Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 20 ऑक्टोबर 2024: चांगली गोष्ट घडेल, समाधान मिळेल ! गुंतवणुकिचा विचार करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 20 October 2024 : 20 ऑक्टोबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही ठरवलेली सगळी कामे मार्गी लागणार आहेत. मूलांक 2 च्या लोकांनी पैसे उधार देवू नका. मूलांक 3 जे जातक उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत असतील तर वेळ अनुकूल आहे. मूलांक 5 साठी चांगली गोष्ट घडेल आणि समाधान मिळेल. मूलांक 7 च्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्या तर मूलांक 8 असणाऱ्यांनी वादविवादापासून दूर राहा. मूलांक 9 च्या लोकांनी राग आणि वाणी यावर नियंत्रण ठेवावे. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – ठरवलेली सगळी कामे होणार
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही ठरवलेली सगळी कामे मार्गी लागणार आहेत. धनसंपत्ती वाढणार असून योग्य ठिकाणी गुंतवणूक केलीत तर भविष्यात नक्कीच लाभ होईल. तुमच्या तब्येतीत सुधारणा होणार आहे. कुटुंबात सुखद वातावरण असून जोडीदारा तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल. संध्याकाळी कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग आहे.
मूलांक 2 – पैसे उधार देवू नका
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य आहे. कोणालाही पैसे उधार देवू नका. तुमचे पैसे अडकू शकतात. आज काही कारणामुळे तुमचे टेन्शन वाढू शकते. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. कौटुंबिक बाबतीत दिवस सामान्य असून जोडीदाराचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा कारण तुमचे अपशब्द होणाऱ्या कामात अडचणी निर्माण करतील.
मूलांक 3 – उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही ठरवलेली सगळी कामे पूर्ण होणार आहेत. तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर आज तुम्ही अर्ज भरू शकता. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. कौटुंबिक दृष्ट्या दिवस खूप चांगला आहे. मोठ्यांचा आदर ठेवा, त्यांचा मानसन्मान करा. घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार कराल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला साथ देईल.
मूलांक 4 – वचन दिले तर पूर्ण करा
मूलांक 4 साठी आजचा दिवस अडचणींनी भरलेला आहे. तुम्ही आज जे बोलणार ते पूर्ण कराल याची खात्री ठेवा. जर कोणाला वचन दिले तर ते पूर्ण करा. अन्यथा तुम्हाला मानहानीचा सामना करावा लागेल. कौटुंबिक बाबतीत वेळ अनुकूल आहे. जोडीदाराचा मान सन्मान करा. आज तुम्ही दानधर्म करणार आहात.
मूलांक 5 – चांगली गोष्ट घडेल, समाधान मिळेल.
मूलांक 5 साठी आजचा दिवस चांगला आहे. नशिबाची साथ प्रत्येत कामात मिळेल त्यामुळे तुमच्या योजना पूर्ण होतील. धनसंपत्तीच्या बाबतीत दिवस चांगला आहे. गुंतवणुकिचा विचार करा, भविष्यात उत्तम लाभ मिळणार आहे. तुम्ही एका चांगल्या गोष्टीचा विचार करत होता ती गोष्ट आज होईल, तुम्हाला खूप समाधान मिळेल. कुटुंबात वातावरण सुखद असेल. जोडीदाराची साथ प्रत्येक कामा मिळेल आणि संबंध अधिक दृढ होतील
मूलांक 6 – वादविवादाची शक्यता
मूलांक 6 साठी आजचा दिवस फारसा सामान्य आहे. तुम्ही एखाद्या कामासाठी विचार मांडाल पण ते सफल होतील असे नाही. घरी आणि ऑफिसमध्ये भांडण होण्याची शक्यता आहे. तुम्ही कटू शब्द वापरु नका, तुमची होणारी कामे थांबतील. संयमाने बोला आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात वातावरण ठिक असेल. जोडीदारासोबत वादविवाद करु नका.
मूलांक 7 – तब्येतीची काळजी घ्या
मूलांक 7 साठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही भुतकाळात घेतलेले निर्णय तुमच्यासाठी आज लाभदायक ठरणार आहेत. तुम्हाला सुखसमाधान मिळेल. धनसंपत्तीच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तब्येतीची विशेष काळजी घ्या तसेच जंक फूड खाणे बंद करा. कौटुंबिक दृष्ट्या दिवस खूप चांगला असून सगळे सदस्य तुम्हाला मदत करतील. जोडीदारासोबत दिवस आनंदात व्यतीत होईल.
मूलांक 8 – वादविवादापासून दूर राहा
मूलांक 8 साठी दिवस आजचा दिवस फारसा चांगला नाही. तुम्ही वादविवादापासून दूर राहा. आज काही कारणामुळे तुमची चिडचिड होणार आहे. तुम्ही अपशब्द वापरू नका. टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करा. आज शक्य झाले तर वादविवादापासून दूर राहा. आर्थिक स्थिती ठिक असेल. कुटुंबाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत भांडण करु नका.
मूलांक 9 – राग आणि वाणी यावर नियंत्रण हवे
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि खास करून आहारावर लक्ष द्या. जंक फूड खाणे बंद करा. तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर आज तो वाढू शकतो. वादविवाद टाळा आणि अपशब्द बोलू नका. ऑफिस आणि घर येथे वादाची ठिणगी पडेल पण तुम्ही त्यात पडू नका. कौटुंबिक बाबतीत दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांबरोबर आणि जोडीदारासोबत भांडण होण्याती शक्यता आहे. तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि रागावू नका.