Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, ६ ऑक्टोबर २०२४ : मिथुनसह २ राशींना मोठे नुकसान! आर्थिक चणचण कायम, वाचा रविवारचे राशीभविष्य

6

Rashi Bhavishya 6 october 2024 Today Horoscope in Marathi : आज ६ ऑक्टोबर रविवार असून चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी प्रीति योग, रवि योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार झाला आहे. कर्क, सिंह, तुळसह काही राशींना फायदा होईल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, ६ ऑक्टोबर २०२४ : मिथुनसह २ राशींना मोठे नुकसान! आर्थिक चणचण कायम, वाचा रविवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 6 october 2024 :
आज ६ ऑक्टोबर रविवार असून चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी प्रीति योग, रवि योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार झाला आहे. कर्क, सिंह, तुळसह काही राशींना फायदा होईल. कामाच्या व्यवसायात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील वाद कमी होतील. कौटुंबिक समस्या त्रास देतील. भेटवस्तू खरेदी कराल. अचानक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. शुभ कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. व्यवसायाी गती मंदावेल, आर्थिक स्थिती कमकुवत राहील. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – आर्थिक समस्या येतील

आज तुम्ही अस्वस्थ व्हाल. जुन्या मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. कामाच्या व्यवसायात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील वाद कमी होतील. कौटुंबिक समस्या त्रास देतील. भेटवस्तू खरेदी कराल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची पूजा करा

वृषभ – पैसे कमवाल

आजचा दिवस आळशीपणाने भरलेला असेल. सांधेदुखीच्या समस्या त्रास देतील. तुम्हाला अस्वस्थ वाटेल. व्यवसायात चांगले पैसे कमवाल. अचानक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. शुभ कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. व्यवसायाी गती मंदावेल, आर्थिक स्थिती कमकुवत राहील.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने राहिल. सूर्य देवाला जल अर्पण करा

मिथुन – नुकसान होण्याची शक्यता

आज व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक खर्चावर नियंत्रण ठेवा. आज पैशांचे व्यवहार विचारपूर्वक करा, भविष्यात नुकसान सहन करावे लागेल. चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. मित्रांसोबत पार्टीचे आयोजन कराल. तुमच्या अडचणी वाढतील.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरींबाना वस्त्र दान करा.

कर्क- आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणेपिणे टाळा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मुलांचा आत्मविश्वास वाढवाल. सामाजिक क्षेत्रात तुमची कीर्ती वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा

सिंह – कामात यश मिळेल

आज तुम्ही कामात यशस्वी व्हाल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पालकांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. कुटुंबात तणाव निर्माण होईल. प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. भावडांसोबतचे नाते सुधरवाल. कोणतेही काम पुढे ढकलू नका.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न दान करा.

कन्या – मतभेद होतील

आज तुम्हाला पैशांच्या मागे धावण्याच्या वृत्तीला आळा घालावा लागेल. व्यावसायिक कामात कुणालाही हस्तक्षेप करु देऊ नका. कुटुंबाशी भांडण होऊ शकते. बोलण्यात गोडवा ठेवा, मतभेद होऊ शकतात. तुम्हाला सासरच्या लोकांकडून आर्थिक फायदा होईल. तुमचे नुकसान होईल.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्रीमंत्राचे पठण करा

तुळ – जोडीदारासोबत वाद होतील

आज सरकारी कामात यश मिळेल. त्यामुळे प्रयत्नक करत राहा. वैवाहिक जीवनातील लहानसहान गोष्टी मनावर घेऊ नका. जीवनसाथीसोबत वाद होतील. तुमची बरचशी कामे विश्लेषणाने पूर्ण होतील. कामात अधिकारी तुमची साथ देतील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घ्या.

वृश्चिक- प्रयत्न यशस्वी होतील

व्यवसायात पैशासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. पार्टनरशीपमध्ये केलेल्या व्यवसायात नफा होईल. भविष्यात आर्थिक स्थितीबद्दल चिंता कमी राहिल. उत्पन्न आणि खर्चाचे संतुलन राखावे. व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबासाठी वेळ काढाल.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.

धनु – योजना यशस्वी होतील

आज तुमच्या चांगल्या योजना यशस्वी होतील. अडथळ्यांमुळे निराशा व्हाल. काळजी करु नका. वडिलांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुमच्या योजनांना गती देतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात पार्टनशीपमध्ये मतभेद होतील.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणेश स्तोत्राचे पठण करा

मकर – वाद टाळा

आजचा दिवस लाभाच्या चांगल्या संधी शोधाल. मुलांना यश मिळेल. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. घरात लग्नाचा प्रस्ताव मंजूर होईल. ज्यामुळे कुटुंब आनंदी असेल. शुभ कार्यक्रमावर चर्चा होईल. वाद टाळायला हवे.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.

कुंभ – पदोन्नती होईल

आज तुमच्या व्यवसायाच्या योजनांमध्ये अचानक बदल होतील. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. तुम्हाला आर्थिक लाभ होतील. सासरच्या लोकांसोबत वाद होतील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला असेल. पदोन्नती मिळेल. कामाबाबत ठोस निर्णय घेता येणार नाही.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणाचा पाठ करा

मीन – मान मिळेल.

आरोग्य उत्तम असल्यामुळे आज मेहनतीने काम कराल. कामात अडथळे येतील. तुमची मते इतरांकडे मांडू नका. तुमचे मनोबल वाढलेले असेल. सामाजिक कार्यात यश मिळाल्याने आनंदी असाल. राजकीय क्षेत्रात मान मिळेल. कुणाकडूनही कर्ज घेऊ नका.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.