Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 29 ऑगस्ट 2024 : वृषभसह या राशींना प्रत्येक कामात नशिबाची साथ ! तुळ राशीच्या लोकांनी राहा सावध, अपघात किंवा चोरीची शक्यता! पाहा तुमचे राशिभविष्य

23

Finance Horoscope Today 29 August 2024 In Marathi : 29 ऑगस्ट आज मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. संपत्ती-मालमत्ता याबाबतीत तुम्हाला फायदा होणार आहे.वृषभ राशीला प्रत्येक कामात नशिबाची साथ आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायासाठी दिवस ठिक आहे. कन्या राशीला प्रत्येक कामात यश आहे. धनू राशीसाठी कठोर परिश्रम असून कामे मार्गी लागणार आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी धनवृद्धीसह प्रत्येक कामे मार्गी लागणार आहे. मीन राशीने सावध रहावे ऑफिसमध्ये विरोधकांचे आक्रमण वाढणार आहे. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया 29 ऑगस्टचे आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 29 ऑगस्ट 2024 : वृषभसह या राशींना प्रत्येक कामात नशिबाची साथ ! तुळ राशीच्या लोकांनी राहा सावध, अपघात किंवा चोरीची शक्यता! पाहा तुमचे राशिभविष्य
Aaj che Aarthik Rashi Bhavishya 29 August 2024 : 29 ऑगस्ट मेष, वृषभ आणि मिथुन सह या राशींसाठी दिवस चांगला असून आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कन्या सह या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश आहे. सिंहसह या राशीच्या लोकांचे खर्च वाढणार आहेत. तुम्ही उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न करा. करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आर्थिक कुंडली काय सांगते ते जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिफल : संपत्ती-मालमत्ता याबाबत फायदा

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. संपत्ती-मालमत्ता याबाबतीत तुम्हाला फायदा होणार आहे. ऑफिसमध्ये तुमची कामे पटापट होणार आहेत. तुमच्या बोलण्याचा प्रभाव सगळ्यांवर पडेल त्यामुळे कार्यक्षेत्रात आज तुमचे वजन वाढेल. संध्यााकाळी आईची तब्येत बिघडू शकते, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यापारात कामे वाढणार असून तुमची धावपळ होईल पण संध्याकाळपर्यंत सगळं काही ठिक होणार आहे.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : प्रत्येक कामात नशिबाची साथ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही निर्भयपणे तुमची कामे करणार आहात. वाहन चालवताना सावध राहा. आज ऑफिसमध्ये आणि प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळे. आर्थिक स्थिती चांगली आहे तुम्ही गुंतवणुकीचा विचार करु शकता. व्यवसायात कामे वाढणार आहेत, तुम्ही व्यस्त राहणार फक्त नियोजन योग्य प्रकारे करा.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : रखडलेले पेमेंट मिळणार

मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत दिवस ठिक आहे. आज तुम्ही एका खास गोष्टी काळजी घ्यावी ती म्हणजे तुमच्या बोलण्याच मधुरता हवी. तुमच्या वाईट बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला राग येवू शकतो त्यामुळे तुमचेच निकसान होईल. तुमचे रखडलेले पेमेंट आज मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कोणतेही काम करताना बुद्धी चातुर्याचा वापर करा, त्यामुळे तुमचाचा फायदा होणार आहे. व्यवसायात चांगला नफा आहे.

कर्क आर्थिक राशिभविष्य : भावंडांकडून सहकार्य मिळणार नाही

कर्क राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायासाठी दिवस ठिक आहे. आज तुम्हाला विनाकारण बहिण-भाऊ असहाकार्य करतील, तुम्हाला मदत करणार नाहीत. तुमच्या स्वभावाबद्दल गंभीर राहा, कारण कठोर परिश्रमानेच तुम्ही तुमच्या कामांमध्ये यशस्वी होऊ शकता. भौतिक सुखसुविधांवर खर्च जास्त होईल. तुमचे विरोधक आज शांत असतील ते त्रास देणार नाहीत. तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि चांगल्या वागणुकिमुळे अनेकजण आज तुमच्यासोबत संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करतील.

सिंह आर्थिक राशिभविष्य : खर्च होणार, थांबलेली कामे मार्गी लागणार

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. आज तुम्ही दानधर्म करणार आहात तसेच जास्तीत जास्त वेळ धार्मिक अनुष्ठानांमध्ये व्यतीत होईल. आत्मविश्वासाच्या जोरावर केलेल्या प्रयत्नांना उत्तम यश मिळणार आहे. तुम्हा थोडा खर्च करावा लागेल पण त्यामुले रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नवीन योजनांवर आज काम सुरू होईल. तुमच्या कामाची घोडदौड पाहून विरोधक काहीच करु शकणार नाही.

कन्या आर्थिक राशिभविष्य : प्रत्येक कामात यश

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मागील काही दिवसांपासून तुम्हाला होणारा शारिरीक त्रास कमी होणार आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. तुमच्या कामामुळे सगळेजण प्रभावीत होणार असून तुमचे कौतुक आणि मान-सन्मान होणार आहे. आज प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल.

तुळ आर्थिक राशिफल : अपघात किंवा चोरी शक्यता, सावध राहा

तुळ राशीचे जे जातक विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक बाबतीत बदल दिसतो आहे. शिक्षणाबद्दल तुमची आवड वाढेल. नवीन गोष्टी शिकण्यात तसेच तुमचे विचार सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. आई-वडील, गुरू यांच्याप्रती निष्ठा ठेवा तुमच्या कामात नक्की यश येईल. संध्याकाळी अपघात किंवा चोरीचा धोका आहे, सावध राहा

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : खर्च होणार आहे

वृश्चिक राशीच्या लोकांचा खर्च वाढणार आहे. तुमचे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ लावणे गरजे आहे अन्यथा भविष्यात खूप त्रास होईल. मुलांच्या उत्कृष्ट कामामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमचे धैर्य आणि प्रतिभा यामुळे आज विरोधक तुमचे काहीच बिघडवू शकत नाहीत. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे मन आनंदी राहील. रात्री फिरण्यात आणि मौजमजा करण्यात वेळ जाणार आहे.

धनू आर्थिक राशिभविष्य : कठोर परिश्रम, कामे मार्गी लागणार

धनु राशीच्या लोकांना करिअरच्या बाबतीत दिवस चांगला आहे, तुमच्या ज्ञानात भर पडणार असून आज तुम्ही बुद्धी चातुर्याने प्रत्येक कठिण परिस्थीतीतून मार्ग काढाला. तुमच्या कठोर प्रयत्नांमुळे इच्छापूर्ती होईल. सरकारकडून तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी धार्मिक अनुष्ठानांत वेळ व्यतीत होईल तसेच तुम्ही शुभ कार्यात खर्च केल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढणार आहे.

मकर आर्थिक राशिफल : धनसंपत्तीत वाढ, व्यवसायात प्रगती

मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत दिवस उत्तम आहे. वडिलोपार्जीत धन मिळण्याची शक्यता आहे. कोणालाही अनावश्यकपणे सल्ला देऊ नका, कारण त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. रात्री पुण्य कार्यात व्यस्त राहणार आहात त्यामुळे ताण तणाव कमी होईल. व्यवसायात तुमची प्रगती आहे.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : धनवृद्धीसह प्रत्येक कामे मार्गी लागणार

कुंभ राशीच्या लोकांचा दिवस उत्तम आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होतील. उत्कृष्ट मार्गांनी मिळवलेले धन तुमच्या संपत्तीची वृद्धी करणार आहे. भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल. तुम्हाला मित्रांचे सहकार्य मिळेल आणि नवीन मित्रही भेटतील.

मीन आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये विरोधकांचे आक्रमण

मीन राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून तुमच्या स्वतःच्या संपत्तीत वाढ होईल. पत्नीकडून तसेच सासरच्या मंडळींकडून कामात सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये तुमचे गुप्त शत्रू आज आक्रमक होतील आणि वरिष्ठांकडे तुमच्या बद्दल तक्रार करतील, तेव्हा सावध राहा. आर्थिक स्थिती उत्तम असून व्यवसाय वाढीच्या दृष्टीने विचार करु शकता.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.