Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मासिक अंक ज्योतिष ऑक्टोबर 2024: या जन्मतारखेच्या लोकांना धनलाभासह ऑफिसच्या कामात प्रगती! मोठे बदल टेन्शन वाढविणार ! वाचा अंकशास्त्रानुसार ऑक्टोबरचे राशीभविष्य
Numerology Horoscope, October 2024: मूलांक 1 साठी ऑक्टोबर महिना करिअरच्या बाबतीत अतिशय उत्तम आहे. तुमचे दोन प्रोजेक्ट यशस्वी होणार आहेत. अडथळे येतील. मूलांक 2 आणि मूलांक 3 यांची कार्यक्षेत्रात प्रगती असून धनलाभाचे योग आहेत. मूलांक 4 च्या लोकांनी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करावे. मूलांक ६ साठी धनलाभाचा योग असून तुमचा प्रवास यशस्वी होईल. मूलांक 8 च्या लोकांनी प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा कारण अडचणींचा सामना करावा लागेल. मूलांक 9 साठी ऑक्टोबर महिन्यात लवलाइफमध्ये सुखद अनुभव येतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि काही सकारात्मक बातमी मिळेल. चला तर जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते मूलांक 9 असलेल्या लोकांना ऑक्टोबर महिना कसा जाईल ते जाणून घेऊ.
मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): ऑफिसमध्ये कौतुक, धनलाभाची शक्यता
ऑक्टोबर महिना करिअरच्या बाबतीत अतिशय उत्तम आहे. तुमचे दोन प्रोजेक्ट यशस्वी होणार आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होईल आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक स्थिती उत्तम असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील पण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दुराव्याची शक्यता आहे. तसेच प्रकृतीकडे विशेष लक्ष देणे योग्य राहील. तुम्हाला जीवनात जे बदल अपेक्षित आहेत, त्यांना प्राप्त करण्यात काही अडथळे येतील.
मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): कार्यक्षेत्रात प्रगती, धनलाभाचे योग
ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रगती दिसेल. करिअरच्या बाबतीत तुम्ही खूप रिलॅक्स राहणार आहात. धनलाभाचे शुभ योग असून धनसंपत्तीच्या बाबतीत हा महिना उत्तम आहे. अचानक धन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील तुमच्या कौशल्याने तुम्ही अधिक नफा कमावणार आहात. प्रेमसंबंधात अस्वस्थता वाढेल. प्रेमजीवनात काही कारणामुळे त्रासदायक वातावरण राहील. ऑक्टोबरच्या अखेरीस परिस्थितीत बदलताना दिसेल आणि मन सुखी राहील.
मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): कार्यक्षेत्रासह लवलाइफमध्ये प्रगती
ऑक्टोबर महिन्यात आर्थिक बाबतीत शुभयोग आहेत. ऑफिसमध्ये वेळ उत्तम आहे तुमच्या बोलण्याने तुम्हाला सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद लवलाइफमध्ये फायद्याचे ठरतील. या महिन्यात प्रेमजीवनात चांगले वातावरण राहील आणि तुम्ही जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे निश्चित कराल. कार्यक्षेत्रात काम वाढेल. ऑक्टोबरच्या शेवटी सुरु झालेले प्रोजेक्ट तुम्हाला उत्तम यश देणार आहे.
मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करा
ऑक्टोबर महिन्यात कार्यक्षेत्रता प्रगती आहे. तसेच तुम्हाला अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे काम उत्तरोत्तर यशस्वी होत जाणार आहे. भागीदारातील प्रोजेक्ट तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येतील. प्रेमसंबंधात आपापसांतील प्रेम दृढ होईल. प्रेमजीवनात सुखद अनुभव राहतील. प्रेमजीवनात मन सुखी राहील. आर्थिक विषयांत कालावधी शुभ राहील. धनलाभाचे शुभ संयोग बनत आहेत. कोर्टकचेरीच्या विषयात विजय मिळेल. या महिन्याच्या अखेरीस एका नवीन गोष्टीची सुरुवात होणार असून मन प्रसन्न राहील.
मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): प्रोजक्ट यशस्वी, उत्पन्नाच्या अनेक संधी
ऑक्टोबर महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रोजक्ट यशस्वी होणार आहेत. तसेच तुमच्याकडे नवीन प्रोजेक्ट येण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही अंतःप्रेरणेने निर्णय घेतले तर ते लाभदायक ठरेल. प्रेसंबंधात आपापसांतील प्रेम वाढेल आणि महिना रोमँटिक राहील. या महिन्यात उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. महिन्याच्या अखेरीस काही वाईट बातमी येण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहा
मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): धनलाभाचा योग, प्रवास यशस्वी
ऑक्टोबर महिन्यात आर्थिक बाबतीत स्थिती अनुकूल आहे. तुमचे प्रोजेक्ट यशस्वी होणार आहेत. धनलाभाचे चांगले योग या महिन्यात बनत आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमुळे फार व्यस्त राहाल. प्रेमसंबंधात चढउतार राहतील आणि अखेरीस सुखद अनुभव राहतील. कार्यक्षेत्रात अहंकरामुळे निर्माण होऊ शकणारा संघर्ष टाळा. महिन्याच्या अखेरीस तुम्ही तुमच्या जीवनातील नव्या मार्गाच्या दिशेने जाण्याचा विचार कराल. महिन्याच्या अखेरीस प्रवास करण्याचे निश्चित कराल. तुमची अशा व्यक्तीसोबत दोस्ती होणार आहे जी भविष्यात तुम्हाला शुभलाभ देवू शकते.
मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): कार्यक्षेत्रात उत्तम यश
ऑक्टोबर महिन्यात कार्यक्षेत्रात उत्तम यश असून प्रोजेक्टमधील सफलता तुमचे मनबोल वाढवणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल होत जाईल आणि पैशाची आवक होण्याचे शुभ योग होतील. तुम्ही तुमच्या चांगल्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून काही गुंतवणूक करू शकता. प्रेमसंबंध चांगले होतील, पण तरीही काही कारणांमुळे किंवा एखाद्या व्यक्तीमुळे मन अशांत राहील.
मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा, अडचणी येणार
ऑक्टोबर महिन्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना संयम ठेवा. कामात अडचणी आहेत पण तुम्ही फोकस राहून काम केलं तर निर्णय फलदायी असतील. लवलाइफमध्ये थोडा गोंधळ असेल. तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काही ठोस निर्णयही घ्याल. आर्थिक विषयात एखाद्या नव्या गुंतवणुकीमुळे मन सुरुवातीला साशंक राहील, पण अखेरीस तुम्हाला यश मिळेल. महिन्याच्या शेवटी विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, तेव्हा तयार राहा.
मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): प्रोजेक्टसाठी सकरात्मक बातमी मिळेल
ऑक्टोबर महिन्यात लवलाइफमध्ये सुखद अनुभव येतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि काही सकारात्मक बातमी तुमच्या प्रोजेक्टसाठी मिळेल. आर्थिक विषयांत निर्णय घेताना संयम ठेवणे तुमच्या हिताचे राहील आणि पैशाची आवक होईल. या महिन्यात गुंतवणुकीतून फायदे होतील. प्रेमसंबंधात या महिन्यात शुभ परिणाम समोर येतील पण तरीही मन अशांत राहील. तब्येतीच्या बाबतीत ज्या काही तक्रारी असतील त्या दूर होतील.