Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 28 सप्टेंबर 2024: या राशींसाठी शुभलाभाचा ‘शनिवार’ ! व्यवसायात नवीन डिल फायनल होणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य

14

Finance Horoscope Today 28 September 2024 In Marathi : 28 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. वृषभ राशीच्या लोकांनी डिल फायनल करताना कागरपत्रे तपासून घ्यावीत. कर्क आणि मीन राशीच्या लोकांचे ऑफिसमध्ये कौतुक होणार आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला असून तुमच्या कामात तुम्ही अधिक फोकस करणार आहात. वृश्चिक राशीसाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या जातकांनी स्वाक्षरी करण्याआधी पेपर नीट वाचावेत. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया 28 सप्टेंबरचे आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 28 सप्टेंबर 2024: या राशींसाठी शुभलाभाचा ‘शनिवार’ ! व्यवसायात नवीन डिल फायनल होणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Aaj che Aarthik Rashi Bhavishya 28 September 2024 : 28 सप्टेंबर मेष, वृषभसह या राशींसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला आहे. कामे पटापट पूर्ण होणार असून तुम्हाला समाधान मिळेल. व्यवसायात वृद्धी आणि गुंतवणुकिसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होणार आहे. कन्यासह या राशीच्या जातकांनी आर्थिक व्यवहार करताना सावध रहावे. करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य : पगारवाढीची शक्यता

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. तुम्हाला जोडीदाराची चांगली साथ मिळणार असून तुमचे ऑफिसमध्ये जास्त वाढले तरी काळजी करु नका, घरी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. पगारवाढीची शक्यता आहे. घरातील लहान मुलांना वेळ द्यायला हवा. तुम्हाला जेव्हा कामातून मोकळा वेळ मिळेल तो वेळ तुम्ही कुटुंबासोबत व्यतीत करावा, त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : डिल फायनल करताना कागदपत्रे तपासा

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असून तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. दुपारनंतर तुम्ही विचार केलेली सगळी कामे पूर्ण होणा आहेत त्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल. खूप वेळेपासून थांबलेले तुमचे पेमेंट आता मिळणार आहे. व्यवसायात तुम्हाला नवे प्रोजेक्ट मिळणार आहे, पण ते स्विकारताना सगळी कागदपत्र नीट वाचून घ्या. कुटुंबासोबत फिरण्याचा योग आहे.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : गुंतवणुकिसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेणार

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश आहे. आर्थिक गुंतवणुकिसंदर्भात तुम्ही आज महत्त्वाचा निर्णय घेवू शकता. घरात एखाद्या मंगलकार्याबद्दल चर्चा होणार आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा तसेच शॉपिंगला जाण्यााच प्लॅन कराल. तुमचे मन खूप प्रसन्न राहणार असून प्रियजनांच्या भेटीमुळे तुम्हाला अपार आनंद होणार आहे.

कर्क आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये कौतुक होणार

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ असून यश मिळणार आहे. तुम्ही आज धार्मिक कार्य करणार असून दानधर्म देखील कराल. तुम्ही ऑफिसमध्ये बुद्धीचातुर्याने समस्येवर समाधान शोधणार आहात त्यामुळे तुमचे कौतुक होईल. व्यवसायात एखादी नवीन डील तुमच्या अटींवर मंजूर होणार आहे. व्यवसाय आणि करिअरमध्ये यश असून कुटुंबात सुखसमृद्धीचे वातावरण आहे.

सिंह आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील

सिंह राशीच्या जातकांसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे. ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला मदत करतील, तुम्ही त्यांना टीम वर्कचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजावून देवू शकता. खूप दिवसांपासून सुरु असणारी कोर्ट कचेरी यावर निकाल येण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना सफल होणार आहेत. तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे प्लॅनींग कराल. घरात आनंदी आणि समाधानी वातावरण असेल.

कन्या आर्थिक राशिभविष्य : आर्थिक व्यवहार करताना सावधान !

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही क्रिएटीव्ह कामात रुची घेणार आहात. विरोधक थोडा त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही कामात फोकस करा. तुमचे मन कामात लागत नसेल किंवा तणाव वाढला असेल तर तुमची आवड किंवा छंद यात मन गुंतवा. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. आज मित्र परिवारांपैकी कोणी पैसे मागितले, तर त्याला तुमची परिस्थिती स्पष्ट करुन सांगा आणि शक्यतो उधारी देवू नका.

तुळ आर्थिक राशिभविष्य : कामात यश, व्यवसायात नफा

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला असून तुमच्या कामात तुम्ही अधिक फोकस करणार आहात. बुद्धी आणि मन स्थिर असल्यामुळे आज जे काही काम कराल त्यात यश असेल. अकाऊंट संदर्भात काही फाईल्स असतील तर तयार ठेवा कारण त्याची गरज लागू शकते. तुमच्या चांगल्या वागणुकिमुळे आज सगळीकडे तुमचे कौतुक होणार आहे. आज कामात वृद्धी होणार असून व्यवसायात नफा आहे.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : खिशावर ताण येण्याची शक्यता

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे तुमच्या योजना किंवा कल्पना यांची अंमलबजावणी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. राजकारणात तुमची रूची वाढणार आहे. संध्याकाळी कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमच्या खिशावर ताण येवू शकतो, पण आज खर्चाकडे बघू नका, नातेसंबंध अधिक मजबूत असणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ असून करिअर आणि व्यवसायात यश आहे. आज आर्थिक स्थिती उत्तम असेल.

धनू आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये काम वाढणार, धावफळ फार

धनु राशीच्या लोकांनी आज दिवस चांगला असून धनलाभाचा योग आहे तसेच बँक बॅलेन्स वाढणार आहे. आज ऑफिसमध्ये काम वाढणार आहे. खूप धावपळ होणार पण त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुमच्यातील कलाकौशल्य किंवा प्रतिभा सिद्ध करण्यासाठी कामाचा पसारा किंवा गजबजाट करणे गरजेचे नाही. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला असून तुमच्या प्रेमात बहार येणार आहे.

मकर आर्थिक राशिभविष्य : स्वाक्षरी करण्याआधी पेपर नीट वाचा

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. कामे पूर्ण करण्यातच तुमचा दिवस जाणार आहे. पण कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला समाधान मिळणार आहे. समाधान आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही पेपरवर स्वाक्षरी करताना ती कागदपत्रे नीट वाचा. व्यवसायात नवे काम आहे पण नियोजन योग्य पद्धतीत करा तरच यश मिळेल.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : प्रत्येक कामात यश

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. सकाळपासूनच तुम्हाल आनंद देणाऱ्या बातम्या मिळणार आहेत. नवीन लोकांच्या ओळखी करून घ्या किंवा नव्या ओळखी झाल्या असतील तर त्यात संबंध दृढ करा. व्यवसायात नवीन डिल फायनल होणार आहे. तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. धनसंपत्ती वाढणार आहे.

मीन आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये कौतुक होणार

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असून तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये तुमची जागा फिक्स करायची असेल तर कामात अधिकाधीक फोकस करा. बुद्धी चातुर्याने तुम्ही प्रत्येक समस्येवर तोडगा काढाल त्यामुळे सगळेजण तुमचे कौतुक करतील. तब्येतीची काळजी घ्या आणि जास्त ताण घेवू नका. आर्थिक व्यवहारात तुमच्या योजना सफल होणार आहेत, तसेच आर्थिक स्थिती मजबूत असेल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.