Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 18 ऑक्टोबर 2024: तब्येतीची काळजी घ्या ! ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

10

Numerology Prediction, 18 October 2024 : 18 ऑक्टोबर, शुक्रवार, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमच्या आणि घरातील वरिष्ठ मंडळींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मूलांक 2 च्या लोकांनी तणावापासून स्वतःला दूर ठेवा. मूलांक 4 असणाऱ्यांनी वाणीवर नियंत्रण ठेवा तर मूलांक 6 च्या जातकांना इन्फेक्शनचा त्रास होण्याची शक्यता आहे. मूलांक 8 ची धावपळ होईल तर मूलांक 9 च्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा कारण रणनीती फसल्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 18 ऑक्टोबर 2024: तब्येतीची काळजी घ्या ! ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 18 October 2024: 18 ऑक्टोबर, मूलांक 1 सह या लोकांनी तब्येतीची काळजी घ्यावी. ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यात सहभाग घेतलात तर त्रास कमी होण्याची शक्यता आहे. मूलांक 5 सह या मूलांकासाठी व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आजच्या दिवसाबद्दल तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 18 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही विचार केलेली सगळी कामे पूर्ण होणार आहेत. वडिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा सतर्क राहा. तुमचा हट्टीपणा थोडा उफाळून येईल पण त्याला आवर घाला, कारण हट्टीपणाने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. तुमच्याही तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 2 – तणावापासून स्वतःला दूर ठेवा

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहील. आर्थिक गुंतवणूकीचा विचार करत असाल तर पुढे ढकला. आईची तब्यते बिघडण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर सतर्क राहा, तुम्हाला डॉक्टरांनी काही तपासण्या सांगितल्या असतील तर त्या तातडीने करा. तणावापासून स्वतःला दूर ठेवा.

मूलांक 3 – खर्च वाढणार, सतर्क राहा

मूलांक 3 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. अचानक काही कारणामुळे तुमचा खर्च वाढणार आहे. तब्येतीची खास काळजी घ्या काही कारणामुळे आरोग्य बिघडू शकते. श्वसानासंदर्भात त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरात वातावरण ठिक असेल. तुम्हाला सगळ्यांकडून मदत मिळेल.

मूलांक 4 – वाणीवर नियंत्रण ठेवा

मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक असून तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही वास्तवात राहून विचार करा, उगाचच मी हे करेन किंवा मी तसं केलं असतं असे हवेत महाल बांधू नका. जे तुम्ही ठामपणे करु शकता त्याबद्दलच बोला. आज प्रत्येक कामात खूप मेहनत आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा अपशब्द बोललात तर नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे.

मूलांक 5 – व्यवसायात नवे मार्ग खुले होणार

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या हुशारीचे कौतुक होणार आहे. खरंतर तुमच्या योजना आणि वास्तवातील परिस्थिती यात फरक असू शकतो, त्यामुळे तुमची काळजी वाढणार आहे. तुम्ही व्यवसायात असाल तर नवे मार्ग खुले होणार आहेत त्याचा लाभ घ्या. कोणतेही काम करताना संयम ठेवा. आज मुलांनी केलेल्या कामामुळे तुम्हाला खूप समाधान मिळणार आहे. घरात वातावरण चांगले असेल.

मूलांक 6 – इन्फेक्शनचा त्रास होण्याची शक्यता

मूलांक 6 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला वैयक्तिक जीवनावर विशेष लक्ष द्यावे लागेल. आज एखाद्या इन्फेक्शन त्रास होवू शकतो त्यामुळे सावध राहा. डॉक्टरांचा सल्ला घेणे तसेच तपासणी करणे गरजेचे आहे. आज मानसिक ताणतणाव जाणवेल. घरातही वातावरण फारसे ठिक नसेल. लवलाइफमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे.

मूलांक 7 – शारिरीक तसेच मानसिक त्रासाची शक्यता

मूलांक 7 साठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने फारसा ठिक नाही. तुम्हाला मानसिक समस्येचा सामना करावा लागू शकतो किंवा तुमचे पाय खूप दुखतील. तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या मुलांच्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होईल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.

मूलांक 8 – धावपळ होण्याची शक्यता

मूलांक 8 साठी दिवस आजचा दिवस त्रासाचा आहे असे म्हणावे लागेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुमची धावपळ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला आज सतर्क आणि सावध रहावे लागेल. वाहन चालवताना सावध राहा, दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

मूलांक 9 – रणनीती फसल्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून, तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. घर आणि ऑफिसमध्ये वीजेच्या उपकराणांची काळजी घ्या. तुम्ही जी रणनीती आखली होती त्याप्रमाणे कामे होणार नाहीत त्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.