Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 9 सप्टेंबर 2024: विरोधकांचा त्रास, वाढविणार मानसिक ताण !वादविवादापासून दूर राहा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

23

Numerology Prediction, 9 September 2024 : सोमवार, 9 सप्टेंबर रोजी मूलांक 1 साठी ऑफिसमध्ये काम वाढणार आहे. तर मूलांक 2 चे जातक मुलांच्या तक्रारीमुळे वैतागणार आहेत. मूलांक 4 च्या लोकांनी कामात फोकस राहा. मूलांक 5 च्या लोकांना विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. मूलांक 7 असणाऱ्यांचा मानसिक ताणतणाव वाढणार आहे. तर मूलांक 8 च्या लोकांचा खर्च वाढणार आहे. मूलांक ९ असणाऱ्यांनी प्रवासात तब्येतीची काळजी घ्यावी. या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 9 सप्टेंबर 2024: विरोधकांचा त्रास, वाढविणार मानसिक ताण !वादविवादापासून दूर राहा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Aaj che ank bhavishya 9 September 2024: अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलाकं १,2 ३ आणि मूलांक 6 यांच्यासाठी दिवस फारसा ठिक नाही. कामाच अडचणी येणार किंवा तुमची तब्येत बिघडणार आहे. खर्चात वाढ होणार तसेच मानसिक त्रासाचा सामना करावा लागणार. मूलांक ९ असणाऱ्यांनी प्रवास करताना सावध राहावे, तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करु शकता फक्त तज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – एका व्यक्तीमुळे ऑफिसमध्ये काम वाढणार

मूलांक 1 असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. ऑफिसमध्ये वातावरण अनुकूल असेल. सहकारी कामात मदत करतील फक्त कोणत्यातरी व्यक्तीमुळे कामाचा भार थोडा वाढण्याची शक्यता आहे. कामात नियोजन करा. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. कुटुंबात वातावरण समाधानाचे असेल.

मूलांक 2 – मुलांच्या तक्रारीमुळे ताणतणाव वाढणार

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. घरी वातावरण आनंदाचे असेल. मुलांच्या बाबतीत काही तक्रारी आल्यामुळे ताण तणाव वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवून शांतपणे निर्णय घ्या. व्यवसायात गुंतवणूक करु शकता फक्त तज्ज्ञांचा सल्ला घ्या

मूलांक 3 – कौटुंबिक जीवनात तणावाची शक्यता

मूलांक 3 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्ही कामाच व्यस्त राहणार आहात.कौटुंबिक जीवनात काही कारणांमुळे ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. काम वाढणार आहे. आज खूप खरेदी करणार आहात त्यामुळे खर्च वाढणार. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, नक्की विचार करा.

मूलांक 4 – कामात फोकस राहा

मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला आहे. घरी वातावरण आनंदी असेल. कामात प्रामाणिकपणा ठेवा आणि फोकस राहा तरच कामे पूर्ण होणार आणि ऑफिसचा ताण कमी होणार. संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग आहे. आरोग्याकडे लक्ष द्या आणि जीवनशैलीत थोडा बदल करा.

मूलांक 5 – विरोधक त्रास देण्याची शक्यता

मूलांक 5 साठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. तुमचे विरोधक वाढणार आहेत, ते तुमच्या कामात अडचण निर्माण करतील, त्यामुळे आज जी काही कामे कराल त्यात सावध राहा. तुमची निर्णय क्षमता आणि कामातील उत्साह वाढणार आहे.

मूलांक 6 – विरोधकांना पराभूत कराल

मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात काही बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या विरोधकांना पराभूत करण्यासाठी सक्षम होणार आहात. तुमच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. हवामानातील बदलामुळे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.

मूलांक 7 – मानसिक ताणतणावाचा सामना

मूलांक 7 साठी आजचा दिवस त्रासाच आहे. कोर्ट कचेरी सुरु असेल तर त्याचा मानिसक ताण येण्याची शक्यता आहे. काहीतरी कारणामुळे आज तणावाचा सामना करावा लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. घरी वातावरण ठिक असेल, जोडीदारासोबत भांडण करु नका, त्याला समजून घ्या.

मूलांक 8 – कायदेशीर समस्यांमुळे खर्च वाढणार

मूलांक 8 साठी दिवस थोडा खर्चीक आहे. कायदेशीर समस्यांमुळे खर्च वाढू शकतो. कार्यस्थळी सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही वादविवादापासून दूर राहा. घरी वातावरण ठिक असेल पण छोट्या मोठ्या तक्रारी डोके वर काढतील. रागावर नियंत्रण ठेवा आणि शांतपणे पुढचा विचार करुन निर्णय घ्या, घाईगडबड टाळा.

मूलांक 9 – प्रवासात तब्येत बिघडण्याची शक्यता

मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे. कामासंदर्भात प्रवासाची शक्यता आहे. या प्रवासात तब्येत बिघडू शकते तेव्हा काळजी घ्या. घरी वातावरण खेळीमेळीचे असेल. तुम्ही काळजीपूर्वक वागा. जंक फूड कमी खा. कोणतेही काम करताना सतर्क राहा.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.