Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, ५ ऑक्टोबर २०२४ : धनुसह २ राशींच्या खर्चात वाढ! व्यवसायात नफा, वाचा शनिवारचे राशीभविष्य

9

Rashi Bhavishya 5 october 2024 Today Horoscope in Marathi : आज ५ ऑक्टोबर शनिवार असून नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. चंद्र शुक्राच्या राशीत तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनफा योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग होईल. आज ५ राशींना लाभ होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, ५ ऑक्टोबर २०२४ : धनुसह २ राशींच्या खर्चात वाढ! व्यवसायात नफा, वाचा शनिवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 5 october 2024 :
आज ५ ऑक्टोबर शनिवार असून नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. चंद्र शुक्राच्या राशीत तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनफा योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग होईल. आज ५ राशींना लाभ होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. काही समस्यांना सामोरे जावे लागेल. पैसे खर्च होतील. लाभाच्या नवीन संधी मिळतील. मित्रांसोबत फिरायला जाल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराला वेळ देता येणार नाही, त्यामुळे तो रागवेल. लग्नाच्या प्रस्तावाला घरच्यांकडून मान्यता मिळेल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – पैसे खर्च होतील

आज तुमचा दिवस धार्मिक कार्यात खर्च होईल. तुमच्या मनाला शांती मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने पुढे याल. कामाच्या ठिकाणी बदल होतील. ज्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. काही समस्यांना सामोरे जावे लागेल. पैसे खर्च होतील
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने आहे. भगवान विष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा

वृषभ – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. लाभाच्या नवीन संधी मिळतील. मित्रांसोबत फिरायला जाल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा

मिथुन – जोडीदार रागवेल.

आज तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळेल. संपत्ती मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायाबाबत थोडे चिंतेत असाल. परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराला वेळ देता येणार नाही, त्यामुळे तो रागवेल. लग्नाच्या प्रस्तावाला घरच्यांकडून मान्यता मिळेल.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा

कर्क – व्यवसायात लाभ

आज तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ होतील. जोडीदारासोबत खरेदीला जाल. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. वैचारिक मतभेद होतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला मिळेल. विवाहासाठी उत्कृष्ट संधी मिळतील. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील.
आज भाग्य ९६ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा

सिंह – यश मिळेल

आज राजकारणातील लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. मुलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. जोडीदार आनंदी असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या. पोटाशी संबंधित विकार उद्भवतील. रखडलेली कामे पूर्ण होतील
आज भाग्य ८७ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.

कन्या – प्रमोशन होईल

आजचा दिवस आदरातिथ्य करण्यात जाईल. चांगले काम करण्यासाठी पैसे खर्च कराल. ज्यामुळे आनंदी असाल. विरोधक नुकसान करतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. अधिकाऱ्यांशी चांगले वागाल. पार्टनशीपसाठी आजचा दिवस चांगला राहिल.
आज भाग्य ६० टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा

तुळ – जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल

आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्यासाठी धावपळ करावी लागेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागेल. त्यातून नफा मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होईल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचे पठण करा

वृश्चिक – मन प्रसन्न राहिल

आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुम्हाला संपत्ती, मान- सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. रखडलेली कामे आज पूर्ण होतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. तुम्हाला यश मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याची योजना कराल. कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे नामस्मरण करा

धनु – थकवा जाणवेल

आज दैनंदिन गरजांवर पैसे खर्च होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. आज तुम्ही कामात व्यस्त असाल. त्यामुळे थकवा आणि तणाव जाणवेल. मालमत्तेशी संबंधित कोर्टातील वादात यश मिळेल. व्यवसायातील सौदा आज पूर्ण होईल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमानाला शेंदूर अर्पण करा

मकर- वाहन जपून चालवा.

आजचा दिवस व्यावसायिक क्षेत्रासाठी अनुकूल असेल. व्यवस्था बदलण्याचा विचार करत असाल तर फायदा होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखावा लागेल. भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाहन जपून चालवा.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. माशांना पीठ खाऊ घाला.

कुंभ – तणाव येईल

आज तुम्ही मालमत्ता खरेदी- विक्री करण्यापूर्वी तपासून घ्या. भविष्यात अडचणी येतील. जोडीदाराच्या शारीरिक त्रासामुळे आज जास्त धावपळ करावी लागेल. तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. तणावावर मात कराल. पैसे उधार देताना विचार कराल
आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा

मीन- व्यवसायात प्रगती

आज जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. व्यवसायात प्रगती होईल. मानसिक आणि बौद्धिक ओझ्यातून आराम मिळेल. तुमचा ताण कमी होईल. काही महत्त्वाची माहिती मिळेल. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आई-वडिलांची सेवा करण्यात वेळ घालवाल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.