Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Budh vakri 2024 In Marathi : बुध कर्क राशीत वक्री ! या 6 राशी होणार मालामाल ! व्यवसायात फायदा, नोकरीत बढती !

10

Mercury Transit In Cancer In Retrograde Motion : बुध ग्रह २२ ऑगस्ट रोजी कर्क राशीत वक्री चालीने संक्रमण करणार आहे. जेव्हा एखाद्या ग्रहाचे संक्रमण होते त्यावेळी १२ राशींवर त्याचा प्रभाव पडतो याच प्रमाणे बुधाचे हे संक्रमण काही राशींवर सकारात्मक परीणाम देणारे आहे. या राशीच्या जातकांना व्यवसाय आणि नोकरीत उत्तम फायदा होणार असून धनसंपत्तीत वाढ होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Budh vakri 2024 In Marathi : बुध कर्क राशीत वक्री ! या 6 राशी होणार मालामाल ! व्यवसायात फायदा, नोकरीत बढती !
Budh Vakri Sankraman: 22 ऑगस्ट रोजी बुध वक्री होऊन कर्क राशीत प्रवेश करणार आहेत आणि 28 ऑगस्टला कर्क राशीतच मार्गक्रमण करणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार, मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध असून तो बुद्धीमत्ता, शैक्षणिक क्षमता आणि नोकरी व व्यवसायाचा कारक ग्रह आहे. बुध ग्रह हा सर्वात लहान आणि सर्वात वेगाने फिरणारा ग्रह असून तो चंद्राप्रमाणे संवेदनशील देखील आहे. वक्री चालीने बुधाचा कर्क राशीत होणार प्रवेश अनेक नेक राशींना लाभदायक आहे. त्या राशींना प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळेल तसेच नोकरी आणि व्यवसायात जबरदस्त यश मिळेल. चला तर जाणून घेऊया बुधाच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

बुधाच्या वक्री चालीचा वृषभ राशीवर प्रभाव

वक्री बुध ग्रहाच्या कर्क राशीतील संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल. तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील आणि तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. या काळात तुम्हाला नोकरी बदलायची असल्यास, तुमची ही इच्छा पूर्ण होईल. व्यापाऱ्यांसाठी देखील धन लाभाचे योग बनत आहेत. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर उत्तम प्रकारे मांडू शकाल आणि तुमचे बोलणे सगळ्यांना प्रभावित करेल. या काळात कुटुंबातील सर्व सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि घरात काही शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते.

बुधाच्या वक्री चालीचा कन्या राशीवर प्रभाव

बुधाच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीचे लोक जास्तीत जास्त बचत करणार आहेत. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम लाभ मिळेल त्यामुळे गुंतवणूक कराच. नोकरी करणारे जातक या काळात बुद्धी आणि कौशल्याच्या मदतीने अधिकाऱ्यांना प्रभावित करू शकतील आणि करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना चांगला नफा मिळेल. तसेच तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच टक्कर देणार आहात. तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा कोणी पैसे देत नसेल तर या काळात ते मिळू शकतात ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या बहुतेक इच्छा पूर्ण होतील आणि धार्मिक कार्यात तुमचे मन लागेल आणि तुम्ही दानधर्म देखील कराल.

बुधाच्या वक्री चालीचा तुळ राशीवर प्रभाव

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तुळ राशीच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतील आणि तुमचे बोलणे सगळ्यांना प्रभावित करेल. तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर तर्कसंगतपणे मांडाल, आणि तुमचे खर्चही कमी होतील. तुमचे जे कार्य खूप काळापासून अडकले होते, ते या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामामुळे एक वेगळे स्थान निर्माण कराल. या काळात तुम्ही कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण कराल आणि घरगुती जीवनात शांतता आणि सौहार्द राहील. जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा जुन्या घराचे बांधकाम सुरू करण्याची योजना आखत असाल, तर उत्तम वेळ आहे, लगेच काम सुरु करा.

बुधाच्या वक्री चालीचा वृश्चिक राशीवर प्रभाव

बुध वक्रि गतीने कर्क राशीत संक्रमण करत आहे यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांचे सर्व उद्दिष्टे पूर्ण होतील आणि ते धार्मिक यात्राही होणार आहे. धार्मिक कार्यात तुम्ही अधिक रुची घेणार असून दान-धर्म वाढणार आहे. या राशीचे काही लोक परदेशात जाण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात तुमच्या रणनीतींमुळे तुम्हाला चांगला लाभ मिळवू शकाल आणि व्यवसायाचा विस्तारही कराल. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्यांची प्रगती होणार आहे. घरातील सदस्यांशी तुमचे संबंध अनुकूल राहतील आणि कुटुंबामधील काळजी किंवा टेन्शन कमी होणार आहे.

बुधाच्या वक्री चालीचा धनु राशीवर प्रभाव

बुधाच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व सकारात्मक होणार आहे. याचा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. तुमच्या वाणीने तुम्ही सर्वांना प्रभावीत कराल. तुम्ही तुमचे विचार इतरांच्या समोर तर्कसंगतपणे मांडाल आणि तुमचे खर्चही कमी होतील. तुमची जी कामे खूप काळापासून अडकलेली आहेत ती या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामात एक वेगळे स्थान मिळवाल. या काळात तुम्ही कुटुंबातील सर्व गरजा पूर्ण कराल. कुटुंबात सुख-शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. जर तुम्ही नवीन घर खरेदी करायचे ठरवत असाल किंवा जुन्या घराचे बांधकाम सुरू करायचे ठरवत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.

बुधाच्या वक्री चालीचा मीन राशीवर प्रभाव

बुधाच्या कर्क राशीतील वक्री संक्रमणामुळे मीन राशीच्य लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फायदा होणार आहे. व्यापारात लाभ मिळणार असून तुम्ही एक यशस्वी व्यावासायिक म्हणून समाजासमोर येणार आहात. तुमच्या व्यवसायातील कल्पना सगळ्यांना आवडतील, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्तम संतूलन ठेवण्यात यशस्वी व्हाल. सरकारी कामे पटापट मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांसोबत आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापीत होतील याचा फायदा कामकाजात दिसून येईल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.