Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
home department - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 03 Dec 2024 02:48:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg home department - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Eknath Shinde: एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा, सेनेच्या नेत्याची मागणी, महायुतीतील तिढा सुटणार? https://tejpolicetimes.com/?p=111031 https://tejpolicetimes.com/?p=111031#respond Tue, 03 Dec 2024 02:48:34 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111031 Eknath Shinde: एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा, सेनेच्या नेत्याची मागणी, महायुतीतील तिढा सुटणार?

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे हे दिलदार नेते आहेत. त्यांचा मान राखला गेला पाहिजे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री हे फडणवीस होतील याची शक्यता ९९ टक्के असल्याचंही ते म्हणाले. हायलाइट्स: राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन तिढा कायम एकनाथ शिंदेंचा मान राखला जावा दीपक केसरकर यांची मागणी महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: संपूर्ण राज्य अजूनही […]

The post Eknath Shinde: एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा, सेनेच्या नेत्याची मागणी, महायुतीतील तिढा सुटणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Eknath Shinde: एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा, सेनेच्या नेत्याची मागणी, महायुतीतील तिढा सुटणार?

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे हे दिलदार नेते आहेत. त्यांचा मान राखला गेला पाहिजे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री हे फडणवीस होतील याची शक्यता ९९ टक्के असल्याचंही ते म्हणाले.

हायलाइट्स:

  • राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन तिढा कायम
  • एकनाथ शिंदेंचा मान राखला जावा
  • दीपक केसरकर यांची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: संपूर्ण राज्य अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा करत आहे. कारण, महायुतीकडून आत्तापर्यंत ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजूनही महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही प्रकृतीचे कारण देत सर्व सभा रद्द केल्या तसेच, त्यांनी भेटीगाठीही टाळल्या. त्यानंतर भाजपचे संकटमोचक म्हणजेच गिरीश महाजन यांनी शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे. या बैठकीत शिंदेंची नाराजी दूर करत महायुतीतील तिढा सोडवण्याचा प्रयत्न महाजनांनी केल्याचं सांगण्यात येत आहे. तर, यादरम्यान अजित पवार यांनी सुपुत्र पार्थ पवारांसह थेट दिल्ली गाठत अमित शाहांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अद्याप मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा नाही

महायुतीच्या मंत्रिमंडळाबाबत अजूनही निर्णय झालेला दिसत नाही. अनक बड्या विभागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं एकंदरीत चित्र दिसत आहे. कारण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून गृह खात्यासह तीन मोठ्या मंत्रिपदांची मागणी केली जात असून, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
Maharashtra CM: फडणवीस नाही तर रवींद्र चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री? दिल्लीत चाललंय काय? तावडे-शाहांमध्ये बैठक
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन जो तिढा निर्माण झाला आहे, त्याबाबत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दली आहे. “काहीही झालं तरी सरकार स्थापन होत आहे. शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला निश्चित करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात सरकार स्थापन होत नाहीये, हे म्हणणं चुकीचं आहे. भाजपने आज निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे लवकरच मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली जाईल”, असं केसरकर म्हणाले.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा, सेनेच्या नेत्याची मागणी, महायुतीतील तिढा सुटणार?

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असेल, हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. गृहखातं हे एकट्या गृहमंत्र्यांना चालवता येत नाही. हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री संयुक्तपणे चालवतात. राज्यांमध्ये गृहखात्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची ९९ टक्के शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे दिलदार नेते आहेत, त्यांचा मान राखायला हवा, असंही केसरकर म्हणाले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post Eknath Shinde: एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा, सेनेच्या नेत्याची मागणी, महायुतीतील तिढा सुटणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111031 0
पालघरमधील पोलिस ठाणी ‘नॉट रीचेबल’; देयक थकवल्याने ४ महिन्यांपासून मोबाइल खंडित https://tejpolicetimes.com/?p=78923 https://tejpolicetimes.com/?p=78923#respond Wed, 17 Jan 2024 08:35:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=78923 पालघरमधील पोलिस ठाणी ‘नॉट रीचेबल’; देयक थकवल्याने ४ महिन्यांपासून मोबाइल खंडित

म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या १६ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध अधिकारी यांना गृह विभागातर्फे देण्यात आलेल्या मोबाइलची सेवा मागील चार महिन्यांपासून खंडित करण्यात आली आहे. बिल न भरल्यामुळे संबंधित मोबाइल कंपनीने जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्यांची मोबाइल सेवा खंडित […]

The post पालघरमधील पोलिस ठाणी ‘नॉट रीचेबल’; देयक थकवल्याने ४ महिन्यांपासून मोबाइल खंडित first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पालघरमधील पोलिस ठाणी ‘नॉट रीचेबल’; देयक थकवल्याने ४ महिन्यांपासून मोबाइल खंडित

म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या १६ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध अधिकारी यांना गृह विभागातर्फे देण्यात आलेल्या मोबाइलची सेवा मागील चार महिन्यांपासून खंडित करण्यात आली आहे. बिल न भरल्यामुळे संबंधित मोबाइल कंपनीने जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्यांची मोबाइल सेवा खंडित केली आहे. यामुळे पोलिसांना संपर्क साधणे नागरिकांना कठीण झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, ठाणे अंमलदार यांच्यासह पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनेक महत्त्वपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांना सात वर्षांपूर्वी आयडिया कंपनीचे सिमकार्ड पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले होते. अधिकारी व कर्मचारी बदलले, तरी संपर्क क्रमांक तोच असल्याने नागरिकांना ते सोयीचे झाले होते. त्यामुळे बहुतांश अधिकारी, कर्मचारी यांचे खासगी संपर्क क्रमांक उपलब्ध नाहीत. त्यातच मागील चार महिन्यांपासून पोलिस अधीक्षक कार्यालयांसह पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचे मोबाइल ‘नॉट रीचेबल’ झाल्यामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर, जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयाची निर्मितीही लागलीच करण्यात आली. तीन वर्षानंतर पालघर पोलिस अधीक्षक कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या वसई, विरार, नालासोपारा येथील पोलिस ठाण्यांच्या कारभारासाठी मिरा-भाईंदर, विरार-वसई पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक व पोलिस आयुक्तालय त्यांचे पोलिस ठाण्यांना दिलेल्या सुविधांसंबंधीचे आर्थिक व्यवहार अजूनही एकत्रित आहेत. त्यामुळे मोबाइलच्या बिलांच्या प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. वसई-विरार वगळता उर्वरित पालघर जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांसह पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मोबाइल बिल भरण्यासाठी निधी नसल्याने, त्यांची सेवा कंपनीने खंडित केली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

मोबाइल आल्यानंतर भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची लँडलाइन सुविधा केव्हाच तडीपार झाली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल हा एकमेव पर्याय आहे. परंतु फोन लावल्यानंतर ‘आऊट ऑफ सर्व्हिस’ अशी टेप वाजत आहे.

जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हे मोबाइल फोन बंद असल्याचे खासगीत मान्य केले. मात्र त्याबाबत उघड काहीही बोलणे टाळले. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष विचारणा केली असता, पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
पोलिस खात्यात मोठी खांदेपालट; PSI अन् API बदलले, कोणाची कुठे झाली बदली? वाचा लिस्ट
२०२०ची पुनरावृत्ती

सन २०२०मध्येही पोलिस अधीक्षक कार्यालयात मोबाइलचे बिल भरण्यासाठी निधी नसल्याने अशाच प्रकारे तीन महिने मोबाइल सेवा बंद पडली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.

मोठी नामुष्की

प्रचंड वर्दळीच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर होणारे अपघात, गुजरात आणि सागरी सीमेवरून होणारी तस्करी, वाढत्या घरफोड्या यामुळे पोलिसांच्या कामगिरीकडे लक्ष लागलेले असते. त्याशिवाय, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, बोईसर एमआयडीसी, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आदी संवेदनशील प्रकल्प या जिल्ह्यात आहेत. तरीही या दुर्गम, आदिवासीबहुल जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे व पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मोबाइल बिल न भरल्यामुळे बंद पडणे ही मोठीच नामुष्की असल्याची चर्चा रंगली आहे.

Source link

The post पालघरमधील पोलिस ठाणी ‘नॉट रीचेबल’; देयक थकवल्याने ४ महिन्यांपासून मोबाइल खंडित first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=78923 0