Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mool Trikon Rajyog 2024 : मूळ त्रिकोण राजयोग! तुळसह ५ राशी होणार श्रीमंत, व्यवसायात लाभ

8

Mool Trikon Rajyog Zodiac : ज्योतिषशास्त्रानुसार २३ सप्टेंबरला बुध ग्रहाने स्व: राशीत अर्थात कन्या राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी शुक्र आपल्या मूळ राशीत उपस्थित आहे. शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे. अशावेळी बुध, शुक्र आणि शनि मूळ राशीत समोरासमोर आल्याने मूळ त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींला कसा फायदा होईल त्याबद्दल सविस्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Mool Trikon Rajyog 2024 : मूळ त्रिकोण राजयोग! तुळसह ५ राशी होणार श्रीमंत, व्यवसायात लाभ
Mool Trikon Rajyog Horoscope :
ज्योतिषशास्त्रानुसार २३ सप्टेंबरला बुध ग्रहाने स्व: राशीत अर्थात कन्या राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी शुक्र आपल्या मूळ राशीत उपस्थित आहे. शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे. अशावेळी बुध, शुक्र आणि शनि मूळ राशीत समोरासमोर आल्याने मूळ त्रिकोण राजयोग तयार झाला आहे.
मूळ त्रिकोण राजयोगामुळे तीन ग्रहांची दृष्टी कन्या आणि तुळसह ५ राशीवर स्थित आहे. त्यामुळे या काळात ५ राशींना जबरदस्त फायदा मिळेल. त्यांच्या संपत्ती वाढ होईल. करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. जाणून घेऊया कोणत्या राशींला कसा फायदा होईल त्याबद्दल सविस्तर

मेष राशीवर मूळ त्रिकोण राजयोगाचा प्रभाव

मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या काळात चांगली असेल. तुमची पैशांमुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. कामात मेहनत घेतल्याने आर्थिक लाभ मिळतील. नवीन व्यवसाय सुरु करण्यास उत्सुक असणाऱ्या लोकांना या काळात फायदा होईल. करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी भावंडांचा सल्ला घ्याल.

कन्या राशीवर मूळ त्रिकोण राजयोगाचा प्रभाव

कन्या राशीत बुधाचे संक्रमण आर्थिक स्थितीत बदल होताना दिसत आहे. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती काही काळापासून चांगली नव्हती त्यांना या मूळ त्रिकोण राजयोगाचा लाभ होईल. या काळात तुमच्यासाठी चांगली बातमी ऐकू येईल. परदेशातूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. पैसे किंवा व्यवसायाशी संबंधित चांगल्या बातम्या मिळतील. भविष्यात तुम्हाला फायदा होईल.

तुळ राशीवर मूळ त्रिकोण राजयोगाचा प्रभाव

तुळ राशीच्या लोकांना नवीन व्यावसायिक कल्पनांचा फायदा होईल. वित्त क्षेत्राशी निगडीत असणाऱ्यांना हा काळ चांगला राहिल. तुमच्या मनात व्यवसायाचे नवीन विचार येतील. कल्पनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात तुम्हाला अनेक नवीन करार मिळतील, ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरदार लोकांची प्रगती होईल. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.

कुंभ राशीवर मूळ त्रिकोण राजयोगाचा प्रभाव

कामात मेहनत घेतल्याने यश मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेला प्रोजेक्ट मार्गी लागेल. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील, ज्यातून तुम्हाला फायदा होईल. चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. व्यवसायात अनेक मोठे करार फायनल होतील.

मीन राशीवर मूळ त्रिकोण राजयोगाचा प्रभाव

वडिलोपार्जित संपत्ती मिळविण्यासाठी मीन राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. नोकरदार लोकांना बढती मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. वेळेचा तुम्हाला योग्यप्रकारे वापर करावा लागेल.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.