तर पोल्स ऑफ पोलच्या अंदाजानुसार महायुतीच राज्यात सरकार स्थापन करणार असे चित्र आहे. आकडेवारीनुसार राज्यात महायुतीला १५५ जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला १२२ जागांवर समाधान मानावे लागेल. २८८ पैकी ११ जागा या अन्यला मिळतील असे चित्र आहे.Maharashtra Exit Polls Highlights: महाराष्ट्रात पुन्हा भाजपच! एक्झिट पोलचे निकाल काय सांगतात? मविआला धक्का
दरम्यान, लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीदरम्यान जरांगे फॅक्टर निर्णायक ठरु शकतो असे चित्र निर्माण झाले होते. परंतु ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले होते. तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील निर्माण झाला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. या सर्व गोष्टींचा भाजपला निवडणुकीत फटका बसणार असे मानले जात होते. परंतु एक्झिट पोलच्या आकडेवारीने हे खोटे ठरवले आहे. राज्यात महायुतीच्या पारडं जड होणार असल्याचे अंदाज आहेत. आणि भाजपच पुन्हा मोठा पक्ष ठरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टरचा प्रभाव विधानसभा निवडणूकीत काम करणार नसल्याचे हे अंदाज सांगत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेताना तेव्हा त्यांनी आपला कोणत्याही पक्षाला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले होते. मराठा बांधवांनी ज्यांना वाटेल त्यांना मतदान करावे, मात्र आरक्षण डोक्यात ठेवा, असेही खडसावून सांगितले.