Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 29 सप्टेंबर 2024: मिथुन राशीचा खर्च वाढतोय, लक्ष द्या ! तुळ राशीने निर्णय घेताना, घाई करु नये ! पाहा, तुमचे राशिभविष्य

12

Finance Horoscope Today 29 September 2024 In Marathi : 29 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा असून तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल. वृषभ राशीची रखडलेली कामे पूर्ण होणार. कर्क राशीच्या जातकांसाठी दिवस शुभलाभाचा असून तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळणार आहे.तुळ राशीने निर्णय घेताना घाई करु नये. धनू राशीने आर्थिक व्यवहार करताना सावध रहावे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धनलाभाचा आहे. तर मीन राशीच्या जातकांना वरिष्ठांकडून मानसन्मान मिळेल. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया 29 सप्टेंबरचे आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 29 सप्टेंबर 2024: मिथुन राशीचा खर्च वाढतोय, लक्ष द्या ! तुळ राशीने निर्णय घेताना, घाई करु नये ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Aaj che Aarthik Rashi Bhavishya 29 September 2024 : 29 सप्टेंबर रविवार हा दिवस मेष, वृषभ सह या राशींसाठी आनंदाचा आहे. तुमची कामे मार्गी लागणार असून तुमचे कौतुक होणार आहे. घरात वातावरण आनंदी आणि प्रत्येक कामात जोडीदाराची साथ मिळेल. विरोधक शांत होतील. धनुसह या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहा आणि ताणतणाव जास्त झाल्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य : शुभलाभाचा योग, प्रत्येक कामात सफलता

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा असून तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल. प्रवासाचा योग आहे आणि त्याचा लाभ घ्यावा. वैवाहिक जीवनात आनंद असून सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक त्रासातून थोडा आराम मिळणार आहे. व्यवसायात लाभाचे योग आहेत.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे पूर्ण होणार

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा असून तुमची प्रत्येक योजना सफल होणार आहे. करिअरच्या संदर्भात तुम्हाला जे अपेक्षीत होते ते तुम्हाला मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. तसेच बँक बॅलन्स वाढणार आहे. तुम्ही रात्री कुटुंबासोबत एखाद्या मनोरंजानाच्या कार्यक्रमाला जाणार आहात त्यामुळे तुमचा ताणतणाव हलका होईल.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : खर्च वाढतोय, तो कमी करणे तुमच्या हिताचे

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. व्यर्थ गोष्टी करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. खर्च खूप जास्त होतोय त्यासंदर्भात सखोल विचार करा. मालमत्ता किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करताना ती नीट पडताळून पाहा. व्यवसायात चांगली बातमी मिळणार आहे. त्यामुळे तुमचा दिवस खूप आनंदात जाणार आहे.

कर्क आर्थिक राशिभविष्य : विरोधक शांत असतील

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस शुभलाभाचा असून तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळणार आहे. तुमचा उत्साह आणि कामातील धडाडी पाहून आज विरोधक काहीच करु शकणार नाहीत. दुसऱ्यांची मदत करून तुम्हाल खूप समाधाना मिळेल. संध्याकाळी एखाद्या विद्वान व्यक्तीमत्वाची भेट होणार आहे. तुमच्या योजना सफल होणार असून व्यवसायात तुम्हाला यश आहे. घरात वातावरण आनंदी आणि समाधानी असेल, मुलांकडू चांगली बातमी समजेल.

सिंह आर्थिक राशिभविष्य : करिअर आणि व्यवसायात सुखसमृद्धी

सिंह राशीच्या जातकांसाठी दिवस चांगला आहे. आज घरगुती वस्तू खरेदी करणार आहात त्यामुळे घराता आनंदी वातावरण असेल. करिअर आणि व्यवसायात वृद्धी असून सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. जुने मित्र भेटल्यामुळे खूप समाधान मिळेल तसेच घरात उत्सवाचे वातावरण असेल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होणार आहे. कामे वाढणार आहेत तेव्हा योग्य नियोजन करावे.

कन्या आर्थिक राशिभविष्य : शुभलाभाचा दिवस

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे पण घरात कोणाची तरी तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही काळजीत असाल. कामाचा भार असेल, तसेच कोणाकडून काम करून घ्यायचे असेल त्यांच्याशी प्रेमाने बोला. घरात आनंदी वातावरण असेल. घरात जर काही समस्या सुरु असेल तर त्यावर तोडगा निघेल. व्यवसायात वाढ करण्याचा विचार करत असाल तर लाभ होईल.

तुळ आर्थिक राशिभविष्य : निर्णय घेताना घाई करु नका

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, अती घाई संकटात नेई हे लक्षात ठेवा. व्यवसायाच जर तुम्ही व्यक्तीगत गोष्टी आणल्या तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीसोबत शाब्दिक चकमक उडाली असेल तर संवादाद्वारे ते सुधारण्याचा प्रयत्न करा. तुमची योजना सफल होणार असून बँक बॅलन्स वाढणार आहे.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : तुमच्या कामाचे सगळीकडे कौतुक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ आहे. तुमचे सगळीकडे कौतुक होणार आहे त्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. कोणत्या राजकीय किंवा सरकारी अधिकारी यांच्याशी दोस्ती असेल तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. विद्यार्थ्यांसाठी खास सल्ला आहे तुम्ही अभ्यासात फोकस करा. तुमचा आजचा वेळ धार्मिक कार्यात व्यतीत होणार आहे.

धनू आर्थिक राशिभविष्य : आर्थिक व्यवहार करताना सावध राहा

धनु राशीच्या लोकांनी आज दिवस शुभलाभ आणि सुखसमृद्धी याने भरलेला आहे. विरोधक आज फार काही करू शकणार नाही. तुमच्या कामातील उत्साह द्विगुणीत होईल. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवासात सामानाकडे लक्ष द्या. प्रेमसंबंध आज अधिक दृढ होणार आहेत. व्यवसायात काम वाढते आहे नियोजनाकडे लक्ष द्या.

मकर आर्थिक राशिभविष्य : जुन्या मित्राकडून धनलाभाचा योग

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. तुम्हाला आज पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राकडून अचानक धनलाभ होणार आहे. अचानक प्रवासाच योग जुळून येईल त्याचा लाभ घ्या. व्यवसायात नफा आहे. तुम्ही कामात अधिक फोकस कायम ठेवा. घरातील वातावरण सुख समाधानी असेल.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : प्रवासाचा बेत रद्द होईल, धनलाभाची शक्यता

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धनलाभाचा आहे. मुलांकडून तुम्हाला आनंदची बातमी मिळेल. तुमचा मृदू स्वभाव आणि सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती यामुळे तुम्हाला चांगला लाभ होणार आहे. सहकारी कामात मदत करतील. प्रवासाचा योग आहे पण काही कारणामुळे तो रद्द होईल. तुमचे अपूर्ण काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होणार आहे. बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे.

मीन आर्थिक राशिभविष्य : वरिष्ठांकडून मानसन्मान मिळणार

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ लाभाचा आहे पण तुमची खूप धावपळ होणार आहे. आज तुम्ही एखाद्या मंगलकार्यात व्यस्त राहणार आहात. वडिल किंवा वरिष्ठांकडून तुम्हाला मानसन्मान मिळणार आहे. प्रत्येक कामात जोडीदाराची साथ असून कामे मार्गी लागतील. आज ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा काळजी घ्या. तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.