Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
MPSC Exam Tips: ज्योती कांबळे एनटीसी महिला प्रवर्गातून प्रथम,परीक्षेतील ‘या’ टिप्स तुमच्याही कामाच्या
ज्योती कांबळेने ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी पुढील टिप्स शेअर केल्या आहेत.
शासकीय सेवेत जाणे हे प्रत्येक युवक-युवतीचे आकर्षण असते. त्यासाठी युवकांनी स्वपरिक्षण करणे, स्वतःची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत.
प्रशासनाच्या कामाचं स्वरूप कसं असणार आहे ह्या गोष्टी अगोदर समजून घेऊन स्पर्धा परीक्षेकडे वळणे महत्वाचे आहे.
इतर क्षेत्रातही खूप संधी आहेत. त्या संधीविषयी माहिती घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.
युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वळत असताना त्यांच्याकडे प्लॅन बी सुद्धा तयार असणे गरजेचे आहे. कारण योग्य वेळी निर्णय घेणे त्यामुळे सोयीचे ठरते.
त्यापुढे म्हणाल्या, मोठ्या भावाच्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश मिळवू शकले. कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर एमपीएससीची अभ्यास करणारी मुले तिथे भेटली. त्यामुळे आणखी माहिती मला मिळत गेली आणि आपण एमपीएससी करायचं याचा श्रीगणेशा खऱ्याअर्थाने सुरू झाला.
राज्यसेवा परीक्षा देत असताना मी कोणत्याही क्लासेसमध्ये प्रवेश घेतला नाही. तर सेल्फ स्टडीवर जास्त भर दिला होता. युट्युबवर व्हिडिओ पाहणे, रेफरन्स बुक, पॉईंट्स कव्हर करणे, गुगल सर्च करून माहिती घेणे, सोशल मीडियावरील स्टडी चॅनलवर अभ्यास करणे, टेलिग्रामचा सेल्फ स्टडीसाठी फायदा करुन घेणे आणि मुलाखतीच्या तयारीसाठी दररोज वर्तमानपत्रांचे वाचन केल्याचे ती सांगते.
पहिल्यापासूनच माझा अकॅडमी चांगला असल्यामुळे, नक्की यशस्वी होईल यावर कुटुंबीयांचा विश्वास होता. घरातून कोणत्याही प्रकारचे प्रेशर नव्हतं. त्यामुळे माझ्यावर कोणताही ताणतणाव नव्हता. भाऊ, वहिनी व मोठी बहीण यांचा नेहमीच मला खंबीर पाठिंबा राहिला. आई-वडील शेतीचे काम करत असले, तरी त्यांचा या यशात मोठा वाटा राहिला आहे. मुलगी म्हणून मला त्यांनी शिक्षणाची कवाडे उघडून दिल्याने मला हे यश संपादन करता आल्याचे ती सांगते.
उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना समाजासाठी प्रशासनाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे कळायला लागले. आकर्षण निर्माण झाले, की या क्षेत्रात काम करायला भरपूर संधी आहेत आणि ग्रामीण भागाच्या समस्या प्रशासनासाठी महत्त्वाच्या रोल आहे. ही माहिती समजल्यामुळे असं वाटलं, की प्रशासनाच्या माध्यमातून खूप काही करू शकतो. स्वतः प्रतिनिधित्व करून या माध्यमातून कुठेतरी व्यापक स्तरावर काम करता येईल, याची मला जाणीव झाल्याचे ज्योती सांगते.