Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, ८ ऑक्टोबर २०२४ : मिथुनसह २ राशींच्या नात्यात दूरावा! गुंतवणूक जपून कराल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

6

Rashi Bhavishya 8 october 2024 Today Horoscope in Marathi : आज ८ ऑक्टोबर मंगळवार असून नवरात्रीची सहावी माळ आहे. त्यामुळे कात्यायनी देवीची सर्वांवर कृपा राहिल. मिथुन, कर्कसह काही राशींना काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला मुलांकडून निराशाजनक बातम्या ऐकू येतील. ज्यामुळे तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल. प्रियजनांना भेटाल आणि वेळ मजेत घालवाल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, ८ ऑक्टोबर २०२४ : मिथुनसह २ राशींच्या नात्यात दूरावा! गुंतवणूक जपून कराल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 8 october 2024 :
आज ८ ऑक्टोबर मंगळवार असून नवरात्रीची सहावी माळ आहे. त्यामुळे कात्यायनी देवीची सर्वांवर कृपा राहिल. मिथुन, कर्कसह काही राशींना काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला मुलांकडून निराशाजनक बातम्या ऐकू येतील. ज्यामुळे तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल. प्रियजनांना भेटाल आणि वेळ मजेत घालवाल. रखडलेले काम पूर्ण करावे लागेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना बढती मिळेल. तुमचा मालमत्तेशी संबंधित वाद सुरु राहिल. प्रिय आणि मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाताना काळजी घ्या. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – रखडलेली कामे पूर्ण होतील

आज तुम्हाला व्यवसायासाठी काही गोष्टी आत्मसात कराव्यात लागतील. एखाद्याबद्दल वाईट विचार करु नका. तुम्हाला मुलांकडून निराशाजनक बातम्या ऐकू येतील. ज्यामुळे तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल. प्रियजनांना भेटाल आणि वेळ मजेत घालवाल. रखडलेले काम पूर्ण करावे लागेल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या

वृषभ- मालमत्तेवरुन वाद होईल

राजकारणाच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळेल. तुम्हाला अप्रिय लोक भेटतील. ज्यामुळे तुम्हाला अनावश्यक त्रास सहन करावा लागू शकतो. शासन आणि सत्ता यांच्यातील युतीचा लाभ मिळेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना बढती मिळेल. तुमचा मालमत्तेशी संबंधित वाद सुरु राहिल.
आज भाग्य ९४ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घ्याल.

मिथुन – जोडीदार रागवू शकतो.

आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याशी संबंधित कठोर निर्णय घ्यावा लागेल. जोडीदार तुमच्यावर रागवू शकतो. व्यवसायात काही नवीन संधी मिळतील. आळशीपणामुळे गमावू शकता. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. प्रिय आणि मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाताना काळजी घ्या.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.

कर्क – बोलण्यात गोडवा ठेवा

आज मालमत्तेचा सौदा चांगला नफा देईल. पार्टनरशीपमध्ये कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर चांगले होईल. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. बोलण्यात गोडवा ठेवा.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा

सिंह – गुंतवणूक कराल

आज तुम्हाला व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. बोलण्यातील सौम्यतेमुळे तुमचा सन्मान होईल. मानसिक गोंधळामुळे व्यवसायापासून लांब राहाल. वडिलांच्या डोळ्यांचा आजार उद्भवेल. मुलांच्या भविष्याशी संबंधित गुंतवणूक कराल.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.

कन्या – आर्थिक स्थिती मजबूत

आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे काम करण्याचा विचार करत असाल त्यात फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. पैसे खर्च करावे लागतील. मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर सर्व बाजूने विचार करा.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचे पठण करा

तुळ – व्यवसायातील समस्या संपतील

व्यवसायातील समस्या आज संपतील. जवळचे किंवा लांबचे प्रवास पुढे ढकलाल. हातात पुरेसे पैसे मिळाल्याने आनंदी असाल. एखाद्याच्या मदतीसाठी पुढे याल. कामात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी विष्णुची आराधना करा

वृश्चिक – खर्च वाढेल

आज तुमच्या कौटुंबिक व्यवसायातील समस्यांमुळे त्रस्त असाल. स्वभाव चिडचिडा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त वाढेल. तुमची मिळकत आणि खर्च यांच्यामध्ये समतोल राखा. आर्थिक स्थिती बिघडू शकते.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

धनु – लाभ होतील

आज तुमचे शत्रू तुमची प्रशंसा करतील, त्यामुळे आश्चर्य वाटेल. नोकरीत स्त्री मैत्रिणीच्या मदतीने लाभ होतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज जवळच्या व्यक्तीला भेटाल. सासरच्या व्यक्तीकडून चांगला आर्थिक लाभ होईल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा

मकर – आरोग्य जपा

आजचा दिवस कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश देणारा असेल. रोजगाराच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो. पोटदुखी, डोकेदुखी, अपचन इत्यादी समस्यांचा सामना करावा लागेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाची पूजा करा.

कुंभ – वादापासून दूर राहा

आज तुम्ही व्यवसायातील समस्या सोडवाल. तुमच्या वागण्यामुळे मतभेद होऊ शकतात. तुम्हाला वादापासून दूर राहावे लागेल. तुमचे आरोग्य सौम्य राहिल. प्रतिकूल बातम्या ऐकून अचानक प्रवासाला जावे लागेल. धर्म आणि अध्यात्माकडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत भविष्याचा विचार कराल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा

मीन – अडथळे दूर होतील

आज तुम्हाला मुलांची काळजी वाटेल. कामात वेळ घालवाल. भावासोबत कोणताही व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर संबंध बिघडतील. व्यवहार विचारपूर्वक करा. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. धार्मिक क्षेत्रात पैसे खर्च कराल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.