Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 30 सप्टेंबर 2024: वृश्चिक राशीला हितचिंतकच धोका देणार, सावध राहा ! धनू राशीसाठी कामात फोकस महत्त्वाचा ! पाहा, तुमचे राशिभविष्य

15

Finance Horoscope Today 30 September 2024 In Marathi : 30 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने चांगला आहे. तुम्ही जे काही काम करणार आहात ते पूर्ण होईल. वृषभ राशीचा व्यवसायात विस्तार होणार आहे. कर्क राशीच्या लोकांनी काम करताना सावध राहा. कन्या राशीच्या लोकांनी कोणाला मदत करावी ते नीट ओळखा. वृश्चिक राशीच्या लोकांना हितचिंतकच धोका देणार, सावध राहा. कुंभ राशीला कार्यक्षेत्रात लाभ, कामे मार्गी लागतील तर मीन राशीची दिवस धावपळ असेल. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया 30 सप्टेंबरचे आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 30 सप्टेंबर 2024: वृश्चिक राशीला हितचिंतकच धोका देणार, सावध राहा ! धनू राशीसाठी कामात फोकस महत्त्वाचा ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Aaj che Aarthik Rashi Bhavishya 30 September 2024 : 30 सप्टेंबर सोमवार, हा दिवस वृषभ, मिथुन, सिंह यांच्यासाठी ठिक आहे. कामे मार्गी लागणार आहेत तसेच प्रत्येक कामात नशिबाची साथ आहे. कर्कसह या राशीच्या लोकांनी काम करताना सावध रहावे. वृश्चिक सह या राशीच्या लोकांना धोका होण्याची किंवा फसवणूक होण्याची शक्यता आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये संवाद साधताना सावध राहा

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने चांगला आहे. तुम्ही जे काही काम करणार आहात ते पूर्ण होईल. दुपारपर्यंत तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल त्यानंतर कार्यक्षेत्रात थोडा तणाव वाढण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये आज संवाद साधताना सावध राहा, तुमच्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. सगळ्यांना मदत करा कारण तुम्ही मदत केली तर भविष्यात तुम्हाला मदत मिळेल. व्यवसायात काम वाढणार आहे पण हवा तसा नफा मिळणार नाही.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : व्यवसायाचा विस्तार होणार

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत खूप चांगला आहे. तुमच्या व्यवसायाचा आज विस्तार होणार आहे. भागिदारीत बिझनेस करावा असे तुम्हाला वाटेल पण सध्या तरी तुम्ही हा विचार बाजूला ठेवावा. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करायची असेल तर मेहनत करायलाच हवी. कामात फोकस महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये कामाचा अतिरिक्त भार येणार आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर आज तुम्हाला नवीन जबाबदारी मिळणार आहे.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : कर्तृत्वावर विश्वास ठेवा

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याचा गाजावाजा फार करुन उपयोग नाही. तुमच्या मना विरुद्ध तुम्हाला काही कामे करावी लागतील. अचानक एखादी ओळखीची व्यक्ती भेटेल आणि तुमच्याकडे मदतीची याचना करेल, तुम्ही मदत करा. आज प्रत्येक कामात अडचणी येणार आहेत पण तुम्ही स्वतःला कमकूवत समजू नका.

कर्क आर्थिक राशिभविष्य : काम करताना सावध राहा

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक आहे पण तुम्हाला खूप सावध रहावे लागेल. तब्येतीची काळजी घ्या अचानक एखादा आजार डोके वर काढेल ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नव्हती. तपासणी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या मग तुमच्या कामाकडे वळा कारण आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे. तुमच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे तसेच आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे.

सिंह आर्थिक राशिभविष्य : व्यवसायातील स्थिती सुधारणार

सिंह राशीच्या जातकांसाठी दिवस शुभलाभाने भरलेला आहे. व्यवसायात स्थिती आता सुधारणार आहे. नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. तुमचा कामातील फोकस अधित वाढेलेला आहे त्याचा उत्तम परिणाम तुम्हाला मिळेल. वरिष्ठांचा वरदहस्त तुमच्यासोबत आहे त्यामुळे ऑफिसचे काम व्यवस्थित असेल आणि कामात अडथळे येणार नाहीत. तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत. तुम्हाला इतरांकडून मदत मिळेल त्यामुळे तुमचे कार्य पार पडले. तुम्ही वेळेनुसार कार्य करण्याचा प्रयत्न करा लाभ मिळेल.

कन्या आर्थिक राशिभविष्य : कोणाला मदत करावी ते नीट ओळखा

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे तुमचा मानसन्मान होणार आहे. तुम्ही सगळ्यांना मदत करता पण त्याचा गैरफायदा घेणारे अनेकजण तुमच्या अवतीभोवती आहेत, त्यांना ओळखा. अशी माणसे तुमच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवत आहेत त्यामुळे अशा लोकांकडून सावध राहा. मदत नक्की कोणाला करावी ते ठरवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे प्रोजेक्ट येणार आहेत. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करा. आज तुमच्यासोबत काही धोका होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा.

तुळ आर्थिक राशिभविष्य : करिअरच्या दृष्टीने दिवस उत्तम

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप चांगला आहे. तुमची राहलेली सगळी कामे आज पूर्ण होणार आहेत. व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर त्याची सुरुवात करा. ऑफिस किंवा व्यवसायाच्या कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल. प्रवासात लाभ होईल. नोकरी किंवा व्यवसायात जबाबदारी वाढणार आहे, त्याकडे नवी संधी म्हणून पाहा त्याचा लाभ होईल. खर्चात वाढ होईल.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : हितचिंतक धोका देणार, सावध राहा

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक आहे. करिअरच्या बाबतीत तुम्हाला लाभ होणार आहे. तुम्ही ज्या लोकांना सद्गुणी किंवा तुमचे हितचिंतक मानत आहात त्यापैकी कोणीतरी तुम्हाला धोका देणार आहे. संध्याकाळी चांगली बातमी मिळेल त्यामुळे दिवसभरातील तणाव कमी होईल. लक्षात ठेवा जे काम घ्याल ते वेळेत पूर्ण करा, अन्यथा अडचण वाढेल. तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात काम वाढते आहे त्यासाठी नियोजन करा.

धनू आर्थिक राशिभविष्य : मनातील भीती दूर करा, कामात फोकस करा

धनु राशीच्या लोकांनी आज दिवस शुभलाभाचा आहे. खूप दिवसांपासून तुमची काही कामे होत नाहीत त्यामुळे तुम्ही चिंतीत होतात पण आज ती सगळी कामे पटापट मार्गी लागणार आहेत. दुपारी थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कशीची तरी भीती वाटते आहे खरंतर ही भीती व्यर्थ आहे ती मनातून काढून टाका. कामात फोकस करा. व्यवसायात आज नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वेळ जाणार आहे. वेळचे योग्य नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कामे पटापट मार्गी लागतील.

मकर आर्थिक राशिभविष्य : अपूर्ण कामे पूर्ण होणार

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा असून तुमच्या ज्ञानाता भर पडणार आहे. तुमची राहीलेली कामे पूर्ण होणार आहेत. आज प्रतिष्ठीत लोकांच्या भेटी होणार आहेत त्याचा लाभ भविष्यात होईल. प्रियजनांकडून चांगली बातमी मिळेल. तुमची नोकरी किंवा व्यवसायात जी काही परिस्थिती आहे, त्यावर परिश्रमाने विजय मिळवा. ताणतणाव वाढणार आहे तेव्हा जीवनशैलीत योग्य तो बदल करा. आज तुम्ही असे काही कार्य कराल ज्यामुळे तुमचे कौतुक होईल.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात लाभ, कामे मार्गी लागतील

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून कार्यक्षेत्रात लाभ होणार आहे. तुम्ही हाती घेतलेले प्रत्येक काम पटापट मार्गी लावण्याच्या प्रयत्न करत आहात, हे अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला आज नवीन संधी किंवा पद मिळत असेल तर त्वरीत त्याचा स्विकार करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्या प्रगतीचे द्वार या संधीतून खुले होणार आहेत. व्यवसायात आज नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वेळ जाणार आहे. वेळचे योग्य नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या

मीन आर्थिक राशिभविष्य : दिवस धावपळीचा, कामांचा डोंगर

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा अ्सणार आहे. दुपारपर्यंत तुमच्याकडे खूप काम असणार आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल. कामे पूर्ण करण्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे कोणते त्यापासून सुरु करा. विरोधक त्रास देतील पण तुम्ही दुर्लक्ष करा. वादविवादात पडू नका, शांत राहा. मित्रांची मदत मिळेल त्यामुळे ताण हलका होईल. आज खर्च जास्त होणार आहे. तुम्ही स्वतःवर जास्तच खर्च करणार आहात. दिखाऊपणापासून दूर राहा.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.