बॉलिवूडकरांकडून पॅरा ऑलिम्पिकमधील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव, भारताचे नाव गौरवण्यासाठी अभिमान व्यक्त
‘स्त्री २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
sacnilk ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘स्त्री २’ ने १६ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी देशात ८.२५ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. ‘ॲनिमल’ आणि ‘गदर २’च्या तिसऱ्या शुक्रवारच्या कमाईपेक्षा ही कमाई जास्त आहे. एका दिवसापूर्वीच या चित्रपटाने ८.५० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ चित्रपटगृहांमध्ये खूप मजबूत पकड धरुन आहे. कडाचित तिसऱ्या वीकेंडला हा सिनेमा नवीन रेकॉर्ड करु शकतो.
कारमध्ये बिघाड,अभिनेत्रीची थेट कंपनीवर कारवाई! मानसिक त्रासामुळे ५० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा
‘स्त्री २’ जागतिक कलेक्शन
देशात १६ दिवसांत ३३१.३० कोटी रुपयांचे कलेक्शन करणाऱ्या ‘स्त्री २’ने जगभरात ६३०.१५ कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे. भारता बाहेर १६ दिवसांत या सिनेमाने १०३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट जगभरातील ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करु शकतो.
Stree 2 ने कमाईत ॲनिमल आणि गदर २ लाही टाकलं मागे, १६ व्या दिवशी सिनेमाने किती कमावले?
‘इमर्जन्सी’ चा ‘स्त्री २’ वर फरक पडणार नाही
या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामुळे, ‘स्त्री २’ ला पैसे कमविण्याची आणखी संधी आहे. कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, दोन्ही चित्रपटांचे जॉनर खूप वेगळे आहे. त्यामुळे चौथ्या आठवड्यातही ‘स्त्री २’चा कमाईचा वेग कोट्यवधींमध्येच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सिनेमा जगभरात ८०० कोटींच्या क्लबमध्ये कधी प्रवेश करेल याकडे सर्वांच्या नजरा आहेत.