Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 26 सप्टेंबर 2024: गुरुपुष्यामृत तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

19

गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुनर्वसू रात्री ११-३२ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन सायं. ५-११ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी उत्तररात्री १-०९ पर्यंत

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति शक संवत १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी, गुरुवार, विक्रम संवत २०८१, रब्बी उल्लावल २२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २६ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत. नवमी तिथी दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ

पुनर्वसु नक्षत्र रात्री ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ, परिधी योग रात्री ११ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग प्रारंभ, गर करण दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र संध्याकाळी ५ वाजून १३ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२९
  • सूर्यास्त: सायं. ६-३०
  • चंद्रोदय: उत्तररात्री १-४५
  • चंद्रास्त: दुपारी २-३७


  • पूर्ण भरती: सकाळी ७-३२ पाण्याची उंची ३.४१ मीटर, सायं. ७-१७ पाण्याची उंची २.७२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी २-०५ पाण्याची उंची २.२९ मीटर, उत्तररात्री १-४७ पाण्याची उंची १.७२ मीटर
  • सण आणि व्रत: गुरुपुष्यामृत रात्री ११-३२ ते दुसऱ्या दिवशी सकाळी (शुक्रवारी) सकाळी ०६-३० पर्यंत, सूर्य हस्त नक्षत्रात वाहन मोर, दशमी श्राद्ध तिथी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांपासून ते ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपासून ते ३ वाजून १ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटांपासून ११ वाजेपर्यंत.

आजचा उपाय
विष्णु सहस्त्रनामाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.