reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष व्यवस्था केली. दुपारी मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच रामनामाचा गजर झाला. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत व्यापले आणि संपूर्ण विदर्भ रामनामी रंगला.भंडाऱ्याचे ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिरात सकाळपासूनच […]
The post रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
दिव्यांनी उजळले ‘श्रीं’चे मंदिर
बुलढाणा जिल्ह्यातील संतश्रेष्ठ गजानन महाराज संस्थान शेगाव, श्री प्रल्हाद महाराज मंदिर साखरखेर्डा आणि श्री क्षेत्र माकोडी येथे अयोध्येतील सोहळ्याचा उत्सव झाला. श्रींच्या मंदिर परिसरात तोरण, केळीचे खांब, रंगबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. शंख, नगारा वादन, पुष्पवृष्टी आणि महाआरती झाली. सायंकाळी दीपोत्सवाने मंदिर उजळले होते. बुलढाणा अर्बनच्यावतीने रामभक्तांना लाडूची वीस हजारांहून अधिक पाकिटे वितरित करण्यात आली. संस्थेच्या मुख्य शाखेच्यावतीने गोवर्धन इमारतीसमोर संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, डॉ. सुकेश झंवर व संस्थेचे सरव्यवस्थापक कैलाश कासट यांच्याहस्ते हे लाडूवाटप झाले. रूद्र ढोल-ताशा पथकाने तब्बल ५०१ दिव्यांनी ‘जय श्रीराम’ साकारले. खामगावात भाजपने ४० हजार श्रीराम रक्षा स्रोताचे वाटप करण्यात आले. तर लोणारमध्ये मोटारसायकल रॅली लक्षवेधी ठरली.
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
गडचिरोली : अयोध्या येथे श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह गडचिरोली जिल्ह्यात दिसला. अनेक ठिकाणी कलशयात्रा व मिरवणुका निघाल्या. आरमोरी येथे राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. चंदू बेहरे, सागर मने, भूषण सातव, नितीन जोध, प्रदीप सेलोकर, अंकुश खरवडे, सुनील खोब्रागडे, बाळू हेमके यांनी स्वखर्चातून हे हेलिकॉप्टर मागविले होते. या हेलिकॉप्टरने मंदिराला फेरी घालून पुष्पवृष्टी केली. यासोबतच सिरोंचा, एटापल्ली, भामरागडपासून ते कोरचीपर्यंत सर्वत्र कार्यक्रम झाले.
कारसेवकांच्या संघर्षामुळे स्वप्नपूर्ती : फडणवीस
कॅप : अमरावतीच्या हनुमान गढी परिसरात आयोजित कारसेवकांच्या सत्कार सोहळ्यात विचार व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे व मान्यवर.
अमरावती : राम मंदिराच्या आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी होतो. लाठ्या-काठ्या खाल्ल्या. कारागृहातही गेलो. हजारो कारसेवकांच्या संघर्षामुळेच आज राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, असे भावपूर्ण उद्गावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून हनुमान गढी परिसरात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, नवनीत राणा, आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा स्वाभिमानी पक्षातर्फे ११ लाख बुंदीच्या लाडूंचेही वाटप करण्यात आले. बडनेरा मार्गावरील दसरा मैदानावर भाजप नेते तुषार भारतीय यांच्या मित्र परिवारातर्फे गंगा आरती करण्यात आली.अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये सकाळपासूनच पूजा अर्चना करण्यात आली. श्री अंबादेवी मंदिर, भक्तिधाम, सतीधाम, राम मंदिर रोशणाईने उजळले होते. श्री व्यंकटेश बालाजी भगवान मंदिरात ११ दिव्यांचा उत्सव साजरा झाला.
The post रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी first appeared on TEJPOLICETIMES.
]]>म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही उलाढाल झाली. यामुळे मुंबईतील वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.अयोध्येत सोमवार, २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्साह […]
The post ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल first appeared on TEJPOLICETIMES.
]]>‘सर्वाधिक मागणी कापडाचे तोरण, श्रीरामाचे चित्र असलेले भगवे तोरण व भगव्या पताकांना आहे. मागील तीन दिवसांत ती मोठ्या प्रमाणात वाढली. त्याआधी भगव्या आणि पिवळ्या रंगाचे कुर्ते, पारंपरिक कपडे खरेदी करून यासंबंधीच्या सोहळ्यांमध्ये नागरिक सहभागी होत होते. त्यामुळे त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. परिणामी मुंबईतील वस्त्रद्योगाकडे भरमसाठ काम आले. एकप्रकारे या वस्त्रोद्योगाला संजीवनी मिळाली’, असे याबाबत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.
सर्वच क्षेत्रांत मोठी उलाढाल
या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांत उलाढाल झाली आहे. प्रभू श्रीरामाचे चित्र असलेल्या चांदीच्या नाण्यांना मागणी सध्या मोठी आहे. अनेकांनी २२ जानेवारीला चांदीच्या नाण्यांची खरेदी करण्यासाठी बुकिंग करून ठेवले आहे. त्या क्षेत्रातील उलाढाल १९ लाख रुपयांच्या घरात आहे. त्याखेरीज श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती, शुभेच्छापत्र, मोठमोठे कटआऊट तयार करण्याच्या क्षेत्रातील उलाढाल वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई-अयोध्या विमान, तिकीट १० हजारांपुढे
राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विमानसेवा कंपन्यांनी अयोध्येसाठी उड्डाण सुरू केले आहे. मुंबईकरांनी यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे एरवी चार हजार रुपयांच्या घरात असलेले विमान तिकीट आता १० हजार रुपयांवर गेले आहे.
मुंबईहून सध्या केवळ इंडिगो एअरलाइन्सची सेवा सुरू आहे. ती १५ जानेवारीला सुरू झाली. शनिवारपर्यंतचे या सेवेचे तिकीट चार हजार रुपयांच्या घरात होते. सोमवारचे तिकीट मात्र ११ हजार ४९९ रुपयांपर्यंत पोहोचले. मंगळवारचे तिकीट आठ हजार ३५० रुपये आहे. मात्र त्यानंतर सलग हे तिकीट १० हजार रुपयांच्यापुढे आहे. २६ जानेवारीला सुट्टीच्या निमित्ताने अनेकांनी अयोध्येला जाण्याचे नियोजन केल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिणामी तिकीट दर वाढले आहेत. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे तिकीट दरदेखील सहा हजार रुपयांहून अधिक आहेत.
The post ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल first appeared on TEJPOLICETIMES.
]]>म. टा. प्रतिनिधी, लातूर: अयोध्येत आज, सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध संस्था, संघटना, मंडळांचे कार्यकर्ते या कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन करीत आहेत. व्यापारी वर्गाचा उत्साहही वाखणण्याजोगा आहे. गांधी चौक, हनुमान […]
The post राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
शहराच्या विविध भागांत रविवारीच रामरथाच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. महिला, तरुणांचा उत्साह दिसून येत आहे. लातुरातील पुरातन श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम होत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सूरतशहावली दर्गाला चादर अर्पण करून त्यांच्या परिसरात सुरुवात केली आहे.
लातुरातील जुना औसा रोड भागातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी एकत्र येत मिरवणूक काढली आहे. या यात्रेत मंदिर विश्वस्त इंद्रजित ठाकूर, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक शोभा पाटील, व्यंकटेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती आहे. या यात्रेत भजनीमंडळ, भगवे वस्त्र परिधान केलेल्या महिला, तरुणांचा मोठा सहभाग आहे. परिसरातील सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर, ओंकार हनुमान मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात येणार असून, अयोध्या कॉलनीतील श्रीराम मंदिरात त्याचा समारोप होणार आहे.
श्री केशव मित्र मंडळच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. केशवनगरमधील वीर हनुमान मंदिर येथून निघालेली ही मिरवणूक केशवनगर, अंबा हनुमान, कॉकसिट कॉलेज, शारदा कॉलनी, बँक कॉलनी, केशवनगर, इंडियानगर या भागातून काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. नागरिकांनी जागोजागी यात्रेचे फटाके वाजवून स्वागत केले. सडा, रांगोळ्या, भगव्या पताका, श्रीराम मूर्तीचे भव्य फलक यांनी रस्ते सजले होते. मिरवणुकीत रामरथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान रूपात मुले विराजमान झाली होती. भव्य श्रीराम प्रतिमा वेगळ्या रथावर लावण्यात आली होती. मिरवणुकीत उंट, घोडे सजलेल्या स्वारासहित सहभागी झाले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी केशव मित्र मंडळाचे अध्यक्ष सर्वोत्तम कुलकर्णी, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेविका सपना किसवे, कीर्ती धूत, विलास आराध्ये, मुरलीधर दीक्षित, किशोर कुलकर्णी, कांचन भावठाणकर, संजय निरगुडे, पोटे, अजय सूळ, अजय रेणापूरे आदींनी परिश्रम घेतले.
The post राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह first appeared on TEJPOLICETIMES.
]]>मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सिंघलजी मला भेटायला आले होते. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा आणावा […]
The post रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख first appeared on TEJPOLICETIMES.
]]>प्रभू श्रीरामांची कुलदेवता
दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान करताना, मला एका जीर्ण झालेल्या देवी मंदिराचे दर्शन झाले, ज्याचे पुनरुत्थान करणे आवश्यक होते. त्या वेळी मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी तमिळनाडूतील एक वयोवृद्ध नाडी सिद्धपुरुष आश्रमात आले आणि त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्राचीन ताडपत्रे वाचत असताना ते हळूवारपणे म्हणाले, ‘गुरुदेव, रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दोन्ही समुदायांना एकत्र आणण्याची भूमिका बजावावी लागेल असे यात लिहिले आहे. यात हेही दिसून येते, की देवकाली या प्रभू श्रीरामांच्या कुलदेवीचे मंदिर खूपच दुर्लक्षित आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय अयोध्येतील राम मंदिराभोवतीचा हिंसाचार आणि संघर्ष संपणार नाही.’ हे करायलाच हवे, असे सांगताना त्यांच्या बोलण्यात निकड आणि दृढ विश्वासाची भावना होती.
अयोध्येत दोन काली मंदिरे
देवकाली देवीच्या अशा मंदिराच्या अस्तित्वाची माहिती त्या नाडी सिद्धपुरुषाला किंवा मलाही नव्हती. काही सूत्रांद्वारे आणि चौकशीअंती अयोध्येत दोन काली मंदिरे असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यातील एक मंदिर शहराच्या मध्यभागी होते, त्याला लहान देवकाली मंदिर असे म्हणतात आणि दुसरे मंदिर थोडेसे दूर होते. ते देवकाली मंदिर म्हणून ओळखले जात असे. या देवकाली मंदिराचे बांधकाम मोडकळीस आले होते. त्यातील मध्यवर्ती तलावात कचरा टाकून लोकांनी त्याचे डम्पिंग ग्राउंडच केले होते. मंदिराच्या नूतनीकरणाचे आणि तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यासाठी मी नवी दिल्ली आणि लखनौ येथील आमच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत त्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण केले.
देवकाली मंदिरात १९ सप्टेंबर २००२ रोजी सकाळी पुन: प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आमच्या आश्रमातील पंडितांच्या गटाने माझ्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला. पवित्र अग्नीत पूर्णाहुती अर्पण करताना मला या मंदिराच्या वृद्ध पुजाऱ्याच्या डोळ्यांत आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू दिसले. देवकाली देवी तिच्या संपूर्ण वैभवात चमकत होती. देवकाली मंदिरातील पूजेनंतर, शहरात जातीय हिंसाचारामुळे कोणताही रक्तपात किंवा दंगल झाली नाही. एक भविष्यवाणी पूर्ण झाली होती…अशोकजी सिंघलही त्या दिवशी उपस्थित होते. मात्र, राम मंदिराच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय होण्यासाठी आणखी १४ वर्षे लागतील या पूर्वकल्पनेवर मी ठाम होतो. त्या संध्याकाळी देवकाली मंदिर परिसरात संत समागम झाला, ज्यामध्ये आम्ही हिंदू आणि सुफी संतांना निमंत्रित केले होते. एक हजारांहून अधिक लोक सत्संगात सहभागी झाले होते. रामजन्मभूमीचा वाद शांततेत सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रार्थना केली. मी मुस्लिम नेत्यांचा सन्मान करीत असताना त्यांनी मला तुलसी रामायणसोबत कुराणाची एक प्रत दिली आणि श्रीरामांवर त्यांची नितांत श्रद्धा असल्याचे सांगितले. त्यांच्या हावभावात बंधुत्वाचा निस्सीम भाव होता. याने माझा विश्वास दृढ केला, की केवळ निहित स्वार्थ असलेल्यांनाच दोन समाजांमध्ये फूट पडावी, असे वाटत असते.
शतकानुशतके चाललेल्या या संघर्षात पुरेसे रक्त सांडले होते. त्यामुळे आता काळाच्या कसोटीवर टिकणारा तोडगा हवा होता. हे लक्षात घेऊन सन २००३मध्ये मी न्यायालयाबाहेर परस्पर सामंजस्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, मुस्लिम समाज सद्भावना म्हणून हिंदूंना रामजन्मभूमी भेट देईल आणि त्या बदल्यात हिंदू त्यांना मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर जमीन देतील. यातून दोन्ही समाजांतील येणाऱ्या पिढ्यांसाठी बंधुभावाचा स्पष्ट संदेश जाईल.
देवकालीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अशोकजींनी मला प्रयागराज (त्या वेळचे अलाहाबाद) येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी बोलावले. सामूहिक ध्यानाचे मार्गदर्शन केल्यावर मी अशोकजींना सांगितले, की रामजन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी केवळ मानवी प्रयत्न पुरेसे नसून, ईश्वरी इच्छाही आवश्यक आहे. कोणत्याही कृतीच्या फलश्रुतीमध्ये मानवी प्रयत्नांसोबतच ईश्वरी इच्छाही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी संयमाची गरज असते. मी त्यांना सुचवले, की त्यांनी या प्रकरणी घाई करू नये. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते अधिक निश्चिंत आणि आश्वस्त दिसले. वाजपेयी सरकारच्या विरोधातील आपली भूमिकाही त्यांनी मवाळ केली.
या घटनेनंतर काही कालावधी गेला. सन २०१७मध्ये दोन्ही समाजांच्या नेत्यांच्या आग्रहानुसार आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमुळे मी रामजन्मभूमी प्रकरणात मध्यस्थी करण्याचे माझे प्रयत्न पुन्हा सुरू केले. सरतेशेवटी, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मंदिराच्या बांधकामासाठी रामजन्मभूमीची जमीन आणि मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा निश्चित केली. हा एक महत्त्वाचा प्रसंग होता, कारण ५०० वर्षे जुन्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा निघाला होता.
– गुरुदेव श्री श्री रविशंकर
The post रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख first appeared on TEJPOLICETIMES.
]]>मुंबई: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ या वेळेत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थिती लावण्यास उत्सुक आहेत. […]
The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
कोणाला कोणाला निमंत्रण
या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध खात्यांचे मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल सात हजारांहून अधिकजणांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहलीपासून अमिताभ बच्चन यांसारखे अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाला घेऊन रामलल्लाच्या दर्शनाला कधी जाणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.
The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण first appeared on TEJPOLICETIMES.
]]>मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनानिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला होता. रविवारी सुट्टी दिवशी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठासमोर ऐतिहासिक सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी […]
The post राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
‘८ मे १९६८च्या अधिसूचनेप्रमाणे सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा राज्य सरकारला अधिकारच नाही. तो अधिकार केंद्र सरकारला आहे’, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. मात्र, ‘त्या अधिसूचनेला आव्हान दिलेले असताना त्या अधिसूचनेची प्रतच याचिकेत जोडलेली नाही, त्यामुळे त्या विनंतीचा विचार करणे कठीण आहे’, असे मत खंडपीठाने नोंदवले. विद्यार्थ्यांच्या या याचिकेला अनेक हस्तक्षेप अर्जांद्वारे तीव्र विरोध करण्यात आला. एका अर्जदाराने तर ही याचिका दंड लावून फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली. ‘धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वाचाच चुकीचा अर्थ घेतला जात आहे त्यातूनच याचिकाकर्त्यांनी ही चुकीची याचिका केली आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या धर्मांच्या सोहळ्यासाठी सुट्या जाहीर होत असतात. विधी विद्यार्थ्यांचा उत्साह चांगला आहे हे समजू शकतो पण त्यांनी त्यांची ही ऊर्जा अन्यत्र व विधायक कामासाठी लावली तर चांगले होईल’,असे एका हस्तक्षेप अर्जदारातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
The post राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली first appeared on TEJPOLICETIMES.
]]>मुंबई: अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने उद्या, २२ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुटीला आव्हान देणाऱ्या सार्वजनिक सुटीला याचिकेवर मुंबई हायकोर्टात विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. रविवारच्या सुटीच्या दिवशी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठासमोर ऐतिहासिक सुनावणी होत आहे. राज्य सरकारचा निर्णय हा धर्म निरपेक्षतेच्या मूळ […]
The post केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
८ मे १९६८च्या अधिसूचनेप्रमाणे सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा राज्य सरकारला अधिकारच नाही. तो अधिकार केंद्र सरकारला आहे. असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. मात्र, “तुम्ही त्या अधिसूचनेला आव्हान दिलेले असताना त्या अधिसूचनेची प्रतच याचिकेत जोडलेली नाही, त्यामुळे त्या विनंतीचा विचार करणे कठीण आहे”, असे मत खंडपीठाने नोंदवले. आमच्याकडे आता त्या अधिसूचनेची प्रत नाही. मात्र तसे असले तरी मुळात कायद्याप्रमाणेच राज्य सरकारला सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा अधिकार नाही असा विद्यार्थिनी शिवानी अगरवाल यांनी खंडपीठासमोर युक्तिवाद केला.
“सार्वजनिक सुटी जाहीर करायची की नाही, हा पूर्णपणे राज्य सरकारचा धोरणात्मक भाग असल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी केला.सरकारचा निर्णय हा जुलमी व मनमानी आहे. असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे पण राज्य सरकार आपल्या अधिकारात वेगवेगळ्या दिवसांना सार्वजनिक सुटी जाहीर करत असते आणि जेव्हा धार्मिक रीती रिवाज किंवा सोहळे, हे अत्यावश्यक भाग असतात त्यावेळी वेगवेगळ्या धर्मासाठी सरकार असे निर्णय घेत असते. त्यामुळे धार्मिक आधारावर घेतलेला सरकारचा निर्णय मनमानी व बेकायदा आहे, असे म्हणता येत नाही. तसेच आपल्या धर्मनिरापेक्षतेचे तत्त्व हे इतके नाजूक नाही. आपल्या देशाचे नागरिक हे सर्व धर्मांचे सोहळे एकोप्याने साजरे करत असतात. याचिकाकर्ते हे केवळ एका गटाचा विचार करून अर्थ काढत आहेत असा युक्तिवाद महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठासमोर केला. अद्याप या याचिकेवरील युक्तिवाद सुरु असून न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
The post केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान first appeared on TEJPOLICETIMES.
]]>