reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121म. टा. प्रतिनिधी, लातूर: अयोध्येत आज, सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध संस्था, संघटना, मंडळांचे कार्यकर्ते या कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन करीत आहेत. व्यापारी वर्गाचा उत्साहही वाखणण्याजोगा आहे. गांधी चौक, हनुमान […]
The post राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
शहराच्या विविध भागांत रविवारीच रामरथाच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. महिला, तरुणांचा उत्साह दिसून येत आहे. लातुरातील पुरातन श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम होत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सूरतशहावली दर्गाला चादर अर्पण करून त्यांच्या परिसरात सुरुवात केली आहे.
लातुरातील जुना औसा रोड भागातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी एकत्र येत मिरवणूक काढली आहे. या यात्रेत मंदिर विश्वस्त इंद्रजित ठाकूर, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक शोभा पाटील, व्यंकटेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती आहे. या यात्रेत भजनीमंडळ, भगवे वस्त्र परिधान केलेल्या महिला, तरुणांचा मोठा सहभाग आहे. परिसरातील सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर, ओंकार हनुमान मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात येणार असून, अयोध्या कॉलनीतील श्रीराम मंदिरात त्याचा समारोप होणार आहे.
श्री केशव मित्र मंडळच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. केशवनगरमधील वीर हनुमान मंदिर येथून निघालेली ही मिरवणूक केशवनगर, अंबा हनुमान, कॉकसिट कॉलेज, शारदा कॉलनी, बँक कॉलनी, केशवनगर, इंडियानगर या भागातून काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. नागरिकांनी जागोजागी यात्रेचे फटाके वाजवून स्वागत केले. सडा, रांगोळ्या, भगव्या पताका, श्रीराम मूर्तीचे भव्य फलक यांनी रस्ते सजले होते. मिरवणुकीत रामरथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान रूपात मुले विराजमान झाली होती. भव्य श्रीराम प्रतिमा वेगळ्या रथावर लावण्यात आली होती. मिरवणुकीत उंट, घोडे सजलेल्या स्वारासहित सहभागी झाले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी केशव मित्र मंडळाचे अध्यक्ष सर्वोत्तम कुलकर्णी, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेविका सपना किसवे, कीर्ती धूत, विलास आराध्ये, मुरलीधर दीक्षित, किशोर कुलकर्णी, कांचन भावठाणकर, संजय निरगुडे, पोटे, अजय सूळ, अजय रेणापूरे आदींनी परिश्रम घेतले.
The post राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह first appeared on TEJPOLICETIMES.
]]>गडचिरोली: संपूर्ण जगाला भुरळ घालणारे सागवान लाकूड गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली वनविभागात आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या येथील सागवान लाकडाने आधुनिक काळातच नाही तर ब्रिटीश काळातही जगाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील एकूण वनापैकी गडचिरोली जिल्ह्यात जवळपास २८ टक्के जंगल आहे.यातही येतील काही प्रजाती अतिशय मौल्यवान असून येथील सागवान लाकडाला देशात मोठी मागणी आहे. त्यामुळेच अयोध्येत बांधण्यात आलेल्या […]
The post राम मंदिराच्या बांधकामात गडचिरोलीचे योगदान; आलापल्लीचे सागवान लाकूड प्रभू रामचंद्राच्या दारी first appeared on TEJPOLICETIMES.
]]>ब्रिटीश कालीन इतिहास
भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले. व्यापारी म्हणून आलेले ब्रिटीश राज्यकर्ते बनले, असे म्हटले जाते. ब्रिटीशांची राजवट असताना स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादमार्गे तत्कालीन सिरोंचा जिल्ह्यातून ब्रिटिश अधिकारी विद्यमान गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत असत. याचवेळी त्यांना आलापल्लीतील सागवानाने खुणावले. त्यानंतर त्यांनी येथील सागवान ब्रिटिश राज्याच्या महालात लाकूड कामासाठी वापरले, असे जुने जाणकार सांगतात. आजही सिरोंचा तालुक्यातून तेलंगाना, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणावर सागवान लाकडाची तस्करी होत असते. याचाच अर्थ येथील सागवान लाकडाचे वैशिष्ट्य दिसून येतात.
गडचिरोलीच्या लाकडाने सजली भारतीय संसद स्वातंत्र्यपूर्व काळात येथील सागवान लाकूड सातासमुद्रापार गेल्याचे सांगीतले जाते. दक्षिण भागातील उच्च दर्जाचे सागवान लाकूड परराज्यात तर पोहोचलेच, परंतु देशाच्या राजधानीतील संसदेतही पोहोचले आहे. संसदेत विविध प्रकारचे लाकूडकाम करण्याकरिता १ कोटी १२ लाख ३८ हजार २१६ रुपयांचे चिराण सागवान, तर ५० कोटी रुपयांचे ५०० घनमीटर गोल लाकूड असे एकूण ५१ कोटींवर किमतीचे सागवान आलापल्लीतून गेल्याचे सांगण्यात येत आहे. परराज्यातही शासकीय कामात वापर गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील विशेषत: आलापल्ली येथील सागवान लाकडाचा वापर केला जाते. केरळ, कर्नाटक, बिहार तसेच उत्तर व दक्षिण भागातील राज्यांमध्ये शासनाच्या विविध कामांकरिता येथील लाकडाचा पुरवठा करण्यात आला आहे. सदर सागवानाचा वापर शासकीय कार्यालयांमध्ये लाकूड कामाकरिता करण्यात आला.
अयोध्येतील प्रभू श्री राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली परिसरातील जंगलाच्या सागवानाची निवड करण्यात आली. यामुळे आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथून प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी लाकडं पाठवण्याची संधी मिळाल्याने याचा मनस्वी आनंद आणि समाधान झाल्याची भावना आलापल्लीकर व्यक्त करत आहेत.
राज्यात वन विकास महामंडळाची (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (FDCM) स्थापना १९७४ मध्ये झाली. ही पूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची कंपनी आहे. महाराष्ट्र सरकारने ३.४३ लाख हेक्टर जंगल वन विकास महामंडळाला (FDCM) त्यांच्या उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. ते राज्याच्या एकूण वनक्षेत्राच्या ६.०० टक्के इतके आहे. वन विकास महामंडळाला सागवान लागवडीचा आणि लाकूड, सरपण आणि बांबू यांसारख्या वन उत्पादनांची विक्री करण्याचा जवळपास पाच दशकांचा अनुभव आहे. वन विकास महामंडळ त्याच्या परिपक्व सागवान रोपवन आणि शाश्वत व्यवस्थापित जंगलांमधून सुमारे ५०.००० घनमीटर लाकडाचे उत्पादन करते.
अंतिम ग्राहकांना दर्जेदार लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी, कंपनीने अलीकडेच चिराण लाकडाचे उत्पादन आणि मार्केटिंगमध्ये पाऊल टाकले व आता अल्लापल्ली प्रदेशात ०५ सॉ मिल व बल्लारशाह येथे ०५ सॉमिल कार्यरत आहेत. जानेवारी २०२२ पासून वन विकास महामंडळाने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प (नवीन संसद भवन), डी.वाय. पाटील, विद्यापीठ आणि माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, सातारा यांसारख्या अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांना सागवान लाकडाचा पुरवठा केला आहे. अलीकडच्या घडामोडींमध्ये, अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम (रचना ) करणाऱ्या लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीने बांधकामासाठी त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे सागवान लाकूड पुरवण्यासाठी वन विकास महामंडळाशी संपर्क साधला आहे.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटकडे राम मंदिराच्या बांधकामासाठी उत्तम दर्जाच्या सागवान लाकडाची चौकशी केली. वन संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील गडचिरोली (चंद्रपूर) विभागातील सागवान लाकडाचा सल्ला दिला. रामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम करणाऱ्या लार्सन अँन्ड टुब्रो कंपनीने उत्तर प्रदेश वन महामंडळामार्फत महाराष्ट्राच्या वन विकास महामंडळाशी संपर्क साधला. भारत सरकारने स्थाहपन केलेल्याक श्री रामजन्माभूमी तीर्थ क्षेत्र या ट्रस्टर आणि मे. लार्सन अॅन्ड ट्युब्रो लि. या कंपनीमध्येण दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी करार करण्यात आला आहे.
मे. लार्सन अॅड ट्युब्रो लि. या कंपनीने फॉरेस्टू डेव्हेलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड या कंपनीस चिराण सागवान लाकडाचा आजतागायत ५०३४.८६३ घन. फुट. पुरवठा करण्यापसाठी मागणी पाठविण्याकत आली आहे. त्यानंतर वने, सांस्कृतिक कार्ये, मत्सव्यवसाय मंत्री तथा वन विकास महामंडळाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली २९ मार्च २०२३ ला श्रीराम मंदीराच्या गर्भगृहाचे महाद्वार, दरवाजे खिडक्यासाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या सागवानी चिराण साईजचे वनविकास महामंडळाच्या आगारातून विधिवत पुजा करुन भव्य काष्टपुजन शोभा यात्रा काढण्यात आली. याकरीता फॉरेस्टक डेव्हनलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रन लिमिटेड आणि मे. लार्सन अॅड ट्युब्रो लि. या कंपनीमध्ये चिराण सागवान लाकडाचा पुरवठा करण्यासाठी करार करणयात आला आहे.
त्यानुसार चिराण सागवान लाकडाचा २९१४.४४२ घन. फुट. पुरवठा करून त्याची किंमत रुपये २ कोटी २५ लाख ६ हजार ७३१ रुपये एवढी आहे. श्री राम मंदिर उभारणीचे काम जसजसे पुढे जाईल तसतसे वन विकास महामंडळाकडून अधिक सागवान चिराण साईजचा पुरवठा केला जाईल.फॉरेस्ट डेव्हरलपमेंट कॉर्पोरेशन ऑॅफ महाराष्ट्र लिमिटेड यांच्या अखत्यामरीत असलेल्या शासकीय आरागिरणी, आलापल्ली व बल्लाारशाह येथे मागणीनुसार चिराण सागवान माल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच वेळोवेळी अयोध्या राममंदीर ट्रस्टेचे प्रतिनिधी तसेच वास्तुविशारद चमू यांनी शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे भेट देऊन पुरवठा करण्यावकरीता चिराण सागवान लाकडाचा आकार आणि गुणवत्ता निश्चित करत आहेत.
श्री राम मंदिरासाठी जाणारं लाकूड ग्रेड थ्रीचे सागवान आहे. हे भारतातील उत्कृष्ट सागवान असून राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने आलापल्लीचे सागवान निवडण्यापूर्वी डेहराडून मधील राष्ट्रीय वन संशोधन संस्थेकडून देशभरातील सागवान लाकडाची तपासणी केली होती. त्यामध्ये गडचिरोलीचे सागवान उत्कृष्ट निघाले. त्यामुळे त्याची निवड करण्यात आल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर हे एक हजार वर्षे टिकेल असं भव्य दिव्य आणि मजबूत बांधलं जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने मंदिरातील विविध दारं आणि खांबांमध्ये वापरला जाणारा लाकूड ही तेवढाच मजबूत असायला हवा म्हणून गडचिरोलीतलं सर्वोत्कृष्ट लाकूड निवडलं आहे. या सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा, कीड यांचा प्रभाव होणार नाही. पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते असे त्याचे वैशिष्ट्य आहे.
सागाचे वैशिष्ट्य
बल्लारशाह सागवान लाकडात तेलाचे प्रमाण जास्त असल्याने उच्च शक्ती, जास्त टिकाऊपणा आणि कीटक आणि वाळवी प्रतिकारक फिनिशिंगनंतर तेलाचे प्रमाण जास्त असल्याने लाकडाची शायनिंग अतिशय सुंदर आणि आकर्षक असते.गडचिरोलीतील सागवानाचं वैशिष्ट म्हाजे या सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा,कीड यांचा प्रभाव होत नाही. पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते. या सागवानात टेक्टॉनीन हा ऑइल कन्टेन्ट खूप जास्त आहे, त्यामुळे याला कीड लागत नाही आणि लाकडात खूप चमक असते. राममंदिरासाठी निवडण्यात आलेली सागाची झाडं किमान ८० वर्षांची आहेत. त्यामुळे लाकडात ग्रेन्सची संख्या जास्त आहे, यामुळे लाकडाला विशिष्ट प्रकारचा ब्राऊन रंग येतो आणि हे लाकूड नक्षीकाम केल्यावर खूप सुंदर दिसतं. हे सर्व लाकूड नॅचरल फॉरेस्टमधील असल्याने याला कीड लागत नाही आणि हे लाकूड खूप जीवट असते.
The post राम मंदिराच्या बांधकामात गडचिरोलीचे योगदान; आलापल्लीचे सागवान लाकूड प्रभू रामचंद्राच्या दारी first appeared on TEJPOLICETIMES.
]]>धुळे: अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन येत्या २३ जानेवारीला होणार असून या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या विविध जाहिराती भाजपाकडून केल्या जात आहे. यात करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये बाल रूपात असलेल्या श्री रामाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंदिरात घेऊन जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टरचा शिवसेनेच्या ठाकरे गटाने धुळ्यात निषेध व्यक्त करीत हेच का भाजपाचे हिंदुत्व? […]
The post राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने काढलेले चित्र वादात? ठाकरे गटाकडून निषेध, वाचा नेमकं प्रकरण first appeared on TEJPOLICETIMES.
]]>धुळ्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रकाशित केले. हे पोस्टर हातात घेऊन शिवसेना कार्यालय ते आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर पायी मार्च काढत निषेध व्यक्त करत भाजपला सत्तेचा माज आल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तारी यांनी यावेळी केला.
The post राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने काढलेले चित्र वादात? ठाकरे गटाकडून निषेध, वाचा नेमकं प्रकरण first appeared on TEJPOLICETIMES.
]]>