Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Weekly Love Horoscope 26 August to 1 September 2024 : मेषसह २ राशींच्या नात्यात ठिणगी! रागावर नियंत्रण ठेवा, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

10

Weekly Love Horoscope 26 August to 1 September 2024:
ऑगस्ट महिन्याच्या या आठवड्यात जन्माष्टमी असणार आहे. तसेच मंगळाचे मिथुन राशीत संक्रमण झाल्याने काही राशींवर त्याचा अशुभ परिणाम पडेल. त्यामुळे प्रेमीजीवनात सावध राहावे लागणार आहे. तसेच या आठवड्यात धनसंपत्तीचे योग देखील तयार होत आहे. जाणून घेऊया मेष ते मीन पर्यंतच्या १२ राशींचे प्रेम राशीभविष्य सविस्तर.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Weekly Love Horoscope 26 August to 1 September 2024 : मेषसह २ राशींच्या नात्यात ठिणगी! रागावर नियंत्रण ठेवा, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?
Saptahik Love Rashifal 26 August to 1 September 2024 :
ऑगस्ट महिन्याच्या या आठवड्यात जन्माष्टमी असणार आहे. तसेच मंगळाचे मिथुन राशीत संक्रमण झाल्याने काही राशींवर त्याचा अशुभ परिणाम पडेल. त्यामुळे प्रेमीजीवनात सावध राहावे लागणार आहे. तसेच या आठवड्यात धनसंपत्तीचे योग देखील तयार होत आहे. प्रेमसंबंधामध्ये दुसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. रागामुळे तुमच्या नात्यात दूरावा येईल. प्रेमसंबंधात तुम्ही काही बदल करताना विचार करा,अन्यथा नुकसान होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी अनावश्यक वाद टाळल्याने चांगले परिणाम दिसून येतील. जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यातील या आठवड्याचे साप्ताहिक प्रेम भविष्य.

मेष साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – रागावर नियंत्रण ठेवा

या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना थोड संयमी राहावे लागणार आहे. प्रेमसंबंधामध्ये दुसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. रागामुळे तुमच्या नात्यात दूरावा येईल. अनावश्यक वाद टाळल्यास परिणाम चांगले मिळतील. आठवड्याच्या शेवटी प्रेमजीवनात आनंद येईल.

वृषभ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – प्रेमात चढ-उतारांचा सामना

वृषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमाच्याबाबतीत चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. प्रेमसंबंधात तुम्ही काही बदल करताना विचार करा,अन्यथा नुकसान होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी अनावश्यक वाद टाळल्याने चांगले परिणाम दिसून येतील. प्रेम जीवनात शांतता राहिल. तुमच्यासाठी सुखद योगायोग घडतील.

मिथुन साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – प्रेमजीवनाचा आनंद घ्याल.

मिथुन राशीसाठी हा आठवडा प्रेमाच्याबाबतीत लकी असेल. जोडीदारासोबत प्रेम जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. प्रेम जीवनात रोमान्स टिकवून ठेवाल. प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल. मोठ्यांच्या आशीर्वादाने नात्यात सुसंवाद घडतील.

कर्क साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – नात्यात सकारात्मक राहा.

कर्क राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला प्रेम जीवनात गोंधळलेले असाल. प्रेमसंबंधात थोडे सकारात्मक राहा. जोडीदाराची साथ दिल्याने लव्ह लाईफ सुधारेल. आठवड्याच्या शेवटी प्रेमाच्या बाबतीत हा काळ अनुकूल असेल.

सिंह साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – नात्यात संवाद साधा

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असेल. या काळात प्रेम जीवनात निर्णय घेणे कठीण जातील. नात्यातील वाद संवाद साधून सोडवा. आठवड्याच्या शेवटी वेळ अनुकूल असेल. जोडीदारासोबत कुठे तरी फिरायला जाल.

कन्या साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – प्रेम जीवनात लाभ

या आठवड्यात कन्या राशीसाठी प्रेम जीवनात लाभाचा असेल. संयमाने निर्णय घेतल्यास गोष्टी सहज सुटतील. मातृत्वाच्या स्त्रीबद्दल वाईट वाटेल त्यामुळे चिंता वाढेल. प्रेमसंबंधांवर अधिक लक्ष द्या. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा आनंद आणि समृद्धीचा असेल.

तुळ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – जोडीदाराशी भांडण होईल

हा आठवडा तुळ राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या बाबतीत सुख समृद्धीचा असेल. परस्पर संबंध दृढ झाल्याने कुटुंबात आनंद येईल. प्रेमसंबंधातील मुद्दे संवादाने सोडवले तर चांगले परिणाम मिळतील. प्रेमाच्या बाबतीत हा काळ थोडा गंभीर असेल. आळस सोडल्यास नात्याला बहर येईल. जोडीदाराशी भांडण होऊ शकते.

वृश्चिक साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – नात्यात वाद वाढेल

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल. प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील. नात्यात बऱ्यापैकी सुधारणा असेल. काहींसाठी शुभ विवाहाची संधी तयार होईल. इतरांमुळे नात्यात विवाद वाढू शकतो. मनातील शंका बोलून दाखवा.

धनु साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – प्रेम जीवनाला बहर

धनु राशीच्या लोकांना परस्पर प्रेम संबंधांच्या बाबतीत फायदा होईल. प्रेम जीवनात आनंदी असाल. प्रियजनांच्या सहवासात पार्टीच्या मूडमध्ये असाल. स्त्रीच्या मदतीने प्रेम जीवनाला बहर येईल. जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान कराल. प्रेमाच्याबाबतीत हा आठवडा चांगला असेल.

मकर साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – नात्यातील संतुलन बिघडेल

मकर राशीच्या लोकांसाठी प्रेम संबंधाच्या बाबतीत हा आठवडा आनंदाने भरलेला असेल. जीवनात संतुलन राखल्याने पुढे जाल. आठवड्याच्या उत्तरार्धात आनंदी असाल. प्रेम वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. जोडीदाराला मत मांडण्याची संधी द्या अन्यथा नात्यातील संतुलन बिघडेल.

कुंभ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – प्रेमात निर्णय घेणे टाळा

कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा आनंदाचा असेल. तुम्ही तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीची शुभ संधी घेऊन याल. कुटुंबातील लोकांसोबत तुमचे चांगले जमेल. महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करा. प्रेमाच्या बाबतीत मोठे निर्णय घेणे टाळा.

मीन साप्ताहिक प्रेम राशीभविष्य – जोडीदारासोबत फिरायला जाल

मीन राशीच्या लोकांसाठी प्रेम जीवनात हा आठवडा शुभ ठरणार आहे. जीवनातील आनंदाची दारे खुली होतील. आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. प्रेम जीवनात जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णय घ्याल. जोडीदाराकडे तुमचे मन आकर्षित होईल.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.