Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 10 ऑगस्ट 2024: मूलांक 1 कामात अडथळे, निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ! मूलांक 5 नकारात्मक विचारांना दूर करा ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घ्या.
Numerology Prediction, 10 August 2024 : अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 साठी कामाच्या ठिकाणी आज वरिष्ठांकडून उपद्रव होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा. मूलांक 2 असणाऱ्यांसाठी आज कामात अडथळे येतील तर मूलांक 4 ज्यांचा आहे त्यांनी संयम आणि शांततेने निर्णय घ्यावा. मूलांक 8 असणाऱ्यांनी आज थोडा वेगळा विचार करायला हवा. मूलांक नऊसाठी आज दिवस अनुकूल आहे. यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया. तुमचा आजचा दिवस कसा असेल? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – वरिष्ठांकडून उपद्रव
कामाच्या ठिकाणी आजचा दिवस प्रतिकूल राहील. इतरांवर अत्याधिक विश्वास ठेवणे टाळले पाहिजे. स्वतःची कामे स्वतः पूर्ण करणे कधीही योग्य राहील. तुमचे प्रत्येक काम फोकस ठेवून करा. आज वरिष्ठांकडून काही उपद्रव होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा.
मूलांक 2 – कामात अडथळे येतील
मूलांक दोन असलेल्यांना आजचा दिवस चांगला नाही आणि तुमच्या कामात अडथळे येतील. जी कामे फक्त विचराधीन आहेत, अशा कामातही अडचणी येताना दिसतील. आज कोणाकडून तरी मदत घेणे चांगले होईल. सायंकाळी मानसिक चिंता वाढू शकते. तुम्हाला आज स्वतःची आणि इतरांची कामेही करावी लागतील. फार ताण घेऊ नका अन्यथा मानिसक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मूलांक 3 – ज्ञानाच्या माध्यमातून निर्णय घ्या
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील आणि व्यापारात तुम्हाला लोकांकडून लाभ मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या ज्ञानाच्या माध्यामातून निर्णय घ्यावे लागतील, तरच तुम्ही यशस्वी होतील. या वेळी तुमच्याकडे आंतरिक स्पष्टता आणि ज्ञान प्राप्त करण्याची चांगली क्षमता आहे. प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल त्यामुळे समाधान मिळेल.
मूलांक 4 – संयम आणि शांततेने निर्णय घ्या.
मूमलांक 4 असलेल्यांना आजचा दिवस फारसा चांगला म्हणता येणार नाही. तुम्हाला आईवडिलांकडून काही मोकळीक मिळेल. तर दुसरीकडे काही लोक तुम्हाला बिघाडवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला संयम आणि शांततेने निर्णय घ्यावे लागतील. आज कोणताही निर्णय घेताना वरिष्ठ किंवा तज्ज्ञ लोकांचा सल्ला आवर्जून घ्या.
मूलांक 5 – नकारात्मक लोकांपासून दूर राहा
आजच्या दिवशी तुमच्यासमोर यशाची संधी आहे पण यासाठी तुम्हाला काही काळजी घ्यावी लागू शकते. तुमच्यासाठी दिवस ठिक ठिक आहे.नकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांपासून दूर राहा. असे लोक तुम्ही निवडलेल्या मार्गांपासून तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत असतात. नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मक विचार करायला शिकायला हवे.
मूलांक 6 – कामात फोकस आणि नाविन्य हवे
मूलांक 6 साठी दिवस थोडा त्रासदायक आहे. आज अनावश्यक गोष्टींत गुंतून पडणे त्रासदायक होईल. काही जुने मुद्दे तुम्हाला जे पुन्हा तुम्हाला त्रास देतील. नको त्या गोष्टीमध्ये गुंतून राहू नका. कामाकडे लक्ष द्या तसेच त्याच थोडे नावीन्य आणण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 7 – आजचा दिवस लाभाचा
तुमच्यासाठी आज लाभाचा दिवस आहे. तुम्हाला तुमची स्वप्नं आणि कल्पना याकडे लक्ष देत पुढे वाटचाल केली पाहिजे. परीक्षांमध्ये काही खंड पडला होता, तो सुरू होईल, त्यामुळे तुम्हाला तयारीत राहावे लागेल. व्यापारी आणि नोकरदरांसाठी दिवस उत्तम आहे.
मूलांक 8 – परिघाकडे विचार करावा लागेल
मूलांक 8 साठी दिवस चांगला आहे पण त्यासाठी आज गोष्टींना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या परिघाकडे पाहिले पाहिजे आणि चाकोरीबाहेर पाहिले तर तुम्ही पुढे जाऊ शकाल. तुमच्या कामात नाविन्यता आणा त्यामुळे तुमचे सगळेकडे कौतुक होईल.
मूलांक 9 – प्रसन्न वाटेल
मूलांक 9 असलेल्यांना आज दिवस अनुकूल आहे. दिवसाची सुरुवात अशा एका कामामुळे होईल, ज्यातून तुम्हाला प्रसन्न वाटेल. आजचा दिवस तुम्ही शॉपिंग आणि भटकंतीत व्यस्त असाल. आज खर्च जास्त होणार आहे तेव्हा मिळकत आणि खर्च यांची सांगड घालायचा प्रयत्न करा.