Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, २५ ऑगस्ट २०२४ : कुंभसह ३ राशींचा विश्वासघात होण्याची शक्यता! कर्ज घेणे टाळा, वाचा रविवारचे राशीभविष्य

8

Rashi Bhavishya 25 August 2024 Today Horoscope in Marathi : आज २५ ऑगस्ट रविवार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असल्यामुळे धुव्रयोगासह विष्टि आणि भाव करण आहे. आजच्या दिवशी कुंभसह २ राशींच्या आयुष्यात वादळ येऊ शकते. त्यासाठी जपून राहा. नात्यात धोका मिळू शकतो. जवळच्या मित्र भेटल्याने आनंदी असाल. कामाच्या ठिकाणी चांगले मित्र भेटतील. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, २५ ऑगस्ट २०२४ : कुंभसह ३ राशींचा विश्वासघात होण्याची शक्यता! कर्ज घेणे टाळा, वाचा रविवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 25 August 2024 :
आज २५ ऑगस्ट रविवार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असल्यामुळे धुव्रयोगासह विष्टि आणि भाव करण आहे. आजच्या दिवशी कुंभसह २ राशींच्या आयुष्यात वादळ येऊ शकते. त्यासाठी जपून राहा. नात्यात धोका मिळू शकतो. जवळच्या मित्र भेटल्याने आनंदी असाल. कामाच्या ठिकाणी चांगले मित्र भेटतील. कोणतेही व्यवहार करायचा असेल तर मनापासून करा त्यामुळे भविष्यात फायदा होईल. तुम्हाला शुभ समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. शारीरिक आजार वाढतील. सामाजिक कार्यात अडथळे येतील. एखाद्याच्या मदतीने अचानक लाभ मिळेल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – कर्ज घेणे टाळा

आज बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार टाळा. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. सरकारकडून सन्मान होईल. जवळच्या मित्र भेटल्याने आनंदी असाल. कामाच्या ठिकाणी चांगले मित्र भेटतील.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा

वृषभ – रखडलेली कामे पूर्ण होतील.

आज तुम्हाला थोडा प्रवास करावा लागेल. दुखापत होण्याची शक्यता आहे. कोणतेही व्यवहार करायचा असेल तर मनापासून करा त्यामुळे भविष्यात फायदा होईल. तुम्हाला शुभ समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. निर्णय घेण्याची क्षमता आज फायदेशीर ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा

मिथुन – अचानक लाभ होईल

आज तुमचा दिवस निरुपयोगी ठरेल. परंतु, तुम्हाला ते टाळावे लागेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. शारीरिक आजार वाढतील. सामाजिक कार्यात अडथळे येतील. एखाद्याच्या मदतीने अचानक लाभ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद राहिल.

कर्क – आरोग्याची काळजी घ्या

आज तुमच्या व्यवसायातील बाह्य व्यवहार निश्चित होतील. मातृपक्षाकडून प्रेम आणि स्नेह मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सुखसोयींवर थोडे पैस खर्च कराल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे अन्न खाणे टाळा. ऐषोआरामावर पैसे खर्च कराल. मेहनतीचे फळ मिळेल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा

सिंह – डोळ्यांचा त्रास होईल.

आज डोळ्यांशी संबंधित समस्या त्रास देतील. सासरच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. बोलण्यात गोडवा ठेवा, अन्यथा नात्यात दुरावा येईल. पालकांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आराम मिळेल. रागावलेल्या जोडीदाराची समजूत काढाल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्नपदार्थ खाऊ घाला.

कन्या – आरोग्याची काळजी घ्या

आज मनातील भय संपेल. कठीण काम धैर्याने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमचा जोडीदार शारीरिक समस्यांमुळे त्रस्त असेल. लोकांच्या कल्याणासाठी मनापासून पुढे याल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायातही आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. अनावश्यक वादात पडणे टाळा.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा

तुळ – प्रलंबित पैसे मिळतील.

आज तुमचा हक्क आणि संपत्तीत वाढ होईल. गुरुप्रती निष्ठा वाढेल. नवीन कामात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला जाईल. भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. लोकांची मनापासून सेवा करण्यासाठी पुढे याल. सासरच्या लोकांकडून मान मिळेल. भावाच्या मदतीने तुमचे प्रलंबित पैसे मिळू शकतात.
आज भाग्य ७३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा

वृश्चिक – विवाहाचा प्रस्ताव येईल

आज तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. त्यामुळे मन अशांत राहिल. तुमचे काही वाद तुम्हाला यश मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. विवाहाचा प्रस्ताव येईल. व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. वडिलांचा सल्ला घ्याल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची पूजा करा.

धनु – बाहेरचे खाणे टाळा

आज परोपकाराची भावना निर्माण होईल. सासरच्यांकडून आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोट आणि वाऱ्याचा त्रास होईल. बाहेरचे खाणे पिणे टाळा. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळेल.
आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालीसाचे पठण करा

मकर – अनावश्यक खर्च वाढतील

आज तुम्हाला काही मौल्यवान गोष्टी मिळतील. अनावश्यक खर्चांना सामोरे जावे लागेल. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होतील. नवीन काम हाती घेतल्याने भविष्यात तुम्हाला फायदा होईल. मुलांचा आत्मविश्वास वाढेल.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना वस्त्र दान करा

कुंभ – विश्वासघात होण्याची शक्यता

आज तुमच्या बुद्धीमत्तेनुसार व्यवसाय नवीन शोध लावाल. कोणताही निर्णय घेतल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल. कुटुंबियांकडून तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. मित्रांशी बोलून तुमचे मन प्रसन्न होईल. सांसारिक सुखात वाढ होईल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा

मीन – जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल.

आज एखादे अपूर्ण काम पूर्ण होईल. मुलांच्या लग्नात अडथळे दूर होतील. कुटुंबात आनंदाची लहर येईल. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. सरकारी क्षेत्रातही तुमची कीर्ती पसरेल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवचालीसाचे पठण करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.