reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121माध्यम जगतात आजही ‘दूरदर्शन’ हे मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. इथे काम करण्यासाठी अनेकजण संधीची वाट पाहत असतात. कारण ‘प्रसारभारती’ ही राष्ट्रीय पातळीवरची शासकीय संस्था असल्याने त्याचे महत्व वेगळे आहे. त्यामुळे हि संधी आता आयतीच चालून आली आहे.मराठी भाषिकांसाठी तेही मुंबईमध्ये ही नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. जर तुम्ही उत्तम मराठी लिहू शकता, बोलू शकता […]
The post ‘मराठी’ भाषिकांसाठी दूरदर्शनमध्ये करियरची सुवर्णसंधी! first appeared on TEJPOLICETIMES.
]]>प्रसार भारती दूरदर्शन मुंबईमध्ये वृत्त विभागात २२ रिक्त पदांची भरती सुरु असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार माध्यम क्षेत्रातील विविध एकूण १० पदे आणि २२ जागांसाठी ही भरती आहे. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराच्या कामाचा कालावधी १ वर्षांपर्यंत असेल. त्यानंतर उमेदवाराचे काम आणि माध्यमाची गरज पाहून पुढचा कार्यकाळ वाढवला किंवा कमी केला जाईल. यासंदर्भात प्रसारभारतीने २७ जुलै रोजी जाहीर निवेदन केले असून तेव्हापासुन १० दिवसात उमेदवारांनी हा अर्ज भरणे बंधनकारक आहे.
अँकर आणि वार्ताहर – श्रेणी २ – २
अँकर आणि वार्ताहर – श्रेणी ३ – २
असाइनमेंट कोओर्डीनेटर – १
ब्रॉडकास्ट एक्झक्युटिव्ह – ३
बातमीपत्र संपादक – २
कंटेन्ट एक्झक्युटीव्ह – २
कॉपी एडिटर – २
पॅकेजिंग असिस्टंट – २
व्हिडिओग्राफर – २
व्हिडीओ पोस्ट प्रॉडक्शन असिस्टंट (व्हिडीओ एडिटर) – ४
(वाचा: नव्या शैक्षणिक धोरणातील ‘एंट्री – एक्झिट’ फिचर विद्यार्थ्यांसाठी ठरणार वरदान!.. वाचा, काय आहे हे..)
पत्रकारितेतील अनुभवी, कार्यकुशल उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्या-त्या पदानुसार किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता देखील पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे निवेदक, वार्ताहर, संपादक या पदाच्या उमेदवारांचे मराठी भाषेवर प्रभुत्व असायला हवे तर व्हिडीओग्राफर आणि संकलक हे त्यांच्या कामामध्ये तंत्र कुशल असणे आवश्यक आहे. भरतीसाठीची पदे आणि त्यासाठी लागणारी पात्रता आणि सर्व तपशील प्रसार भरतीच्या https://prasarbharati.gov.in/pbvacancies या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, कामाचे स्वरूप, अनुभव, वेतन याची सविस्तर माहिती दिली आहे.
आपल्या इच्छित पदासाठी दूरदर्शनमध्ये अर्ज करायचा असल्यास https://applications.prasarbharati.org हि लिंक देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक पदासाठीचा अर्ज स्वतंत्र असून आवश्यक ती माहिती त्यामध्ये भरून ते ऑनलाईनच दाखल करायचे आहे.
व्हिडिओग्राफर पदासाठी उमेदवारांची निवड चाचणी/मुलाखतीद्वारी केली जाईल. तसेच केवळ निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा चाचणीसाठी बोलावले जाईल. चाचणी/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास आणि निवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.
या भरती प्रक्रीयेत प्रत्येत पदासाठी वेगळे वेतन आहे. अंदाजे ३० हजार ते ६० पर्यंतची वेतन रक्कम असून वेगवेगळ्या श्रेणीनुसार तो देण्यात येणार आहे. हे काम कंत्राटी असल्याने यामध्ये पेन्शनसाठीच्या कोणत्याही रकमेची तरदूत नसेल.
(वाचा: UGC: देशातील सर्व महाविद्यालयांवर अंकुश ठेवणारे ‘यूजीसी’ नेमके आहे तरी काय?)
The post ‘मराठी’ भाषिकांसाठी दूरदर्शनमध्ये करियरची सुवर्णसंधी! first appeared on TEJPOLICETIMES.
]]>म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट पूर्व उपनगरांतील मानखुर्दशी जोडण्यासाठी ‘मेट्रो २ ब’ ही मार्गिका उभी केली जात आहे. या मार्गिकेतील चालकांचा शोध मात्र ‘एमएमआरडीए’ने सुरू केला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात १२० चालकांना घेतले जाणार आहे.‘मेट्रो २ ब’ ही मार्गिका अंधेरी पूर्वेकडील ईएसआयसी कॉलनी ते मानखुर्द येथील मंडालापर्यंत आहे. वांद्रे, बीकेसी, […]
The post MMRDA Job: मुंबई मेट्रोअंतर्गत विविध पदांची भरती, ४० हजारपर्यंत मिळेल पगार first appeared on TEJPOLICETIMES.
]]>या निविदेनुसार, संबंधित कंत्राटदाराला चालक पुरविण्यासह एकूणच मेट्रो कार्यान्वयन हाताळायचे आहे. त्याअंतर्गत चालकांना प्रशिक्षित करण्यासाठी या मेट्रो रेल्वेच्या कार्यान्वयनासाठी अन्य कर्मचारीही नेमायचे आहेत. त्याअंतर्गत एकूण १२० चालक, सहा क्रू ऑपरेटर्स, पाच ट्रेन ऑपरेशन व्यवस्थापकांचा समावेश असेल.
तेवढे मनुष्यबळ संबंधित कंत्राटदाराला पुरविणे आवश्यक असेल. तसेच या सर्वांना प्रशिक्षित करण्यासह एकूणच मेट्रो मार्गिकेची सक्षमपणे हाताळणी करणे, पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत सेवा अखंड सुरू राहण्याबाबत संरचना उभी करणे, सुरक्षेची काळजी घेणे आदी कामे कंत्राटदाराला करायची आहेत. यासाठीचा खर्च ४५ कोटी २७ लाख ०३ हजार ८५२ इतका असेल. पाच वर्षांसाठी हे कंत्राट असेल. निविदा भरण्याची अखेरची तारिख २७ मार्च असेल.
‘मेट्रो २ बी’च्या रेल्वेगाड्या अद्याप ही मार्गिका विकसित करणाऱ्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कंपनी लिमिटेडच्या (एमएमआरडीएची विशेष कंपनी) ताफ्यात आलेल्या नाहीत. त्या गाड्या ताफ्यात आल्यावर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. यासाठीच गाड्या ताफ्यात येईपर्यंत चालक सज्ज असावेत, या हेतूने ही निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार या चालकांना सध्याच्या मार्गिकेवरच प्रशिक्षित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रकार- पगार
चालक- २२ हजार रू.
क्रू नियंत्रक- ३० हजार रू.
ट्रेन ऑपरेटर व्यवस्थापक- ४० हजार रू.
(याखेरीज रात्रपाळी भत्ता आठ तासांचे २५० रू (रात्री ८ ते सकाळी ६), गाडी धाव भत्ता १ रुपया प्रति किमी, ओव्हरटाइम २५० रू प्रति तास, अन्य भत्ते ५०० रुपये प्रति अन्य कामदेखील देणे कंत्राटदाराने देणे अनिवार्य असणार आहे.)
The post MMRDA Job: मुंबई मेट्रोअंतर्गत विविध पदांची भरती, ४० हजारपर्यंत मिळेल पगार first appeared on TEJPOLICETIMES.
]]>MDTCI Job: मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्राअंतर्गत एकूण ४२ जागा भरल्या जाणार आहेत. मेडिकल ऑफिसरच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार असून […]
The post MDTCI Job: मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रात भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज first appeared on TEJPOLICETIMES.
]]>टीबी हेल्थ व्हिसिटरच्या १३ जागा भरण्यात येणार असून या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार सायन्स ट्रिममध्ये ग्रॅज्युएट असावा. मायक्रोबायोलॉजिस्टची ४ पदे भरण्यात येणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एम.डी. मायक्रोबायोलॉजी, पीएच.डी. वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र किंवा एम.एस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिनियर लॅबोरीटी टेक्निशियनच्या २ रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवाराने बी.एस्सी किंवा एम.एस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
फार्मासिस्टचे १ पद भरले जाणार असून उमेदवारांनी फार्मसीमध्ये पदवी/डिप्लोमा केलेला असावा.
पीपीएम कॉर्डिनेटरच्या २ जागा भरण्यात येणार असून यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. काऊन्सिलरचे १ पद भरण्यात येणार आहे. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. स्टॅसिस्टिकल असिस्टंटची २ पदे भरली जाणार असून यासाठी उमेदवाराकडे डिप्लोमा आणि टायपिंग पूर्ण केलेले असावे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ७० वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये ५ वर्षांची सवलत मिळेल. उमेदवारांकडून १५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार १५ हजार ५०० ते ६० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
The post MDTCI Job: मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रात भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज first appeared on TEJPOLICETIMES.
]]>