Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राम मंदिराच्या बांधकामात गडचिरोलीचे योगदान; आलापल्लीचे सागवान लाकूड प्रभू रामचंद्राच्या दारी

9

गडचिरोली: संपूर्ण जगाला भुरळ घालणारे सागवान लाकूड गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली वनविभागात आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या येथील सागवान लाकडाने आधुनिक काळातच नाही तर ब्रिटीश काळातही जगाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील एकूण वनापैकी गडचिरोली जिल्ह्यात जवळपास २८ टक्के जंगल आहे.

यातही येतील काही प्रजाती अतिशय मौल्यवान असून येथील सागवान लाकडाला देशात मोठी मागणी आहे. त्यामुळेच अयोध्येत बांधण्यात आलेल्या प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरासाठी कोट्यावधी रुपये किमतीचे येथील सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे. राज्यात वनाच्छादित म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्र पर्यटकांना खुणावत असते. अस्सल नैसर्गिक वनसंपदा असलेल्या येथील लाकडाला वेळोवेळी मागणी राहिली आहे. आधुनिक काळातही मागणी कायम आहे. परंतु बाहेरून येथील सागवनाला आलेली ही पहिलीच मागणी नाही तर यापूर्वीही अनेक राज्यांना येथील मजबूत सागवनाचा तांबूसपणा हवाहवासा वाटला आहे.
रामलल्ला हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक; २२ जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करा, हिंदू महासभेची मागणीत्यामुळेच येथील सागवान लाकडाची मागणी इतर राज्यातही मोठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात सागवनासह येन, बीजा, खैर, बेहडा, अंजन, मोह, चार, तेंदू आदींसह विविध प्रजातींची झाडे आहेत. या लाकडांचा इमारत बांधकामासाठी उपयोग केला जातो. मात्र, शोभेच्या वस्तू, इमारत सजावट तसेच भौतिक सुविधेच्या वस्तू तयार करण्यासाठी सागवानाला सर्वाधिक मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सागवन वृक्ष आढळून येतात. तरी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आलापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या वनविभागात सागवानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही आलापल्ली वनविभागातील सागवान उच्च दर्जाचे आहे. लाकूड नव्हे तर सोन्याप्रमाणे येथील सागवानाला मागणी आहे.

ब्रिटीश कालीन इतिहास
भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले. व्यापारी म्हणून आलेले ब्रिटीश राज्यकर्ते बनले, असे म्हटले जाते. ब्रिटीशांची राजवट असताना स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादमार्गे तत्कालीन सिरोंचा जिल्ह्यातून ब्रिटिश अधिकारी विद्यमान गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत असत. याचवेळी त्यांना आलापल्लीतील सागवानाने खुणावले. त्यानंतर त्यांनी येथील सागवान ब्रिटिश राज्याच्या महालात लाकूड कामासाठी वापरले, असे जुने जाणकार सांगतात. आजही सिरोंचा तालुक्यातून तेलंगाना, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणावर सागवान लाकडाची तस्करी होत असते. याचाच अर्थ येथील सागवान लाकडाचे वैशिष्ट्य दिसून येतात.

गडचिरोलीच्या लाकडाने सजली भारतीय संसद स्वातंत्र्यपूर्व काळात येथील सागवान लाकूड सातासमुद्रापार गेल्याचे सांगीतले जाते. दक्षिण भागातील उच्च दर्जाचे सागवान लाकूड परराज्यात तर पोहोचलेच, परंतु देशाच्या राजधानीतील संसदेतही पोहोचले आहे. संसदेत विविध प्रकारचे लाकूडकाम करण्याकरिता १ कोटी १२ लाख ३८ हजार २१६ रुपयांचे चिराण सागवान, तर ५० कोटी रुपयांचे ५०० घनमीटर गोल लाकूड असे एकूण ५१ कोटींवर किमतीचे सागवान आलापल्लीतून गेल्याचे सांगण्यात येत आहे. परराज्यातही शासकीय कामात वापर गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील विशेषत: आलापल्ली येथील सागवान लाकडाचा वापर केला जाते. केरळ, कर्नाटक, बिहार तसेच उत्तर व दक्षिण भागातील राज्यांमध्ये शासनाच्या विविध कामांकरिता येथील लाकडाचा पुरवठा करण्यात आला आहे. सदर सागवानाचा वापर शासकीय कार्यालयांमध्ये लाकूड कामाकरिता करण्यात आला.

अयोध्येतील प्रभू श्री राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली परिसरातील जंगलाच्या सागवानाची निवड करण्यात आली. यामुळे आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथून प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी लाकडं पाठवण्याची संधी मिळाल्याने याचा मनस्वी आनंद आणि समाधान झाल्याची भावना आलापल्लीकर व्यक्त करत आहेत.

राज्यात वन विकास महामंडळाची (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (FDCM) स्थापना १९७४ मध्ये झाली. ही पूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची कंपनी आहे. महाराष्ट्र सरकारने ३.४३ लाख हेक्टर जंगल वन विकास महामंडळाला (FDCM) त्यांच्या उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. ते राज्याच्या एकूण वनक्षेत्राच्या ६.०० टक्के इतके आहे. वन विकास महामंडळाला सागवान लागवडीचा आणि लाकूड, सरपण आणि बांबू यांसारख्या वन उत्पादनांची विक्री करण्याचा जवळपास पाच दशकांचा अनुभव आहे. वन विकास महामंडळ त्याच्या परिपक्व सागवान रोपवन आणि शाश्वत व्यवस्थापित जंगलांमधून सुमारे ५०.००० घनमीटर लाकडाचे उत्पादन करते.

प्रणिती शिंदेंच्या प्रचाराने अडचणी वाढल्या तरी आडम मास्तरांनी रे नगर गृहप्रकल्प साकारलाच

अंतिम ग्राहकांना दर्जेदार लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी, कंपनीने अलीकडेच चिराण लाकडाचे उत्पादन आणि मार्केटिंगमध्ये पाऊल टाकले व आता अल्लापल्ली प्रदेशात ०५ सॉ मिल व बल्लारशाह येथे ०५ सॉमिल कार्यरत आहेत. जानेवारी २०२२ पासून वन विकास महामंडळाने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प (नवीन संसद भवन), डी.वाय. पाटील, विद्यापीठ आणि माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, सातारा यांसारख्या अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांना सागवान लाकडाचा पुरवठा केला आहे. अलीकडच्या घडामोडींमध्ये, अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम (रचना ) करणाऱ्या लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीने बांधकामासाठी त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे सागवान लाकूड पुरवण्यासाठी वन विकास महामंडळाशी संपर्क साधला आहे.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटकडे राम मंदिराच्या बांधकामासाठी उत्तम दर्जाच्या सागवान लाकडाची चौकशी केली. वन संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील गडचिरोली (चंद्रपूर) विभागातील सागवान लाकडाचा सल्ला दिला. रामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम करणाऱ्या लार्सन अँन्ड टुब्रो कंपनीने उत्तर प्रदेश वन महामंडळामार्फत महाराष्ट्राच्या वन विकास महामंडळाशी संपर्क साधला. भारत सरकारने स्थाहपन केलेल्याक श्री रामजन्माभूमी तीर्थ क्षेत्र या ट्रस्टर आणि मे. लार्सन अॅन्ड ट्युब्रो लि. या कंपनीमध्येण दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी करार करण्यात आला आहे.

मे. लार्सन अॅड ट्युब्रो लि. या कंपनीने फॉरेस्टू डेव्हेलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड या कंपनीस चिराण सागवान लाकडाचा आजतागायत ५०३४.८६३ घन. फुट. पुरवठा करण्यापसाठी मागणी पाठविण्याकत आली आहे. त्यानंतर वने, सांस्कृतिक कार्ये, मत्सव्यवसाय मंत्री तथा वन विकास महामंडळाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली २९ मार्च २०२३ ला श्रीराम मंदीराच्या गर्भगृहाचे महाद्वार, दरवाजे खिडक्यासाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या सागवानी चिराण साईजचे वनविकास महामंडळाच्या आगारातून विधिवत पुजा करुन भव्य काष्टपुजन शोभा यात्रा काढण्यात आली. याकरीता फॉरेस्टक डेव्हनलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रन लिमिटेड आणि मे. लार्सन अॅड ट्युब्रो लि. या कंपनीमध्ये चिराण सागवान लाकडाचा पुरवठा करण्यासाठी करार करणयात आला आहे.

त्यानुसार चिराण सागवान लाकडाचा २९१४.४४२ घन. फुट. पुरवठा करून त्याची किंमत रुपये २ कोटी २५ लाख ६ हजार ७३१ रुपये एवढी आहे. श्री राम मंदिर उभारणीचे काम जसजसे पुढे जाईल तसतसे वन विकास महामंडळाकडून अधिक सागवान चिराण साईजचा पुरवठा केला जाईल.फॉरेस्ट डेव्हरलपमेंट कॉर्पोरेशन ऑॅफ महाराष्ट्र लिमिटेड यांच्या अखत्यामरीत असलेल्या शासकीय आरागिरणी, आलापल्ली व बल्लाारशाह येथे मागणीनुसार चिराण सागवान माल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच वेळोवेळी अयोध्या राममंदीर ट्रस्टेचे प्रतिनिधी तसेच वास्तुविशारद चमू यांनी शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे भेट देऊन पुरवठा करण्यावकरीता चिराण सागवान लाकडाचा आकार आणि गुणवत्ता निश्चित करत आहेत.
बळे आगळा राम कोदंडधारी! अयोध्येच्या मंदिरातील रामलल्लाचं मोहक रुप पाहिलंत का?
श्री राम मंदिरासाठी जाणारं लाकूड ग्रेड थ्रीचे सागवान आहे. हे भारतातील उत्कृष्ट सागवान असून राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने आलापल्लीचे सागवान निवडण्यापूर्वी डेहराडून मधील राष्ट्रीय वन संशोधन संस्थेकडून देशभरातील सागवान लाकडाची तपासणी केली होती. त्यामध्ये गडचिरोलीचे सागवान उत्कृष्ट निघाले. त्यामुळे त्याची निवड करण्यात आल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर हे एक हजार वर्षे टिकेल असं भव्य दिव्य आणि मजबूत बांधलं जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने मंदिरातील विविध दारं आणि खांबांमध्ये वापरला जाणारा लाकूड ही तेवढाच मजबूत असायला हवा म्हणून गडचिरोलीतलं सर्वोत्कृष्ट लाकूड निवडलं आहे. या सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा, कीड यांचा प्रभाव होणार नाही. पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते असे त्याचे वैशिष्ट्य आहे.

सागाचे वैशिष्ट्य
बल्लारशाह सागवान लाकडात तेलाचे प्रमाण जास्त असल्याने उच्च शक्ती, जास्त टिकाऊपणा आणि कीटक आणि वाळवी प्रतिकारक फिनिशिंगनंतर तेलाचे प्रमाण जास्त असल्याने लाकडाची शायनिंग अतिशय सुंदर आणि आकर्षक असते.गडचिरोलीतील सागवानाचं वैशिष्ट म्हाजे या सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा,कीड यांचा प्रभाव होत नाही. पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते. या सागवानात टेक्टॉनीन हा ऑइल कन्टेन्ट खूप जास्त आहे, त्यामुळे याला कीड लागत नाही आणि लाकडात खूप चमक असते. राममंदिरासाठी निवडण्यात आलेली सागाची झाडं किमान ८० वर्षांची आहेत. त्यामुळे लाकडात ग्रेन्सची संख्या जास्त आहे, यामुळे लाकडाला विशिष्ट प्रकारचा ब्राऊन रंग येतो आणि हे लाकूड नक्षीकाम केल्यावर खूप सुंदर दिसतं. हे सर्व लाकूड नॅचरल फॉरेस्टमधील असल्याने याला कीड लागत नाही आणि हे लाकूड खूप जीवट असते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.