Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
maharashtra assembly elections - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 25 Nov 2024 09:51:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg maharashtra assembly elections - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 बीडमध्ये मंत्रिपदाचे चार दावेदार, मुंडे बहीण-भावातच शर्यत, वरिष्ठांसमोर मोठा पेच https://tejpolicetimes.com/?p=110077 https://tejpolicetimes.com/?p=110077#respond Mon, 25 Nov 2024 09:51:27 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110077 बीडमध्ये मंत्रिपदाचे चार दावेदार, मुंडे बहीण-भावातच शर्यत, वरिष्ठांसमोर मोठा पेच

Who Will Be The Minister From Beed: बीडमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवला. पण, आता महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण, बीडमध्ये मंत्रिपदासाठी चार नावं चर्चेत आहेत. Lipi दीपक पडकर, बीड: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झालेल्या बीड जिल्ह्यात मंत्री पदासाठी चार जण दावेदार असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या बीड जिल्ह्यात विधानसभा […]

The post बीडमध्ये मंत्रिपदाचे चार दावेदार, मुंडे बहीण-भावातच शर्यत, वरिष्ठांसमोर मोठा पेच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बीडमध्ये मंत्रिपदाचे चार दावेदार, मुंडे बहीण-भावातच शर्यत, वरिष्ठांसमोर मोठा पेच

Who Will Be The Minister From Beed: बीडमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवला. पण, आता महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण, बीडमध्ये मंत्रिपदासाठी चार नावं चर्चेत आहेत.

Lipi

दीपक पडकर, बीड: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झालेल्या बीड जिल्ह्यात मंत्री पदासाठी चार जण दावेदार असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला सहापैकी पाच जागांवर धोबीपछाड दिली आहे.

बीडमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला तो धनंजय मुंडे यांनी, शरद पवारांचे चक्रव्यूह भेदत मिळवलेला हा विजय सर्वात मोठा होता. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला जेमतेम २५ टक्के मतं मिळवता आली. त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार ठरले आहेत.

आपल्या रांगड्या स्वभावामुळे ओळखले जाणारे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे सुरेश धस यांनीतर चौरंगी लढतीत थोडी थोडकी नव्हे तर ७८ हजारांपर्यंत मताधिक्य मिळवले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून सुरेश धस यांची ओळख आहे. यामुळेच ते मंत्रिपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
Eknath Shinde: तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, नव्या आमदारांचा एक सूर; एकनाथ शिंदेंचं सूचक उत्तर, म्हणाले…
बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि तब्बल पाचव्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके हे देखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेल्या सरकारमध्ये प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद न भेटल्याने ते नाराज असल्याचे दिसून आले होते. त्यांची नाराजगी पक्षाला परवडणारी नसेल म्हणून तेही मंत्रिपदाचे दावेदार आहेत.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या जरी विधान परिषदेवर आमदार असल्या तरी देखील विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी महायुतीसाठी सभा घेतलेल्या २७ पैकी २३ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यामुळे भाजपाला त्यांना डावलता येणार नाही. तसेच, ओबीसी आक्रमक चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांना भाजपाला याचा मोठा फायदा भविष्यात होऊ शकतो. यामुळेच पंकजा मुंडेही मंत्रिपदाच्या दावेदार असतील.

Beed News: मुंडे बहीण-भाऊ निवडणुकीत एकत्र, मंत्रिपदासाठी आमनेसामने, बीडमध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

आता बीड जिल्ह्यात मंत्रिपदासाठी हे प्रमुख चार दावेदार असल्याने नेमके मंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच महायुतीची देखील मोठी कसोटी लागणार आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post बीडमध्ये मंत्रिपदाचे चार दावेदार, मुंडे बहीण-भावातच शर्यत, वरिष्ठांसमोर मोठा पेच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110077 0
राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम https://tejpolicetimes.com/?p=109979 https://tejpolicetimes.com/?p=109979#respond Sun, 24 Nov 2024 15:48:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109979 राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम

Maharashtra Election Result: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली. महाविकास […]

The post राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम

Maharashtra Election Result: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली. महाविकास आघाडीला केवळ ५० जागा मिळाल्या आहेत. आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना मिळून ४६ जागा मिळालेल्या आहेत. तर महायुतीत एकट्या शिवसेनेचे तब्बल ५७ उमेदवार निवडून आलेले आहेत.

महायुतीच्या विजयामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य अंधारात आहे. दारुण पराभवातून सावरुन उभारी घेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेची पुढील वाट आता बिकट झालेली आहे. सध्या सुरु असलेली आपली राज्यसभेची अखेरची टर्म असेल असं शरद पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले. त्यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. पण संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांचं काय होणार हा प्रश्न कायम आहे.
त्यांनी गद्दारी केलीय, पालकमंत्री होऊ देणार नाही! सेना आमदाराचा संताप; महायुतीत ठिणगी
महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाला २०, काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी शपला १० जागा मिळाल्या. त्यांचं एकत्रित संख्याबळ ४६ च्या घरात जातं. तिन्ही पक्षांचा सुफडासाफ झाल्यानं शरद पवार, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची पुढील टर्म मिळणं कठीण आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्यासाठी ४३ चा कोटा आहे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी मिळून केवळ एकालाच राज्यसभेवर पाठवू शकते. अंतर्गत राजकारण पाहता अशा परिस्थितीत एकाच्या नावावर सगळेच सहमत होणं अवघड आहे.
Raj Thackeray: लेक पडला, पक्षाला भोपळा; आता मनसेची मान्यता धोक्यात, राज ठाकरेंसमोर संकट; परिणाम काय होणार?
ऑगस्ट २०२१ मध्ये एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खासदार चतुर्वेदी यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा किस्सा सांगितला होता. २०२० मध्ये चतुर्वेदींनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. ‘मला पक्षप्रवेशाचा दिवस आजही आठवतो. आज माझ्यासाठी एक बहीण आलीय, असं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. तो क्षण भावुक करणारा होता,’ असं चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते.

प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२० पासून सुरु झाला. त्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२६ मध्ये संपेल. याच दिवशी शरद पवारांचाही राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. संजय राऊत १ जुलै २०२२ रोजी राज्यसभेवर निवडून गेले. त्यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109979 0
आदिवासींचे भरभरुन मतदान; दिंडोरीत विक्रम, घोटी-इगतपुरीतही दिवसभर मतदारांच्या रांगा https://tejpolicetimes.com/?p=109544 https://tejpolicetimes.com/?p=109544#respond Thu, 21 Nov 2024 03:07:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109544 आदिवासींचे भरभरुन मतदान; दिंडोरीत विक्रम, घोटी-इगतपुरीतही दिवसभर मतदारांच्या रांगा

Maharashtra Assembly Election 2024: इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात आदिवासींनी घराबाहेर पडत भरभरून मतदान केले. महाराष्ट्र टाइम्सadivasi voting म. टा. वृत्तसेवा, घोटी : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात आदिवासींनी घराबाहेर पडत भरभरून मतदान केले. परिणामी, मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत ७२.२१ टक्के मतदान झाले होते. घोटी, इगतपुरी, वाडीवडे आदी शहरी भागात दुपारनंतर गर्दी वाढल्याचे चित्र होते. या मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत […]

The post आदिवासींचे भरभरुन मतदान; दिंडोरीत विक्रम, घोटी-इगतपुरीतही दिवसभर मतदारांच्या रांगा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आदिवासींचे भरभरुन मतदान; दिंडोरीत विक्रम, घोटी-इगतपुरीतही दिवसभर मतदारांच्या रांगा

Maharashtra Assembly Election 2024: इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात आदिवासींनी घराबाहेर पडत भरभरून मतदान केले.

महाराष्ट्र टाइम्स
adivasi voting

म. टा. वृत्तसेवा, घोटी : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात आदिवासींनी घराबाहेर पडत भरभरून मतदान केले. परिणामी, मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत ७२.२१ टक्के मतदान झाले होते. घोटी, इगतपुरी, वाडीवडे आदी शहरी भागात दुपारनंतर गर्दी वाढल्याचे चित्र होते. या मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत पस्तीस टक्के, तर तीनपर्यंत ५२.६८ टक्क्यांपर्यंत मतदान गेले होते.

महिलांमध्येही मतदानासाठी अभूतपूर्व उत्साह होता. महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर, अपक्ष निर्मला गावित, मनसेचे काशीनाथ मेंगाळ, घोटीचे अपक्ष उमेदवार जयप्रकाश शिवराम झोले यांनी घोटी मतदान केंद्रांवर भेटी देऊन परिस्थितीचा धावता आढावा घेतला. सहायक निवडणूक अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी घोटी, इगतपुरी आदी भागांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. घोटीतील मतदान केंद्रावर एका वयोवृद्ध महिलेलाही खुद्द सहायक निवडणूक अधिकारी बारावकर यांनी केंद्रापर्यंत मदतीचा हात दिला.
आधी मतदान, मग लग्न! मतदान केल्यानंतरच नवरी चढली बोहल्यावर, नागपूरच्या नेहाचं सर्वत्र कौतुक
अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील व पथक नियंत्रण ठेवून होते. ‘ईव्हीएम ‘मध्ये बिघाड इगतपुरी शहरालगत असलेल्या तळेगाव मतदान केंद्रावर मतदान यंत्रात एकाच उमेदवाराला मत जात असल्याच्या भावनेतून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी प्रशासन व निवडणूक यंत्रणेने तात्काळ मतदान केंद्रस्थळी धाव घेत माहिती घेतली. तांत्रिक दोष दूर करून मतदान पुन्हा सुरळीत झाले. बारावकर यांनी मतदान सुरळीत असल्याचे नमूद केले.
राज्यात मतटक्का वधारला! विधानसभेसाठी सरासरी ६२ टक्के मतदान, दिग्गजांचे भवितव्य मतदानपेटीत बंद
त्र्यंबकमध्येही वाढला उत्साह
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ग्रामीण भागात सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी पाचपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. सरासरी ७० टक्के मतदान झाले. नूतन त्र्यंबक विद्यालयातील एका मतदान केंद्रावर रांगेत मतदार उभे असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी मतदान प्रक्रिया थांबवली. तोपर्यंत मतदार ताटळकत उभे राहिले होते. बाहेरगावी वास्तव्यास असलेले मतदारही उपस्थित राहिले. साधू-महंतांनीही मतदानाचा हक्क बजावला. माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार यांचा हात मोडलेला असताना त्यांनी दवाखान्यातून थेट मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post आदिवासींचे भरभरुन मतदान; दिंडोरीत विक्रम, घोटी-इगतपुरीतही दिवसभर मतदारांच्या रांगा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109544 0
राज्यात आज मतसंग्राम! ४१३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला https://tejpolicetimes.com/?p=109403 https://tejpolicetimes.com/?p=109403#respond Wed, 20 Nov 2024 00:33:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109403 राज्यात आज मतसंग्राम! ४१३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात आज, बुधवारी मतदान होत असून लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. एक लाखाहून अधिक मतदारकेंद्रांत होणाऱ्या या मतदानासाठी तब्बल चार हजार १३४ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सvote 1600 मुंबई : सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीसाठी निकराची लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज, […]

The post राज्यात आज मतसंग्राम! ४१३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राज्यात आज मतसंग्राम! ४१३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात आज, बुधवारी मतदान होत असून लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. एक लाखाहून अधिक मतदारकेंद्रांत होणाऱ्या या मतदानासाठी तब्बल चार हजार १३४ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतपेटीत बंद होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
vote 1600

मुंबई : सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीसाठी निकराची लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत आहे. देशातील आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची सूत्रे पुढील पाच वर्षांसाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवायची याचा राज्यातील जवळपास साडेनऊ कोटीहून अधिक मतदारांचा फैसला मतदानयंत्रात बंद होणार आहे.

महायुती, महाविकास आघाडी आणि छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची तसेच त्यांच्या राजकीय वारसदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी वाजल्यापासून राज्यभरात एकाचवेळी मतदानाला सुरुवात होईल. मतदान प्रक्रिया मोकळ्या आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण सज्जता केली आहे. मात्र, मतदानाच्या काही तास अगोदर राज्यात घडलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटना आणि मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे घडलेले प्रकार लक्षात घेता निवडणूक आयोगासमोर निवडणुका शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचा पट बदलला. २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु, एकनाथ शिंदे यांनी जून २०२२मध्ये बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, पढे शिंदेंच्या नेतृत्वात युतीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्वतंत्र चूल मांडली. या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानसभेसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्या महाविकास आघाडीने आव्हान दिले आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यासारख्या छोट्या-मोठ्या पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरू पाहत आहे.
Nandurbar News: असह्य वेदना, रस्ता नसल्यानं गर्भवतीसाठी केली बांबूची झोळी; पण रुग्णालय गाठण्याआधीच…
पक्षफुटीचा तडाखा सहन करावा लागलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत कस लागला आहे. त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांना धडा शिकविण्यासाठी दोघांनीही कंबर कसली आहे. शरद पवार यांची बारामती विधानसभा मतदारसंघात कसोटी लागली आहे. पुतण्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आव्हान परतून लावण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावला आहे. बारामतीत शरद पवार गटाचे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होत आहे.

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील याचिका प्रलंबित असताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयातील लढाईत पूर्ण शक्ती लावली आहे. आघाडीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसला राज्याच्या सत्तेत पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
कैलास गेहलोत अखेर भाजपमध्ये; ‘आप’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच निर्णय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीत सार्वधिक जागा लढवत असून दोन वेळेला मुख्यमंत्रिपदाची संधी हुकलेल्या फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची बनली आहे. महायुतीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी निर्णायक आमदार निवडून आणण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रणनीती आखली आहे. तर, विधानसभा निवडणुकीनंतर संधी मिळाली तर किंगमेकरच्या भूमिकेत राहता यावे यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. त्यामुळे महायुतीच्या या तिन्ही नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे.

एकूण जागा २८८
एकूण उमेदवार ४,१३६
एकूण मतदार ९,७०,२५,११९
राज्यातील संवेदनशील ९९० मतदान केंद्रे
सरासरी मतटक्का २०१९
राज्य ६१.४४%
मुंबई ४९.९%
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६

भाजपची मोठी कारवाई; नाशिकच्या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी
आपले मत, अमूल्य मत
मुंबईसह राज्यात आज, बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे; आणि त्याचबरोबर कर्तव्यही. आपल्या हक्काची जाणीव ठेवून मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायला हवे. ‘आपल्या एका मताने काय फरक पडतो’, असे म्हणत मतदान टाळू नका. आपल्या नियमित कामाचे वेळापत्रक पाळूनही मतदान करता येणे शक्य आहे. आवश्यक ती कागदपत्रे बरोबर बाळगा आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, आपल्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून मतदान करा आणि आपली लोकशाही सबळ, सुदृढ करण्यास साह्य करा.
नऊ वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या; सांताक्रूझमध्ये दुकानाच्या छतावर आढळला मृतदेह, घटनेनं खळबळ
राजकीय वारसदारांसाठी निकराची लढाई मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश आणि नितेश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित, काँग्रेस नेते रणजित देशमुख यांचे चिरंजीव आशीष, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह, भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष, खासदार संदिपानराव भुमरे यांचे चिरंजीव विलास, माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर अशा सर्व राजकीय वारसदारांसाठी अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post राज्यात आज मतसंग्राम! ४१३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109403 0
निवडणूक निकालानंतर कुठेही बेकायदा होर्डिंग नको; उच्च न्यायालयाने सरकार, महापालिकांना भरला दम https://tejpolicetimes.com/?p=109302 https://tejpolicetimes.com/?p=109302#respond Tue, 19 Nov 2024 08:48:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109302 निवडणूक निकालानंतर कुठेही बेकायदा होर्डिंग नको; उच्च न्यायालयाने सरकार, महापालिकांना भरला दम

Maharashtra Elections 2024: निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्यात कुठेही बेकायदा होर्डिंग, बॅनरबाजी होता कामा नये, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. महाराष्ट्र टाइम्सpolitician1 मुंबई :‘विधानसभा निवडणुकीचा शनिवारी निकाल लागल्यानंतर राज्यात कुठेही बेकायदा होर्डिंग, बॅनरबाजी होता कामा नये. यादृष्टीने सर्व जिल्ह्यांतील प्रशासनांनी, महापालिका व नगरपालिकांनी अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे आणि बेकायदा होर्डिंग, बॅनर लागल्याचे दिसताच […]

The post निवडणूक निकालानंतर कुठेही बेकायदा होर्डिंग नको; उच्च न्यायालयाने सरकार, महापालिकांना भरला दम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
निवडणूक निकालानंतर कुठेही बेकायदा होर्डिंग नको; उच्च न्यायालयाने सरकार, महापालिकांना भरला दम

Maharashtra Elections 2024: निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्यात कुठेही बेकायदा होर्डिंग, बॅनरबाजी होता कामा नये, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

महाराष्ट्र टाइम्स
politician1

मुंबई :‘विधानसभा निवडणुकीचा शनिवारी निकाल लागल्यानंतर राज्यात कुठेही बेकायदा होर्डिंग, बॅनरबाजी होता कामा नये. यादृष्टीने सर्व जिल्ह्यांतील प्रशासनांनी, महापालिका व नगरपालिकांनी अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे आणि बेकायदा होर्डिंग, बॅनर लागल्याचे दिसताच ते काढून कारवाईची पावले उचलावी. यासंदर्भात त्या-त्या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांनी आणि शहरांतील पोलिस आयुक्तांनीही स्थानिक प्रशासनांना आवश्यक ते पोलिस बळ पुरवावे’, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

तसेच ही कारवाई यशस्वी होईल याची खबरदारी राज्याच्या गृह विभागाच्या सचिवांनी, पोलिस महासंचालकांनी व महापालिका प्रशासन विभागाच्या संचालकांनी घ्यावी, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. ‘सुस्वराज्य फाऊंडेशन’ने अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेसह अन्य जनहित याचिकांवर उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०१७ रोजीच कारवाईचे अनेक निर्देश दिले होते. तरीही अनेक शहरांत त्याचे पालन होत नसल्याने उच्च न्यायालयाने स्वतःहूनच ‘सुओ मोटो’ अवमान याचिका दाखल करून घेतल्या होत्या. मात्र, अवमान याचिकांवर सुनावणी घेण्याऐवजी उच्च न्यायालयाने मूळ जनहित याचिका पुनरुज्जीवित केली आहे.
नऊ वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या; सांताक्रूझमध्ये दुकानाच्या छतावर आढळला मृतदेह, घटनेनं खळबळ
‘राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी न्यायालयीन आदेश, राज्य सरकारचे जीआर व परिपत्रकांप्रमाणे बेकायदा होर्डिंग, बॅनर हटवण्याची विशेष मोहीम राबवावी. तसेच महापालिका आयुक्त व नगरपालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतःहून प्रतिज्ञापत्र दाखल करत माहिती सादर करावी, असे ९ ऑक्टोबर रोजीचे उच्च न्यायालयाचे निर्देश होते. तरीही काही महापालिकांनी उपमुख्य आयुक्तांमार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सोलापूर महापालिकेने तर एकही बेकायदा होर्डिंग आढळले नसल्याचा दावा केला आहे’, असे वारुंजीकर यांनी सोमवारच्या सुनावणीत खंडपीठाच्या निदर्शनास तर, ‘पालिका प्रशासनांनी याप्रश्नी सरकारी आदेश, जीआर यांची अंमलबजावणी करण्यासाठी कालबद्ध आराखडा सादर करणे अपेक्षित असताना प्रतिज्ञापत्रात त्याविषयी काहीच म्हटलेले नाही’, असे अॅड. मनोज शिरसाट यांनी निदर्शनास आणले.

आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा अभिनंदन वगैरेच्या बेकायदा होर्डिंग, बॅनरचा सुळसुळाट होईल, अशी भीतीही वकिलांनी व्यक्त केली. त्यानंतर खंडपीठाने कारवाईचा हा आदेश दिला आणि पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी प्राधान्याने ठेवली.
भाजपची मोठी कारवाई; नाशिकच्या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी
राजकीय पक्षांनाही केले सावध
‘आपले कार्यकर्ते बेकायदा होर्डिंगबाजी करणार नाहीत, अशी स्पष्ट लेखी हमी बहुतेक सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी न्यायालयात दिलेली आहे. त्यामुळे आता महापालिकांच्या प्रतिज्ञापत्रांमधून राजकीय पक्षांच्या होर्डिंगची माहिती आली असेल तर कारवाई व्हायला हवी’, असे म्हणणे वारुंजीकर यांनी मांडले. त्यानंतर सर्व संबंधित राजकीय पक्षांना सावध करत आहोत, असे खंडपीठाने नमूद केले. तसेच पुढील सुनावणीनंतर याची गंभीर दखल घेण्याचे संकेत दिले.
Nandurbar News: असह्य वेदना, रस्ता नसल्यानं गर्भवतीसाठी केली बांबूची झोळी; पण रुग्णालय गाठण्याआधीच…
‘तर कोर्ट कमिश्नर नेमू’
‘आता यापुढच्या विशेष मोहिमांच्या कारवाईचा तपशील महापालिका आयुक्तांनी व नगरपालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दाखल करून दिला नाही. तसेच कारवाई समाधानकारक असल्याचे आढळले नाही तर आम्ही शहानिशा करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच वकिलांना कोर्ट कमिश्नर नेमू’, असे स्पष्ट संकेतही खंडपीठाने दिले. तसेच यापुढच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये संबंधित बेकायदा होर्डिंग कोणत्या राजकीय पक्षांचे, संस्थांचे, व्यक्तींचे होते इत्यादी तपशीलही देण्याचे निर्देश खंडपीठाने महापालिका व नगरपालिकांना दिले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post निवडणूक निकालानंतर कुठेही बेकायदा होर्डिंग नको; उच्च न्यायालयाने सरकार, महापालिकांना भरला दम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109302 0
गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय? https://tejpolicetimes.com/?p=109148 https://tejpolicetimes.com/?p=109148#respond Mon, 18 Nov 2024 08:50:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109148 गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय?

या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले. महाराष्ट्र टाइम्सteacher ill म. टा. प्रतिनिधी, कन्नड : कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडणूक काम टाळावे यासाठी ६२ शिक्षकांनी ‘आपण गंभीर आजारी आहोत,’ अशी माहिती मुख्याध्यापकांच्या मार्फत दिली. शहरातील शिवाजी महाविद्यालयात […]

The post गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय?

या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले.

महाराष्ट्र टाइम्स
teacher ill

म. टा. प्रतिनिधी, कन्नड : कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडणूक काम टाळावे यासाठी ६२ शिक्षकांनी ‘आपण गंभीर आजारी आहोत,’ अशी माहिती मुख्याध्यापकांच्या मार्फत दिली. शहरातील शिवाजी महाविद्यालयात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीण पवार यांना शनिवारी (१६ नोव्हेंबर) संबंधित शिक्षकांची वैद्यकीय तपासणी केली. त्या वेळी सुमारे ६२ शिक्षक गंभीर आजारी नसल्याचे समोर आले.

गंभीर आजारी नसताना खोटी माहिती देणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश सहायक निवडणूक अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिले. या संदर्भात अधिक माहिती देताना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सांगितले. ‘विधानसभा निवडणुकीत काम करण्यासाठी तालुक्यातील शाळांकडून शिक्षक कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी या कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन मागितली होती. मुख्याध्यापकांनी ६२ शिक्षक गंभीर आजाराने ग्रस्त असून, निवडणूक कामात काम करू शकत नसल्याचे कळवले. याची गंभीर दखल घेऊन या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले.
भरलेल्या बॅगा मातोश्रीत, रिकाम्या बॅगा बाहेर निघतात; ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन शिंदेंचा टोला
त्यातील पाच शिक्षक वगळता इतर सर्व शिक्षक ठणठणीत असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉक्टर प्रवीण पवार यांनी दिला. या संदर्भात बोलताना डॉक्टर पवार म्हणाले. ‘यातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांनी जुने वैद्यकीय सर्टिफिकेट जोडून आपण आजारी असल्याचे दाखवले. हृदयविकार, मधुमेह, मणक्यात गॅप, सद्यस्थिती ठीक नाही, उभे राहता येत नाही अशी साधारण कारणे निवडणूक कामे टाळण्यासाठी पुढे करण्यात आली होती.’ ‘हे कर्मचारी दैनंदिन काम करण्यास सक्षम नाहीत का, या संदर्भात या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.
MBBSच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळे मृत्यू; तीन तास अघोरी शिक्षा, कॉलेजमध्ये खळबळ
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सांगितले, ‘वैद्यकीय तपासणी व पडताळणीस तीस शिक्षक अनुपस्थित राहिले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे; तसेच गंभीर आजारी असल्याची खोटी माहिती सादर करणाऱ्या मुख्याध्यापकांवरही गुन्हे नोंदवण्यात येत आहेत.’ या कारवाईमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109148 0
Yogi Adityanath: देशाला धोका देणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका; योगी आदित्यनाथ यांचे कोल्हापुरात आवाहन https://tejpolicetimes.com/?p=109114 https://tejpolicetimes.com/?p=109114#respond Mon, 18 Nov 2024 01:24:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109114 Yogi Adityanath: देशाला धोका देणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका; योगी आदित्यनाथ यांचे कोल्हापुरात आवाहन

Yogi Adityanath Speech: मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. ते एकमेकांना धोका देत आहेत. यांनी प्रथम हिंदूंना धोका दिला. आता देशाला धोका देत आहेत. देशाला धोका देण्याचा काँग्रेसचा इतिहासच आहे. महाराष्ट्र टाइम्सyogi12 म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीचा काँग्रेस वापर करीत आहे. जातीजातींत भांडणे […]

The post Yogi Adityanath: देशाला धोका देणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका; योगी आदित्यनाथ यांचे कोल्हापुरात आवाहन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Yogi Adityanath: देशाला धोका देणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका; योगी आदित्यनाथ यांचे कोल्हापुरात आवाहन

Yogi Adityanath Speech: मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. ते एकमेकांना धोका देत आहेत. यांनी प्रथम हिंदूंना धोका दिला. आता देशाला धोका देत आहेत. देशाला धोका देण्याचा काँग्रेसचा इतिहासच आहे.

महाराष्ट्र टाइम्स
yogi12

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीचा काँग्रेस वापर करीत आहे. जातीजातींत भांडणे लावत आहे. देव, देश आणि धर्म याबाबत आस्था नसणाऱ्या आणि नीती, निर्णयक्षमता नसणाऱ्या, देशाला धोका देणाऱ्या या पक्षावर विश्वास ठेवू नका,’ असे आवाहन करताना ‘राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला बळ द्या,’ असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

कोल्हापुरात महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी योगींची तपोवन मैदानावर जंगी सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. या वेळी खासदार धंनजय महाडिक, धैर्यशील माने यांच्यासह राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, अशोकराव माने या उमेदवारांसह अनेक नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. ते एकमेकांना धोका देत आहेत. यांनी प्रथम हिंदूंना धोका दिला. आता देशाला धोका देत आहेत. देशाला धोका देण्याचा काँग्रेसचा इतिहासच आहे. त्यांच्या या वृत्तीमुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली. हे सत्य ते मानायला तयार नाहीत. इंग्रजांचेच अंश असलेल्या काँग्रेसने त्यांच्याच ‘फोडा राज्य करा’ या नीतीचा वापर सुरू ठेवला आहे. जात, भाषा, प्रांत यावर आपआपसांत भांडणे लावण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्यामुळेच देशाला प्रत्येक वेळी अपमान सहन करावा लागत आहे.’
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब! मंत्री, आमदारांच्या घरांवर हल्ला, इम्फाळ खोऱ्यात संचारबंदी
मूळ विचारापासून उद्धव ठाकरे दूर गेल्याचा आरोप करताना योगी म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारला पुन्हा बहुमताने निवडून द्या. म्हणजे गणेशोत्सव, रामनवमी अशा वेळी दगडफेक करणारे घरातून बाहेर पडू शकणार नाहीत.’ या वेळी भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, शौमिका महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, मच्छिंद्र सकटे, पृथ्वीराज महाडिक, उत्तम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
VIDEO: महाराष्ट्र अदानीराष्ट्र होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंची रोखठोक भूमिका
महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार धैर्यशील माने, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, समित कदम, अशोकराव माने आदी उपस्थित होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post Yogi Adityanath: देशाला धोका देणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका; योगी आदित्यनाथ यांचे कोल्हापुरात आवाहन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109114 0
मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण..; दादा, भाऊंनंतर भाईंचं विधान; पुढचा मुख्यमंत्री सांगितला https://tejpolicetimes.com/?p=109031 https://tejpolicetimes.com/?p=109031#respond Sun, 17 Nov 2024 12:00:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109031 मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण..; दादा, भाऊंनंतर भाईंचं विधान; पुढचा मुख्यमंत्री सांगितला

Eknath Shinde: आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील तसाच सूर आळवला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील तसाच सूर आळवला आहे. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं वक्तव्य शिंदेंनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या […]

The post मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण..; दादा, भाऊंनंतर भाईंचं विधान; पुढचा मुख्यमंत्री सांगितला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण..; दादा, भाऊंनंतर भाईंचं विधान; पुढचा मुख्यमंत्री सांगितला

Eknath Shinde: आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील तसाच सूर आळवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील तसाच सूर आळवला आहे. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं वक्तव्य शिंदेंनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं. पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर राजकीय वर्तुळात चर्चा असताना शिंदेंनी केलेलं विधान महत्त्वाचं आहे. पुढील मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला. फोडा आणि राज्य करा हेच काँग्रेसचं धोरण आहे. राहुल गांधी बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट कधी म्हणणार, असा सवाल शिंदेंनी विचारला. मी माझ्या पक्षाची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही, असं बाळासाहेब म्हणायचे. पण उद्धव ठाकरे स्वार्थासाठी, मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेससोबत गेले. ते केवळ खुर्चीसाठी तिकडे गेले. त्यांच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, असा विचार त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर तोफ डागली.
AB फॉर्मसाठी शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवलं; आता पक्षानं वाऱ्यावर सोडलं; उमेदवाराला जबर धक्का
मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘एक है तो सेफ है’ घोषणेचं समर्थन केलं. राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त केलेलं विधान चांगलं आहे. पण त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल काय भावना आहेत, त्या माहीत नाहीत. त्यांच्याच हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणून दाखवावं, असं थेट आव्हानच शिंदेंनी दिलं.
Pratibha Pawar: शरद पवारांच्या पत्नीला बारामती टेक्सस्टाईल पार्क बाहेर रोखलं; मिसेस पवारांचा सॉल्लिड सवाल
बाळासाहेब ठाकरे आज हृयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना जंगलात वाईल्ड लाईफचे फोटो काढायला पाठवलं असतं, असा टोला शिंदेंनी लगावला. ‘तुम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देऊ असा शब्द भाजपकडून आम्हाला देण्यात आलेला होता. पण ठाकरे त्याआधीच मुख्यमंत्री झाले. निकाल लागताच त्यांना आकडे समजले. आपल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हे समजताच त्यांनी परिस्थितीचा पूर्ण फायदा उचलला. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि सत्तेत जाऊन बसले,’ अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण..; दादा, भाऊंनंतर भाईंचं विधान; पुढचा मुख्यमंत्री सांगितला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109031 0
देवेंद्र फडणवीस vs प्रफुल्ल गुडधे; नागपूर-दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार शिगेला, कोण मारणार बाजी? https://tejpolicetimes.com/?p=108958 https://tejpolicetimes.com/?p=108958#respond Sat, 16 Nov 2024 10:34:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108958 देवेंद्र फडणवीस vs  प्रफुल्ल गुडधे; नागपूर-दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार शिगेला, कोण मारणार बाजी?

Nagpur South West Assembly Constituency: ​​भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. दोन्ही उमेदवारांनी राज्यातील आणि देशभरातील मोठ्या नेत्यांना आपल्या प्रचारासाठी मतदारसंघात आमंत्रित केले असून रोज अशा मोठ्या प्रचारसभा मतदारसंघात सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्सbjp vs congress1 नागपूर : सगळ्या राज्याचे लक्ष लागलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा प्रचाररथ त्यांचे […]

The post देवेंद्र फडणवीस vs प्रफुल्ल गुडधे; नागपूर-दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार शिगेला, कोण मारणार बाजी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
देवेंद्र फडणवीस vs  प्रफुल्ल गुडधे; नागपूर-दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार शिगेला, कोण मारणार बाजी?

Nagpur South West Assembly Constituency: ​​भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. दोन्ही उमेदवारांनी राज्यातील आणि देशभरातील मोठ्या नेत्यांना आपल्या प्रचारासाठी मतदारसंघात आमंत्रित केले असून रोज अशा मोठ्या प्रचारसभा मतदारसंघात सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स
bjp vs congress1

नागपूर : सगळ्या राज्याचे लक्ष लागलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा प्रचाररथ त्यांचे कार्यकर्ते समर्थपणे ओढत आहेत. तो रोखण्याचे आव्हान काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांच्यापुढे आहे. फडणवीसांची नव्या विक्रमाकडे वाटचाल सुरू आहे तर तो थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. मतदानाला मोजकेच दिवस उरले असताना नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. दोन्ही उमेदवारांनी राज्यातील आणि देशभरातील मोठ्या नेत्यांना आपल्या प्रचारासाठी मतदारसंघात आमंत्रित केले असून रोज अशा मोठ्या प्रचारसभा मतदारसंघात सुरू आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत अनेक नेत्यांनी या आधीच प्रचारसभा घेतल्या आहेत. भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातील निवडणुकीचीही जबाबदारी असल्याने ते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील जनतेला माध्यमातून त्यांचे विचार कळत आहेत. त्यांच्या अनुपस्थित, राजू हडप, प्रकाश भोयर, रितेश गावंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

दोन मोठ्या प्रचारयात्रा त्यांनी केल्या. एक सभा त्यांनी स्वतःसाठी घेतली. आता त्यांची टीम’ मी देवेंद्र’ म्हणून, देवेंद्रदूत म्हणून घरोघरी जात आहे. नागपूर शहरातून सलग सहावेळा विजयी होण्याचा विक्रम घडविण्याच्या तयारीत त्यांचे कार्यकर्ते लागले आहेत. छोटी मंडळे, सामाजिक संस्था, महिला मंडळे यांच्या भेटी घेणे सुरू आहे. फडणवीस यांचे सर्वांत प्रबळ प्रतिस्पर्धी असलेले प्रफुल्ल गुडधे रोज प्रचार यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक वस्तीत फिरत आहेत. मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधणे आणि विविध भागांत प्रचार फेऱ्या काढणे यांवर भर दिला आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासून ते मतदारसंघात सक्रिय झाले होते.
मातोश्रीची दारे बंद, आम्हाला भेट नाकारलेली, शिंदेंच्या अपमानाचा मी साक्षीदार! प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट
मागील आठ दिवसांत त्यांनी हा प्रचार अधिक व्यापक केला आहे. येथील काही कार्यकर्ते पश्चिमेत गेले आहेत. गुडधेंनी कन्हैय्याकुमारसारख्या वक्त्यांच्या सभा घेऊन प्रचारात रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ साली ते फडणवीसांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी झालेल्या पराभवातून शिकलेले धडे ते यावेळी अंमलात आणत आहेत. फडणवीसांना विक्रमापासून रोखण्याचे अवघड प्रयत्न ते करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे हेदेखील प्रचारात वैयक्तिक संपर्कावर भेट देताना दिसून आले आहे. फडणवीस काय किंवा गुडधे काय दोघेही भाजपच्याच कुळाचे आहेत. त्यामुळे भाजप विरोधी मतदारांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन भांगे करीत आहेत.
Narayan Rane: शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते, मग मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? नारायण राणेंचा प्रश्न
पुन्हा कौल की बदलाला साथ?

या दोन उमेदवारांच्या तुलनेत इतरांचे बळ कमी आहे. त्यामुळे, नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात थेट निवडणूक होणार असल्याची चिन्हे आहेत. पुढील तीन दिवसांत येथील प्रचार आणखी तीव्र होणार आहे. राज्यातील मोठे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना ‘पुन्हा कौल’ की प्रफुल्ल गुडघे घालत असलेली ‘बदलाची साद’ यापैकी नेमके काय वरचढ ठरते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post देवेंद्र फडणवीस vs प्रफुल्ल गुडधे; नागपूर-दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार शिगेला, कोण मारणार बाजी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108958 0
भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय? https://tejpolicetimes.com/?p=108974 https://tejpolicetimes.com/?p=108974#respond Sat, 16 Nov 2024 09:02:12 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108974 भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय?

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे महाराष्ट्र टाइम्सdilip khodpe vs girish mahajan जामनेर : मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनाच आपल्याकडे खेचत राष्ट्रवादी शरद पवार गटाने संकटमोचक गिरीश […]

The post भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय?

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे

महाराष्ट्र टाइम्स
dilip khodpe vs girish mahajan

जामनेर : मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनाच आपल्याकडे खेचत राष्ट्रवादी शरद पवार गटाने संकटमोचक गिरीश महाजन यांच्यापुढे उभे केले आहे. आपल्याच मतदारसंघात स्वकियाशी लढा देऊन सातव्यांदा विजय मिळविण्याचे महाजन यांच्यासमोर आव्हान आहे. विशेष म्हणजे खोडपे मराठा समाजाचे असल्याने जरांगे फॅक्टरचा त्यांना कितपत फायदा होतो, याकडेही लक्ष लागून आहे.

सन १९९५ नंतर गिरीश महाजन यांना सातत्याने विजय मिळाल्यामुळे या जागेला भाजपचा अभेद्य किल्ला मानले जाते. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी सहाव्यांदा आपली दावेदारी केली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून संजय गरूड रिंगणात होते. महाजन यांनी १,१४,७१४ मते घेत विजय मिळवला. संजय भास्करराव गरूड यांना ७९,७०० मतांवर समाधान मानावे लागले. मात्र, पारंपरिक विरोधक असलेले संजय गरूड यांनाच भाजपमध्ये घेऊन महाजन यांनी प्रचाराच्या कामाला लावण्यात यश मिळविले.

गरूड यांना भाजपमध्ये घेऊन महाजन यांनी विधानसभेची लढाई जिंकली असे वाटत असतानाच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमधील ज्येष्ठ पदाधिकारी गिरीश महाजन यांच्याबरोबर काम करणाऱ्या खोडपे यांना आपल्या गोटात घेऊन त्यांना उमेदवारी देत महाजनांची खेळी त्यांच्यावरच उलटवली. खोडपे जनतेतील चेहरा असून, मराठा समाजाचे आहेत. शरद पवार यांनी रचलेल्या या चक्रव्यूहात अडकलेले महाजन तो भेदून विजयाचे तोरण बांधतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य
कळीचे मुद्दे
■ रखडलेले टेक्सटाइल पार्क
■ शेतीच्या सिंचनाचा प्रश्न
■ कापूस, सोयाबीनला भाव नाही, केळी उत्पादकांचे प्रश्न
मातोश्रीची दारे बंद, आम्हाला भेट नाकारलेली, शिंदेंच्या अपमानाचा मी साक्षीदार! प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट
सन २०१९ च्या निकालाची स्थिती
■ गिरीश महाजन (भाजप): १,१४,७१४
■ संजय गरुड (राष्ट्रवादी काँग्रेस) : ७९,७००
■ एकूण मतदार ३,३५,२७४
पुरुष : १,७२,२३२
महिला : १,६३,०४१
तृतीयपंथी : १

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108974 0