे. ही माहिती समजल्यामुळे असं वाटलं, की प्रशासनाच्या माध्यमातून खूप काही करू शकतो. स्वतः प्रतिनिधित्व करून या माध्यमातून कुठेतरी व्यापक स्तरावर काम करता येईल, याची मला जाणीव झाल्याचे ज्योती सांगते.
The post MPSC Exam Tips: ज्योती कांबळे एनटीसी महिला प्रवर्गातून प्रथम,परीक्षेतील ‘या’ टिप्स तुमच्याही कामाच्या first appeared on TEJPOLICETIMES.
]]>Success Story: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोजने लहानपणापासूनच आयुष्यात खूप पाहिला आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा ती केवळ १४ वर्षांची होती. त्यानंतर कुटुंब आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. इल्मा अफरोजनेही अभ्यासासोबत आईला शेतात मदत करायला सुरुवात केली.मुरादाबाद येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इल्मा अफरोजने सेंट स्टीफन्स, दिल्ली […]
The post Success Story: गरिबीमुळे शेतात राबली, परदेशी नोकरी नाकारुन शेतकऱ्याची मुलगी इल्मा बनली आयपीएस first appeared on TEJPOLICETIMES.
]]>इल्माकडे त्यावेळी परदेशात जाण्यासाठी तिकीटासाठी पैसे नव्हते. यासाठी तिने गावातील चौधरी दादांची मदत घेतली. तिला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली. पण खर्च पूर्ण करण्यासाठी तिने शिकवणी तसेच मुलांना संभाळण्याचे काम हातात घेतले. दरम्यान, ती आता परदेशात राहणार असून भारतात परतणार नसल्याचे तिच्या गावकऱ्यांनी तिच्या आईला सांगायला सुरुवात केली होती.
पोस्ट ग्रॅज्युएशननंतर, इल्मा अफरोज एका स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. तिथे तिला फायनान्शिअल इस्टेट कंपनीत उत्तम नोकरीची ऑफर मिळाली. पण आपल्या शिक्षणावर आईचा आणि देशाचा हक्क आहे, असे तिला सतत वाटायाचे. म्हणूनच भारतात परतून तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०१७ मध्ये, इल्माने नागरी सेवा परीक्षेत २१७ वा क्रमांक मिळविला. तेव्हा ती २६ वर्षांची होती. सध्या ती शिमल्यात एसपी एसडीआरएफ म्हणून तैनात आहेत.
The post Success Story: गरिबीमुळे शेतात राबली, परदेशी नोकरी नाकारुन शेतकऱ्याची मुलगी इल्मा बनली आयपीएस first appeared on TEJPOLICETIMES.
]]>