Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Kalki 2898 AD: प्रभासच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज; ‘कल्की’ पाहण्यासाठी पाचशे, हजार नव्हे तर मोजावे लागणार फक्त…

12

मुंबई – प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात १३०० कोटींची कमाई केली. २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेला ‘Kalki 2898 AD’ हा चित्रपट आजही चित्रपटगृहात तळ ठोकून आहे आणि बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करतोय. या आठवड्यात चित्रपटाची कमाई अधिक वाढणार असल्याचं रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे.
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर लाँच केली आहे. ही ऑफर अशी आहे की, या आठवड्यात ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट फक्त १०० रुपयात पाहता येणार आहे. २ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या कालावधीत हा चित्रपटाच्या तिकीटाची रक्कम १०० रुपये असणार आहे. ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाच्या तिकीटाची रक्कम हजार रुपयांच्या घरात गेली होती. चित्रपटाचे तिकीट दिवसेंदिवस महाग होत चालल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी कमी झाली. मात्र, आता ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट अवघ्या १०० रुपयात पाहता येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

१०० रुपयांमध्ये तिकीट विक्री

‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत १०० रुपयात हा सिनेमा पाहता येणार असल्याची घोषणा केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, ‘धन्यवाद, हा शब्द देखील छोटा आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे या आठवड्यात ‘मेगा ब्लॉकबस्टर कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचा अवघ्या १०० रुपयात आनंद घ्या.’ ही ऑफर २ ऑगस्टपासून एका आठवड्यासाठी उपलब्ध असल्याचेही सांगितले आहे.

Bigg Boss OTT 3 Grand Finale: नेजी की रणवीर शौरी? कोण जिंकणार ‘बिग बॉस ओटीटी ३’, ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर दिशा पाटणी, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान यांनी कॅमिओ केला आहे. ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येतोय याची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. रिपोर्टनुसार, ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.